Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : सौदीच्या तेल साम्राज्यावर ड्रोनचा हल्ला; अबकैक रिफायनरीला लक्ष्य, मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला

एका बाजूला अमेरिकेने इराण वरील हल्ले थांबवले , त्याच बरोबर इराणने देखील प्रतिहल्ले थांबवले . पण इराण समर्थक इराक मधील सशस्त्र गटांनी सौदीवर हल्ला केला यामुळे मध्य पूर्वेत तणाव पुन्हा वाढला आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 28, 2026 | 04:22 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • इराकच्या दिशेने ड्रोन आले
  • अबकैक तेल केंद्राला फटका
  • इराण अमेरिका हल्ले प्रतिहल्ले थांबवले
रियाध : मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या महत्त्वाच्या तेल सुविधांवर सोमवारी मोठा ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. सौदी प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, इराकच्या दिशेने आलेल्या ड्रोनना लक्ष्य करण्यात आले असून काही ड्रोननी पूर्व प्रांतातील तेल सुविधांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल प्रक्रिया केंद्रांपैकी एक असलेल्या अबकैक (Abqaiq) तेल प्रक्रिया केंद्रालाही फटका बसल्याचे वृत्त दिले आहे.

Japan Earthquake: जपान हादरला! क्युषू भागात 7.1 तीव्रतेचा भूकंप, किनारी भागांसाठी सतर्कतेचा इशारा

सौदी अरेबियाच्या संरक्षण यंत्रणेने हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीने अनेक ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. मात्र काही ठिकाणी स्फोट आणि आग लागल्याच्या घटना घडल्याने तेल उत्पादनावर तात्पुरता परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. अबकैक हे Saudi Aramco चे सर्वात महत्त्वाचे तेल प्रक्रिया केंद्र मानले जाते. येथून दररोज लाखो बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या सुविधेवरील कोणताही हल्ला जागतिक ऊर्जा बाजारासाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो.

या हल्ल्यानंतर सौदी प्रशासनाने इराणसमर्थित सशस्त्र गटांनी इराकच्या भूमीवरून ड्रोन हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, इराणने अशा आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, येमेनमधील हूती बंडखोरांनी सौदीच्या तेल सुविधांवर हल्ल्याचा दावा केला असला, तरी त्यांनी अबकैक केंद्रावर थेट हल्ला केल्याची स्पष्ट पुष्टी केलेली नाही.

PoK protests: सर्वत्र फक्त मृतदेह…! पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात उसळला; निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार

या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक ऊर्जा पुरवठा, तेल निर्यात आणि मध्य पूर्वेतील सुरक्षेच्या दृष्टीने या हल्ल्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, या घटनेमुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू असून, तेल उत्पादन आणि निर्यात पूर्ववत करण्यासाठी Saudi Aramco कडून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. या घटनेमुळे मध्य पूर्वेतील सुरक्षा परिस्थिती पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय ठरली आहे.

 

Web Title: Breaking news drone attack on saudi arabias oil empire abqaiq refinery targeted tensions in the middle east escalate once again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • air attack
  • crude oil
  • iran
  • UAE

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी! तेल पाइपलाइनवर भीषण हल्ला; देशात पेट्रोल-डीझेलचे दर कडाडण्याची शक्यता?
1

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी! तेल पाइपलाइनवर भीषण हल्ला; देशात पेट्रोल-डीझेलचे दर कडाडण्याची शक्यता?

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य
2

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच
3

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच

Market Storm : मध्य पूर्व पेटलं, बाजार कोसळला; कच्चं तेल १०० डॉलरपार!
4

Market Storm : मध्य पूर्व पेटलं, बाजार कोसळला; कच्चं तेल १०० डॉलरपार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.