
Indian Origin killed wife and 3 relatives shot dead amid Domestic Dispute
अमेरिकेत पुन्हा एका भारतीयावर हल्ला; व्यावसायिकाची गोळ्या झाडून निघृण हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्जिया राज्याच्या लॉरेन्सव्हिल शहरात शुक्रवारी (२३ जानेवारी २०२६) पहाचटे ही घटना घडली. एका कौटुंबिक वादातून घरातील चार भारतीयांना गोळ्या झाडल्या. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना शुक्रवारी २.३० च्या सुमारास ब्रूक आयव्ही कोर्ट परिसरातून गोळीबाराची तक्रार आली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना घरात चार प्रौढ मतदेह आढळले.
या घटनेत तीन लहान मुले आपल्या जीव वाचवण्यात यशस्वी झाली. पोलिस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, ही मुले कपाटात लपून बसली होती. या मुलांनीच धाडस दाखवल 911 वर कॉल केल्या ज्यामुळे गोळीबाराच्या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिंनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. सध्या त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांकडे सोपवण्यात आले आहे. परंतु या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख विजय कुमार (५१ वर्षीय) अशी पटवली आहे. विजय कुमार अटलांटाचा रहिवाशी असून त्याने त्याची पत्नी मीमू डोगरा (वय ४३) सह गौरव कुमार ( वय ३३), निधी चंदर (वय ३७) आणि हरीश चंदर (वय ३८) यांची हत्या केली आहे. सध्या आरोपी विजय कुमारवर खून, गंभीर हल्ला आणि मूलांवर क्रूरतेचे आरोप लावण्यात आले आहे.
अटलांटा येथील भारतीय दूतावासाने या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे दूतावासेन ही घटना कौटुबिक वादातून घडली असल्याचे सांगितले आहे. दूतावासाने आरोपीला अटक झाली असल्याचे म्हटले. तसेच पीडीतेच्या कुटुंबाला सर्व ती मदत केली जाईल असेही आश्वासन भारतीय दूतावासाने दिले आहे.
अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या