Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BRICS Summit 2026: ग्लोबल पॉवर प्ले! दिल्लीत भरणार महासत्तांचा दरबार; पुतिन-जिनपिंग यांच्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष

BRICS Summit 2026 : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 20, 2026 | 10:39 AM
brics summit 2026 new delhi xi jinping putin visit india modi bilateral talks

brics summit 2026 new delhi xi jinping putin visit india modi bilateral talks

Follow Us
Close
Follow Us:
  • ७ वर्षांनंतर जिनपिंग भारतात
  • मोदी-पुतिन-जिनपिंग महासंगम
  • नवे भू-राजकीय समीकरण

Xi Jinping and putin India Visit September 2026 : जागतिक भू-राजकारणाच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष अत्यंत क्रांतिकारी ठरणार आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली यावर्षी एका महाविस्फोटक आणि ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणार आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारतात आयोजित होणाऱ्या ‘ब्रिक्स’ (BRICS) शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकत्र भारताचा दौरा करणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भारत आणि चीनमधील सीमावादानंतर तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग पहिल्यांदाच भारताला भेट देणार आहेत. रशियाची अधिकृत वृत्तसंस्था ‘TASS’ ने पुतिन यांच्या दौऱ्याला दुजोरा दिला असून या महासोहळ्यामुळे जागतिक राजकारणात भारताचे पारडे प्रचंड जड झाले आहे.

७ वर्षांनंतर जिनपिंग भारताच्या भूमीवर!

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा अनेक कारणांनी ऐतिहासिक आणि रणनीतिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. यापूर्वी शी जिनपिंग २०१९ मध्ये चेन्नईजवळील मामल्लापुरम येथे अनौपचारिक शिखर परिषदेसाठी आले होते. त्यानंतर भारत आणि चीन दरम्यान लडाख सीमेवर झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. अशा परिस्थितीत, २०२६ मधील भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात जिनपिंग यांचे दिल्लीत येणे हे दर्शवते की, जागतिक अर्थव्यवस्थेच्या समीकरणात चीन भारताच्या वाढत्या प्रभावाला नाकारू शकत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Imran Khan: ‘Absolutely Not’ चा बदला! अमेरिकेनेच केला इम्रान खान यांचा पत्ता कट; CIAच्या कारस्थानाचा जिवंत पुरावा लीक

पुतिन आणि जिनपिंग यांच्यात दिल्लीतच खलबतं!

क्रेमलिनचे (रशियाचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय) आंतरराष्ट्रीय व्यवहार सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्लादिमीर पुतिन १२ आणि १३ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या या परिषदेत सक्रिय सहभाग घेतील. धक्कादायक आणि महत्त्वाची बाब म्हणजे, या परिषदेच्या आडून नवी दिल्लीच्या भूमीवरच पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यात एक विशेष द्विपक्षीय बैठक (Bilateral Meeting) होणार आहे. पुतिन यांचा एका वर्षातील हा दुसरा भारत दौरा असेल, यापूर्वी ते डिसेंबर २०२५ मध्ये भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी आले होते. दोन महासत्तांचे प्रमुख भारताच्या पाहुणचारात आपापसातील रणनीती ठरवणार असल्याने संपूर्ण जगाचे डोळे या बैठकीकडे लागले आहेत.

Power is shifting to the East, while President Vladimir Putin will come to India in September for the BRICS summit. https://t.co/xOt1Clcoqu — HP_ClipStorm (@HINDUSTAN_PLUSE) May 19, 2026

credit – social media and Twitter

बिश्केकमध्ये होणार ‘ट्रेलर’, दिल्लीत दिसेल ‘पिक्चर’

सप्टेंबरमधील या मुख्य ब्रिक्स परिषदेपूर्वी, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी किर्गिझस्तानमधील बिश्केक येथे ‘शांघाय सहकार्य संघटना’ (SCO) ची शिखर परिषद पार पडणार आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची समोरासमोर भेट होण्याची शक्यता आहे. तिथे होणारी चर्चा ही दिल्लीतील ब्रिक्स परिषदेची पायाभरणी मानली जात आहे. नुकतेच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनीही दिल्लीचा दौरा करून या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित केली आहे.

🚨The President’s schedule after his China state visit (19-20 May 2026): 📍The President will take part in the SCO summit in Bishkek from August 31 to September 1. 📍The President will attend the BRICS summit in New Delhi, #India on September 12-13. 📍The President plans to… https://t.co/2EP5Pngf2W pic.twitter.com/2cK0xG2lGy — Dr.Sophia Ulgen 🇷🇺☮🇺🇸 (@ulgenfatma74) May 19, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Melodi: भारत-इटली संबंधांना मोदी- मेलोनींच्या मैत्रीचा नवा रंग; 8 व्या भेटीत होणार संरक्षण आणि ‘AI’ क्षेत्रातील ‘हे’ ऐतिहासिक करार

११ देशांचा ‘ब्रिक्स’ आणि बदलतं जागतिक वास्तव

पूर्वी ‘ब्रिक्स’ म्हणजे केवळ ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ५ देशांचा गट होता. परंतु, २०२४ मध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) हे देश यात सामील झाले. तर २०२५ मध्ये इंडोनेशियाच्या समावेशामुळे हा गट आता ११ देशांचा एक महाकाय आर्थिक महासंघ बनला आहे. आजच्या घडीला हा गट जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ४९.५ टक्के म्हणजेच निम्म्या जगाचे प्रतिनिधित्व करतो. इतकेच नव्हे तर जागतिक जीडीपीमध्ये (GDP) या गटाचा वाटा ४० टक्के आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात २६ टक्के आहे. अशा बलाढ्य गटाचे नेतृत्व यावर्षी भारताकडे असणे, ही भारताला जागतिक पातळीवर ‘तिसरा ध्रुव’ म्हणून प्रस्थापित करणारी घटना ठरणार आहे.

Web Title: Brics summit 2026 new delhi xi jinping putin visit india modi bilateral talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • Brics Council
  • India news
  • PM Narendra Modi
  • Vladimir Putin
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Melodi: भारत-इटली संबंधांना मोदी- मेलोनींच्या मैत्रीचा नवा रंग; 8 व्या भेटीत होणार संरक्षण आणि ‘AI’ क्षेत्रातील ‘हे’ ऐतिहासिक करार
1

Melodi: भारत-इटली संबंधांना मोदी- मेलोनींच्या मैत्रीचा नवा रंग; 8 व्या भेटीत होणार संरक्षण आणि ‘AI’ क्षेत्रातील ‘हे’ ऐतिहासिक करार

“महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले!” रायबरेली दौऱ्यावर राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘या’ मुद्द्यांवरून घेरले
2

“महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले!” रायबरेली दौऱ्यावर राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘या’ मुद्द्यांवरून घेरले

Nuclear Pact : अमेरिकेची झोप उडाली! रशियाच्या ‘या’ मित्र देशाला मिळणार १० अणुबॉम्ब; युरोपच्या उंबरठ्यावर तैनात होणार?
3

Nuclear Pact : अमेरिकेची झोप उडाली! रशियाच्या ‘या’ मित्र देशाला मिळणार १० अणुबॉम्ब; युरोपच्या उंबरठ्यावर तैनात होणार?

Putin In China : ‘आधी ट्रम्प, आता पुतिन!’ चीनच्या दारात जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांची रांग; काय आहे जिनपिंग यांचा गेम प्लॅन?
4

Putin In China : ‘आधी ट्रम्प, आता पुतिन!’ चीनच्या दारात जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांची रांग; काय आहे जिनपिंग यांचा गेम प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.