Nimisha Priya Case : निमिषाला फाशी मिळणार की नाही? अखेर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टच सांगितले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nimisha Priya Case Update in marathi : सध्या भारतीय नर्स निमिषा प्रियाच्या मृत्यूदंडाची शिक्षा अधिकच गूढ होत चालली आहे. एककीडे भारतीय ग्रॅंड मुफ्ती कंठापुरम एपी अबुबकर मुसलियर यांच्या कार्यालयाने निमिषाची फाशी रद्द झाल्याचा दावा केला आहे. यापूर्वी ही फाशी स्थगित करण्यात आली होती. तर दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे.
मंगळवारी (२९ जुलै) परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, निमिषा प्रिया प्रकरणावर काही लोकांकडून तसेच सोशल मीडियावर चूकीची माहिती पसरवली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सध्याच्या परिस्थितीत पाहता लोकांना अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवता सरकारकडून येणाऱ्या अधिकृत माहितीची वाट पाहावी. सध्या येमेनच्या सरकारकडून अद्याप निमिषाच्या प्रकरणावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
जुलै १०१८ मध्ये निमिषा प्रियाला तीचा येमेनी पार्टनर महदीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यातले आहे आहे. सध्या ती येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहे. निमिषाला १६ जुलै रोजी फाशीची शिक्षा देण्यात येणार होची, परंतु १५ जुलै रोजी ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली.
निमिषा ही केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील राहणारी. २००८ मध्ये रोजगाराच्या संधीसाठी ती येमेनला गेली होती. निमिषा एक प्रशिक्षित नर्स होत्या. तिने येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीसोबत पार्टनरशिपमध्ये येमेनची राजधानी साना शहरात एक क्लिनिक सुरु केले होते.
त्यानंतर महदीने तीली त्रास देण्यास सुरुवात केली. महदीने निमिषाला तिचा नवरा असल्याचे भासवले आणि तिचा पासपोर्ट ताब्यात घेतला. यामुळे निमिषाला भारतात परत येता आले नाही. पासपोर्ट परत मिळवण्यासाठी २०१७ मध्ये महदीला तिने औषध देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु महदीचा मृत्यू झाला. त्यानंतर निमिषाला अटक करण्यात आली.
२०१८ मझ्ये तिला महदीच्या खूनाच्या आरोपाखाली गोषी ठरवण्यात आले. तेव्हापासून निमिषा येमेनच्या तुरुंगात शिक्षा भोगत होती. २०२० मध्ये येमेनच्या न्यायालयाने तिला मृत्यूंदडाटी शिक्षा सुनावली होती. भारत सरकार आणि अनेक धार्मिक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे निमिषाची फाशी काही काळासाठी स्थिगत कण्यात आली.
परंतु पीडीतच्या कुटुंबाने तिला माफ करण्यास नकार दिल्याने अद्याप या प्रकरणावर खटला सुरु आहे. तिच्या मृत्यूदंडाची शिक्षा पूर्णत: रद्द झाल्याची अधिकृत माहिती अद्याप येमेन सरकापकडून आलेली नाही.