Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडाच्या संसदेमध्ये राडा! अज्ञात व्यक्तीच्या घुसखोरीने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; संचार बंदी लागू

कॅनडातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅनडाच्या ओटावा शहराच्या संसद भवनमध्ये शनिवारी (05 एप्रिल) दुपारी एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला. यामुळे देशात प्रचंड खळबळ उडाली.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2025 | 05:33 PM
canada news marathi Canadian Parliament on lockdown after man barricades himself inside

canada news marathi Canadian Parliament on lockdown after man barricades himself inside

Follow Us
Close
Follow Us:

ओटावा: कॅनडातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅनडाच्या ओटावा शहराच्या संसद भवनमध्ये शनिवारी (05 एप्रिल) दुपारी एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला. यामुळे देशात प्रचंड खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, संसद भवनाच्या पूर्व भवनाच्या ब्लॉकमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संचार बंदी जाहीर करण्यात आले. तसेच वेलिंग्टन स्ट्रीट परिसरात नाकाबंदी करण्यात आली.

अज्ञात व्यक्तीला अटक, घटनेची चौैकशी सुरु

पोलिसांनी नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचा, बरवाजे बंद करण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी विशेष दल तैनात केले आहेत. तसेच अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी शोधमोही सुरु केली आणि काही तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर रविवारी सकाळी संशयिताला अटक करण्यात आली. दरम्यान अटक केलेला युवक को आहे, त्याचा हेतू काय होता याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या या घटनेटी सखोल चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. युकवकाची पार्श्वभूमी तपासली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क विरोधात लोकांचा रोष शिगेला; अमेरिकेत 1200 ठिकाणी ‘Hands off’ आंदोलनाने घेतले उग्र वळण

संसद भवनात तातडीने अलर्ट जारी

पोलिसांनी शनिवारी दुपारी 2:45 वाजता ओटावामध्ये अर्लट जारी केला होता. अलर्टमध्ये संसद भवनात असलेल्या लोकांना आसपासच्या खोल्यांमध्ये लपण्याचा सल्ला, दरवाजे बंद करुन कुलूप लावण्याचा सल्ला देण्यात आला. पोलिसांच्या सावधगिरीमुळे आणि तत्परेतमुळे कोणतीही जीवितहानी घडली नाही.

पूर्व ब्लॉकचा भाग विशेष करुन सीनेटर आणि त्यांच्या स्टाफच्या कार्यलयांसाठी वापरण्यात येतो. तसेच कॅनडाच्या संसद आगामी संघीय निवडणुकांपूर्वी भंद करण्यात आली होती. यामुळे फारसे सदस्य उपस्थित नव्हते. यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

कॅनडात चिंतेचे वातावरण

सध्या या घटनेमुळे संपूर्ण कॅनडामध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. संसद परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तपासात अडथळा येऊ नये म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या घटनेमुळे संसदेसारख्या उच्च सुरक्षा असलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरकारने घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सुरक्षाव्यवस्थेत सुधार करण्याचेही आदेश दिले आहे. नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण असून आवाजा उठला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Travis Scott Concert India: ट्रॅव्हिस स्कॉटच्या शोसाठी बुकिंग सुरू, जाणून घ्या भारतात कधी होणार कॉन्सर्ट

Web Title: Canada news marathi canadian parliament on lockdown after man barricades himself inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
2

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
3

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.