Canada Election Result Canada’s Carney secures historic election win and says 'Trump will never break us'
ओटावा: सोमवारी (28 एप्रिल) कॅनडामध्ये सार्वत्रिक पार पडल्या. या निवडणूकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पुन्हा एकदा कार्नी सरकार निवडून आले आहे. आता कॅनडात लिबरल पक्षाचे मार्क कार्नी पंतप्रधान राहतील. या निवडणुकीचा अधिकृत निकाल 30 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ही निवडणूक अशा वेळी घेण्यात आली आहे, जेव्हा कॅनडा अमेरिकेसोबत टॅरिफवॉरमध्ये अडकला आहे. या निवडणुकीत लिबरल पक्षाने सलग चौथ्यांदा विजय मिला आहे. हे कॅनडाच्या राजकीय इतिहासातील मोठे राजकीय यश मानले जात आहे.
कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मार्क कार्नी बहुमताने विजय झाले आहेत. कार्नी यांनी पियरे पोइलिव्ह यांच्या कंझर्वेहटिव्ह पक्षाचा पराभाव केला. प्रचारादरम्यान मार्क कार्नी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य़ांच्याविरोधात कठोर भूमिका घेतला होती. ट्रम्प यांनी म्हटले होते की, कॅनडा अमेरिकेते विलिन झाला पाहिजे. याविरोधात मार्की कार्नी यांनी आवाज उठवाला होता.
कार्नी यांनी 14 मार्च रोजी माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी सुरुवातीपासूरन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरमांना विरोध दर्शवला होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे कॅनडाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागल्याचे कार्नी यांनी म्हटले. अमेरिकेसोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कार्नी यांनी 20 ऑक्टोबर 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुका 28 एप्रिल रोजी घेण्याचा निर्णय घेतला होता. ट्रम्प यांच्या धक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मजबूत जनादेशाची आवश्यकता कार्नी यांनी अधोरेखीत केली.
दरम्यान कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाला अमेरिकेच्या 51वे राज्य बनवण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर कॅनडाला अमेरिकेचे 51 राज्य बनवण्याचे आवाहन केले आणि म्हटले की, “कॅनडाच्या महान लोकांना शुभेच्छा” अशा माणसाला निवडा, ज्याच्याकडे तुमचे कर कमी करण्याची शक्ती आणि बुद्धिमत्ता असेल.
तसेच अशा व्यक्तीला निवडा, जो जागतिक स्तरावर कॅनडाचे लष्करी सामर्थ वाढवेल. कार, स्टील, ॲल्युमिनियम, लाकूड, उर्जा इतर व्यापारारील कर कमी होईल आणि कॅनडा अमेरिकेचे 51 वे राज्य बनेल.
पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या या टिकेनंतर कॅनडाच्या राजकीय वातावरणात गोंधळ उडाला आहे. पुन्हा एकदा कॅनडाच्या लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना मजबूत झाली आहे. दरम्यान आता ट्रम्प यांच्या या व्यक्तव्यावर मार्की कार्नी काय निर्णय घेतली हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.