
फोटो सौजन्य AI
पण प्रत्येक्षात घडले उलटे . तीन दिवसात संपणारे युद्ध तब्बल २१२ दिवस झाले सुरु आहे .या युद्धात इस्रायल आणि अमेरिकेपेक्षा जास्त जीवितहानी इराणची झालेली आहे . इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांची आणि त्यांच्या परिवाराची हत्त्या झाली . एका लहान मुलींच्या शाळेवर मिसाईल हल्ल्यात तब्बल १६८ मुली मारल्या गेल्या . इराण मधील महत्वाचे राजकीय नेते , संशोधक – शास्त्रज्ञ मारले गेले .
या युद्धात इराणने होर्मूझ बंद करून , त्यामध्ये पाण्याखाली सुरुंग पेरून होर्मूझवर पूर्णपणे आपला ताबा मिळवला . त्यामुळे जगातील जवळपास २० टक्के चालणारी सागरी वाहतूक बंद झाली . यावर आखाती देशांना लाल समुद्रातील मार्गावर हुतींनी आक्रमण करून तो ही मार्ग बंद झाला . अमेरीकेवर दबाव वाढण्यासाठी इराण उपाययोजना करू लागला.पण अमेरिकेने होर्मूझ समोर ब्लॉकेड लावले .
आणि गुप्तपणे पाण्याखाली असणारे इराणचे सुरुंग शोधायला सुरवात केली . अर्थात अमेरिकेचे दोन ड्रोन इराणने पकडले सुद्धा . पण या सगळ्यात होर्मूझवर इराणचा कंट्रोल आहे हे निर्विवादपणे समोर आले . यानंतर इराणने एक सूचना जारी करून सांगितले कि इराणला सर्व्हिस टॅक्स देऊन जहाजे बाहेर पडू शकतात .
पण दुसऱ्या बाजूला अमेरिका अडून बसला आणि त्याने अशा जहाजांवर कारवाई करायला सुरवात केली . त्यामुळे जहाजांना इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली . अमेरिका ने जगाचं न दिलेले पालकत्व घेऊन जगाला वेठीस धरले आहे . अश्या भावना इराण मधील जनता व्यक्त करत असल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजते आहे.
इराण ने नुकताच अमेरिकेला पुन्हा सात दिवसांचा शांतता प्रस्ताव पाठवला पण ट्रम्प यांनी इराणवर भरोसा नसल्याचे सांगून तो धुडकावला . ट्रम्प यांनी आधी इराणने होर्मूझ खुला करावा तेव्हा आपण इराणच्या मागण्यांचा विचार करू सांगितले .
यावर इराणचे राष्ट्राध्यक्ष यांनी अमेरिकेवर भरोसा नसल्याचे सांगून आता अमेरिकेनेच ठरवावे कि आमच्या मागण्या मान्य करून शांतता प्रस्थापित करायची कि पुन्हा जोरदार युद्ध करायचे . आता आम्ही दोन्हीही गोष्टींसाठी तयार आहोत . त्यामुळे इराणकडून बॉल पुन्हा ट्रम्प यांच्या कोर्टात उडवला आहे .
जागतिक राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही आणि कसल्याही परिस्थितीत इराण अमेरिकेसमोर झुकणार नसल्याचे सांगितले आहे . आता युद्धाला कोणते वळण द्यायचे हे ट्रम्प यांनी ठरवावे लागणार आहे .
इराणने सांगितल्याप्रमाणे होर्मूझ मध्ये १९ जहाजांना उडवले आहे . पण त्याची अजून ठोस अशी पुष्टी करण्यात आली नाहीये . फक्त काही बातम्यांमध्ये जहाजांवर आगी लागल्याचे दिसून आले आहे . तसेच इशारा दिल्यानंतर जहाजांवर गोळीबार केल्याचे म्हंटले आहे . येत्या काही वेळात या हल्ल्याची स्पष्टता कळू शकेल . असे मिळालेल्या माहितीवरून सांगता येऊ शकेल .