
Canada's Bill C-3 is under debate and may soon ease rules for Indian-origin citizens
Citizenship by descent Canada : कॅनडात( Canada) राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी आणि ऐतिहासिक ठरणारी घटना घडली आहे. कॅनडाच्या संसदेत सादर केलेले विधेयक C-3 अधिकृतपणे मंजूर झाले असून त्याची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आहे. या बदलामुळे कॅनडात राहत असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या भावी पिढ्यांसाठी नागरिकत्व मिळवणे आता अधिक सोपे, न्याय्य आणि स्पष्ट मार्गाने शक्य होणार आहे.
या विधेयकाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे २००९ पासून लागू असलेल्या वादग्रस्त पहिल्या पिढीच्या नागरिकत्व मर्यादेचा शेवट. त्या नियमानुसार, कॅनडाच्या बाहेर जन्मलेल्या किंवा दुसऱ्या देशातून दत्तक घेतलेल्या मुलांना नागरिकत्व देणे अत्यंत कठीण आणि अनेकदा अशक्य होते. परिणामी, अनेक भारतीय कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या नागरिकत्वाबाबत अडथळे, कायदेशीर प्रक्रिया आणि परदेशी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. डिसेंबर २०२३ मध्ये, ओंटारियोच्या न्यायालयाने ही मर्यादा असंवैधानिक ठरवत रद्द केली होती. त्याच पार्श्वभूमीवर, कॅनडा सरकारने अधिक व्यापक, मानवी आणि समानतेच्या तत्त्वांवर आधारित सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि विधेयक C-3 संसदेत सादर करण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
कॅनडाच्या इमिग्रेशन मंत्री लीना मेटलेज-डायब यांच्या मते, हा कायदा असमानता कमी करून परदेशात जन्मलेल्या मुलांना योग्य हक्क मिळवून देईल. नवीन सुधारणेनुसार, कॅनडाबाहेर जन्मलेल्या मुलांना नागरिकत्व मिळवण्यासाठी कॅनडाशी कुटुंबीय संबंध, रहिवासी पुरावे किंवा कायदेशीर दृष्टीने पात्र असलेली कागदपत्रे दाखवावी लागतील. या सोप्या प्रक्रियेमुळे हजारो भारतीय कुटुंबांसाठी दरवाजे अधिकृतपणे खुले झाले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप
कॅनडामध्ये भारतीयांचा समुदाय हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि सरकारी स्तरावर प्रभावी मानल्या जाणाऱ्या समूहांपैकी एक आहे. २०२३ च्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार, कॅनडातील भारतीयांचा आकडा २.८ ते २.९ दशलक्ष इतका आहे. त्यापैकी सुमारे १.९ दशलक्ष भारतीय वंशाचे नागरिक तर सुमारे १ दशलक्ष एनआरआय असल्याचे नोंदवले आहे. कॅनडा सरकारने २०२१ मध्ये जाहीर केलेल्या लोकसंख्याशास्त्रीय आकडेवारीनुसार, देशातील ५.१% लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. या कायद्यामुळे भारत-कॅनडा सांस्कृतिक संबंध अधिक सुदृढ होतील आणि भविष्यातील भारतीय पिढ्यांसाठी ओळख, सुरक्षितता, हक्क आणि संधींचे नवीन दरवाजे खुल्या होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
Ans: कॅनडाचे नागरिकत्व नियम बदलणारे नवीन विधेयक.
Ans: कॅनडाबाहेर जन्मलेल्या भारतीय वंशाच्या मुलांना.
Ans: कायद्याच्या अंतिम प्रक्रिये नंतर लवकरच लागू होईल.