Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canada Shooting : कॅनडाच्या स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; 2 जण ठार, घटनेचा तपास सुरु

Canada Shooting News : कॅनडाच्या टोरंटो येथे शनिवारी (११ जुलै) रात्री साल्सा ऑन सेंट क्लेअर या रस्त्यावर स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबारा करण्यात आला. या गोळीबारा दोन जण ठार झाले असून तिन जण गंभीर जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2026 | 10:39 AM
Canada Shooting

Canada Shooting

Follow Us
Follow Us:
  • कॅनडाच्या टोरंटो फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार
  • २ जण ठार, ३ जण गंभीर जखमी
  • घटनेचा तपास सुरु
Canada Shooting News in Marathi : ओटावा : कॅनडाच्या टोरंटो येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जण ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी आहेत.  जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी (११ जुलै) संध्याकाळी साल्सा ऑन सेंट क्लेअर या प्रसिद्ध स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान ही घटना घडली.

हे देखील वाचा : Iran-US War : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा तणाव; अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्याने हादरले इराण, होर्मुझमधील जहाजावर…

नेमकं काय घडलं?

टोरंटोच्या स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट क्लेअर अव्हेन्यू वेस्ट आणि अर्लिंग्टन अव्हेन्यू परिसरात गोळीबार घडला. रात्री ८ च्या सुमारास फेस्टिव्हलमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असाताना अचानक गोळीबार (Firing) सुरु झाला. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोळीबारात पाच जण जखमी झाल्याचे सांगितले. यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर बाकी तीन जण गंभीर जखमी आहेत. सध्या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

परिसरात नाकेबंदी

या गोळीबारानंतर पोलिसांनी संपूर्ण पसिरात नाकेबंदी केली आहे. नागरिकांना घटनास्थळी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घटनेचा तपास सुरु असून प्राथमिक तपासानुसार, अॅक्टिव्ह शूटर प्रकरण असल्याचा अंदाज आहे. हल्लेखोराचा शोध सुरु आहे.

गोळीबाराचे कारण अस्पष्ट

सध्या या हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट आहे. हल्लेखोराची किंवा त्याला अटक झाल्याची अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. घटनास्थळावर असलेल्या प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरु असून परिसरातील सीसीटीव्ही फूटजेची तपासणी केली जात आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेमुळे फेस्टिव्हलमध्ये उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून तपास पूर्ण होईपर्यंत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bystanders shocked after shooting leaves 2 dead and 3 injured during festival in Toronto 🤕 https://t.co/T0IUtuEArD pic.twitter.com/i04Ubxgdy8 — RTN (@RTNToronto) July 12, 2026

हे देखील वाचा : Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग! अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा जोरदार पलटवार; आखाती देशांना लक्ष्य

Web Title: Canada shooting 2 dead and 3 injured during festival in toronto

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • Canada
  • Firing News
  • World news

संबंधित बातम्या

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस
1

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट
2

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी
3

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत
4

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.