
United States Secretary of the Treasury Scott Bessent
भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल? जाणून घ्या टॅरिफबाबत काय सांगतात तज्ज्ञ
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी दावा केला आहे की, रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याच्या मुद्यावरून ट्रम्प भारतावरील कर लवकरच हटवणार आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, भारताने रशियाचे कच्च तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी केले आङे. यामुळे भारतवर लावलेल्या ५०% टॅरिफपैकी २५% कमी होणार आहेत. हा निर्णय ट्रम्प यांच्या धोरणांशी जोडलेला असून भारत आणि अमेरिकेच्या व्यापार संबंधासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे बेसेंट यांनी म्हटले आहे. स्कॉट बेसेंट यांनी अमेरिकेत न्यूज आइटलेट पॉलिटिकोला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे.
स्कॉट बेसेंट यांनी मुलाखतीत सांगितले की, भारतवर दोन टप्प्यात टॅरिफ लावण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात २५% टॅरिफ हे अमेरिका आणि भारत व्यापार तुटीच्या पार्श्वभूमीवर होते. त्यानंतरचे टॅरिफ हे रशियावर आर्थिक दबाव निर्माण करण्यासाठी लावण्यात आले होते. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी ज्यामुळे युद्ध थांबेल असे ट्रम्प यांचे मत होते. यामुळे अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५% दंडात्मक कर लादला होता. बेसेंट यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या रशियाकडून तेल खरेदीमध्ये लक्षणीयरित्या घट झाली आहे. यामुळे हा दंडात्मक कर हटण्याची शक्यता आहे. बेसेंट यांनी दावा केला की, भारताने जवळपास रशियम तेल खरेदी करणे पूर्णपणे थांबवले आहे. यामुळे भारतावरील अतिरिक्त कर २५% कमी होण्याची शक्यता आहे.
याच वेळी बेसेंट यांनी दावो येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल आयातदार भारताने आपल्या उर्जा धोरणात बदल केला आहे. भारताने रशियन तेलावरील अवलंबित्व कमी केले असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होतील असाही दावा बेसेंट यांनी केला.
इराणशी मैत्री पडणार महागात? ट्रम्पच्या ‘या’ आदेशामुळे भारतावर ७५% टॅरिफची टांगती तलवार