Canada Plane-Crash : Terrible plane crash in canada's Newfoundland One Indian citizen dies
ओटावा : कॅनडामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कॅनडाच्या न्यूफाउंडलॅंड प्रांतात भीषण विमान अपघात झाला आहे. या अपघातात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. टोरोंटोच्या भारतीय वाणिज्य दूतावासाने मंगळावारी (२९ जुलै) रोजी या घटटनेची माहिती दिली. कॅनडाच्या न्यूफाउंडलॅंड प्रदेशात सर्वेक्षणादरम्यान एक व्यावसायिक विमानाचा अपघात झाला. याशिवाय यामध्ये आणखी एका कॅनेडियन नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार, २६ जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. यामध्ये भीरतीय नागरिक गौतम संतोष याचा मृत्यू झाला आहे. भारतीय दूतावासाने याव शोक व्यक्त केला असून कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केला आहेत. तसेच पीडीताच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
भारतीय दूतावासाने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात भारतीय दूतावासाच्या जनरलने, या दुख:द काळात आम्ही पीडीताच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो तसेच कुटुंबाला आवश्यक ती मतद करण्याचे आश्वासन देतो. सध्या भारतीय दूतावास कॅनडातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पीडीताप्रतील देखील शोक दूतावासाने व्यक्त केला आहे.
गौतम संतोष हा मूळ केरळचा रहिवासी आहे. तो ब्रिटिश कोलंबियातील डेल्टा येथील किसिक एरियल सर्व्हे इंक. चा अध्यक्ष होता. त्याने पाइपर पीए-३१ नावाजो विमान कंपनीत काम केले आहे. अपघातावेळी गौतमसोबत आणखी एक कॅनडाचा नागरिक होता त्याचाही अपघातात मृत्यू झाल्या कॅनेडियन पोलिसांनी म्हटले आहे.
With deep sorrow, we mourn the tragic passing of Mr. Gautam Santhosh, an Indian national, who lost his life in an accident involving a commercial survey aircraft near Deer Lake, Newfoundland.
We extend our heartfelt condolences to his family during this difficult time. The…
— IndiainToronto (@IndiainToronto) July 28, 2025
सध्या या अपगाताचे कारण अस्पष्ट आहे, घटनेचा तपास सुरु करण्यात आसल्याचे कॅनेडियन पोलिसांनी सांगतिले आहे. कॅनडाचे वाहतूक सुरक्ष मंडळ या घटनेची चौकशी करत आहे.
याच वेळी ब्रिटिश कोलंबियातील डेल्टा येथील किसिक एरियल सर्व्हेचे मालक अँड्र्यू नेमिस्थ यांनी या अपघातवर दुख व्यक्त केले आहे. या घटनेने त्यांना धक्का बसला असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी पीडीतांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच कुटुंबायांप्रती देखील तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.