
uae burjeel holdings 37crore bonus 10000 healthcare workers dr shamsheer vayalil
Burjeel Holdings 37 crore bonus UAE 2026 : माणुसकी आणि कृतज्ञता जेव्हा कॉर्पोरेट जगात एकत्र येते, तेव्हा काय चमत्कार घडू शकतो, याचे जिवंत उदाहरण नुकतेच युएईमध्ये पाहायला मिळाले. मध्य पूर्वेतील आघाडीची आरोग्यसेवा कंपनी ‘बुर्जिल होल्डिंग्ज’ (Burjeel Holdings) ने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा खजिना रिकामा केला आहे. कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. शमशीर वायालिल यांनी १०,००० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी १५ दशलक्ष दिरहम म्हणजेच सुमारे ३७ कोटी रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे.
अबू धाबी येथील प्रसिद्ध ‘एतिहाद अरेना’मध्ये कंपनीने आपल्या ८,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी एका भव्य टाउन हॉलचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. शमशीर व्यासपीठावरून कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते. ते बोलत असतानाच, अचानक तिथे उपस्थित असलेल्या हजारो परिचारिका, डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफच्या मोबाईल फोनवर एक मेसेज धडकला. हा मेसेज वाचताच संपूर्ण मैदानावर आनंदाची लाट उसळली. “बुर्जिल प्राउड” (Burjeel Proud) या नवीन उपक्रमांतर्गत हा आर्थिक सन्मान थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Summit: ‘माझ्या भावाचे स्वागत!’ UAEअध्यक्षांसाठी PM Modi नी तोडला प्रोटोकॉल; दोन तासांच्या भेटीत झाला ऐतिहासिक ‘पावर’ गेम
या पहिल्या टप्प्यात सुमारे १०,००० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळेल. यामध्ये नर्सिंग, पॅरामेडिकल स्टाफ, रुग्णसेवा आणि ऑपरेशन्स टीममधील ८५ टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हा बोनस अर्ध्या महिन्याच्या पगारापासून ते पूर्ण एका महिन्याच्या मूळ पगारापर्यंत देण्यात आला आहे. डॉ. शमशीर यांनी स्पष्ट केले की, “हा बोनस कोणत्याही व्यावसायिक उद्दिष्टांसाठी (Target) दिलेला नाही, तर या कामगारांनी रुग्णसेवेसाठी जे रक्ताचं पाणी केलं आहे, त्या ऋणातून मुक्त होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.”
Proud of our people. Grateful for their work, every single day. This is what Burjeel stands for.
#Burjeel2_0 #BurjeelProud #LeadershipTownhall pic.twitter.com/DbYgAR7HyM — Dr. Shamsheer Vayalil (@drshamsheervp) January 19, 2026
credit – social media and Twitter
या ऐतिहासिक घोषणेनंतर अनेक कर्मचारी भावूक झाले होते. तिथे उपस्थित असलेल्या एका परिचारिकेने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, “आम्ही रुग्णसेवेलाच आमचे कर्तव्य मानतो, पण जेव्हा कंपनीचे मालक स्वतः व्यासपीठावर येऊन आमच्या कष्टाची दखल घेतात, तेव्हा तो क्षण खूप अभिमानास्पद वाटतो.” युएईच्या आरोग्य क्षेत्रात एका सीईओने आयोजित केलेला हा आजवरचा सर्वात मोठा मेळावा असल्याचे बोलले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Davos 2026 : ‘खुनी राजवटीला जागा नाही!’ दावोसने फाडले इराणचे निमंत्रण; परराष्ट्रमंत्री अराघचींची जागतिक नाचक्की
डॉ. शमशीर यांनी यावेळी केवळ बोनस देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी कंपनीच्या भविष्यातील ‘व्हिजन २०३०’ ची रूपरेषाही मांडली. त्यांनी सांगितले की, ‘बुर्जिल मेडिकल सिटी’ला केवळ रुग्णालय न ठेवता एक आधुनिक ‘मेडिकल इकोसिस्टम’ बनवले जाईल. जिथे संशोधन, अत्याधुनिक शिक्षण आणि रुग्णांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील. हा संपूर्ण बदल ‘बुर्जिल २.०’ या मोहिमेचा भाग असून, यात तंत्रज्ञानासोबतच कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे.
Ans: कंपनीने एकूण १५ दशलक्ष दिरहम म्हणजेच सुमारे ३७ कोटी रुपयांचा आर्थिक बोनस जाहीर केला आहे.
Ans: याचा फायदा समूहातील सुमारे १०,००० फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना (नर्सेस, डॉक्टर, सपोर्ट स्टाफ) मिळणार आहे.
Ans: हा बोनस कोणत्याही व्यावसायिक लक्ष्यासाठी नसून, कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिला गेला आहे.