Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Capt.Smit Machchhar: ट्रम्प अन् नेतान्याहूंनी भारतीय पायलट स्मित माछार यांना म्हटले रियल हिरो; अद्भूत शौर्याची जगभरातून प्रशंसा

Capt.Smit Machchhar : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारतीय पायलट स्मित मच्छर यांच्या असामान्य शौर्याची प्रशंसा केली, ज्यांनी आपल्या ओमानच्या सह-वैमानिकाने चाकूने हल्ला करूनही हवेतच कॉकपिटचा दरवाजा उघडला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 01, 2026 | 01:22 PM
Donald Trump on Indian Pilot Captain Smit Machchhar

Donald Trump on Indian Pilot Captain Smit Machchhar

Follow Us
Follow Us:
  • कॉकपिटमधील थरार आणि धाडस
  • ट्रम्प आणि नेतान्याहू कडून कौतुक
  • प्रवाशाचे शौर्य आणि सुरक्षित लँडिंग

आकाशात हजारो फूट उंचावर असताना विमानात घडलेल्या एका अत्यंत थरारक आणि प्राणघेण्या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. फ्लायदुबईच्या FZ1073 या (Dubai) विमानामध्ये उड्डाणादरम्यान अचानक भीषण आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. विमानाचे नियंत्रण सांभाळणारे मुख्य भारतीय pilot कॅप्टन स्मित माछार (Capt.Smit Machchhar)  यांच्यावर त्यांच्याच ओमानच्या सह-वैमानिकाने चाकूने अचानक हल्ला केला. विमानाचा ताबा मिळवून ते पाडण्याचा कथित प्रयत्न या सह-वैमानिकाकडून केला जात होता. परंतु, शरीरावर गंभीर जखमा झाल्या असतानाही कॅप्टन स्मित माछार यांनी दाखवलेले अद्भूत धैर्य आणि प्रसंगावधान यामुळे आज शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जागतिक स्तरावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय नेत्यांनी भारतीय वैमानिकाच्या शौर्याची मनमोकळेपणाने प्रशंसा केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या घटनेची गंभीर दखल घेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा केली. माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी या घटनेबाबत सविस्तर भाष्य केले. ट्रम्प म्हणाले की, “मी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी या दुर्दैवी आणि अत्यंत भयानक घटनेबद्दल बोललो आहे. प्राथमिक माहितीनुसार, तो सह-वैमानिक बहुधा एखादा दहशतवादी किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती असावा. त्याने मुख्य वैमानिकावर अत्यंत क्रूरपणे चाकूने हल्ला केला. कॅप्टनची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती, परंतु त्यांनी अत्यंत चिकाटीने आणि समयसूचकतेने कॉकपिटचा दरवाजा उघडला. एका अर्थाने त्यांनी अत्यंत धाडसी आणि नायकासारखे काम केले आहे.” ट्रम्प यांनी भारतीय पायलटसोबतच विमानात मध्यस्थी करणाऱ्या धाडसी प्रवाशांचेही विशेष आभार मानले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स

विमान अत्यंत वेगाने जमिनीच्या दिशेने हजारो फूट खाली कोसळू…

या थरारक घटनेदरम्यान कॉकपिटमधून येणारे किंकाळ्यांचे आणि भांडणाचे आवाज ऐकून विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. याच दरम्यान, विमान अत्यंत वेगाने जमिनीच्या दिशेने हजारो फूट खाली कोसळू लागले होते. कोणतीही क्षणाचीही पर्वा न करता, इस्रायली प्रवासी यानिव हायून (Yaniv Hayoun) यांनी तत्परता दाखवली. कॉकपिटचा दरवाजा उघडा असल्याचे दिसताच त्यांनी आत धाव घेतली आणि सह-वैमानिकाला मुख्य पायलटच्या सीटवरून अत्यंत ताकदीने बाहेर खेचले. यानिव यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने त्या हल्लेखोराला गळा दाबून पकडले आणि पूर्णपणे निष्प्रभ केले. कोणत्याही विमान उड्डाणाचा अनुभव नसतानाही, केवळ प्रवाशांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने त्यांनी कॉकपिटचा ताबा मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

#WATCH | US President Donald Trump says, “I spoke to Benjamin Netanyahu about this incident… It seems as though the co-pilot was perhaps a terrorist or perhaps a whack job, and he stabbed the pilot… The pilot was in very bad shape… But in a way, he was a hero to open the… https://t.co/BtPf9V0O5A pic.twitter.com/k8Yiy4Ftge — ANI (@ANI) September 30, 2026

credit – social media and Twitter

गंभीर जखमी झालेल्या कॅप्टन स्मित माछार

घटना शांत झाल्यानंतर आणि हल्लेखोराला ताब्यात घेतल्यानंतर, गंभीर जखमी झालेल्या कॅप्टन स्मित माछार आणि विमान कर्मचाऱ्यांनी कौशल्याने विमानावर पुन्हा नियंत्रण मिळवले. विमानातील सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, हे विमान सौदी अरेबियातील जवळच्या विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात यश आले. या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी प्रवासी यानिव हायून यांची भेट घेऊन त्यांचा विशेष सन्मान केला. नेतान्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले की, “यानिव, तुम्ही खरे नायक आहात. आपण सिंहांचे राष्ट्र आहोत!”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Enryakuji: 12 वर्षे जगाशी संपर्क नाही! जपानी बौद्ध भिक्षू सोगाकु तागुची यांची क्योटो पर्वतावर अंगावर काटा आणणारी कठोर तपश्चर्या

नक्की काय उद्देश होता?

या प्राणघातक हल्ल्यामागे नक्की काय उद्देश होता, याचा कसून शोध सध्या जागतिक तपास यंत्रणा आणि स्थानिक अधिकारी घेत आहेत. या संपूर्ण घटनेत भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माछार यांनी दाखवलेल्या अफाट धैर्याचे भारत आणि इस्रायलच्या राजनैतिक दूतावासांसह संपूर्ण आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक समुदायाकडून (Aviation Industry) भरभरून कौतुक केले जात आहे. एका मोठ्या संभाव्य हवाई दुर्घटनेला आपल्या जीवाची पर्वा न करता टाळणाऱ्या या दोन्ही नायकांचे जगभरातून अभिनंदन होत आहे.

Web Title: Captain smit machchhar flydubai flight attack trump netanyahu praise heroic act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Dubai
  • flight

संबंधित बातम्या

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स
1

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश
2

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या १७४ प्रवाशांचे विमान हायजॅक झाल्याची भीती; वैमानिकांच्या वादाने उडाला गोंधळ
3

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या १७४ प्रवाशांचे विमान हायजॅक झाल्याची भीती; वैमानिकांच्या वादाने उडाला गोंधळ

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी
4

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.