Charlie Kirk Murder wife Erica forgives his attacker
Charlie Kirk Murder Case Update in Marathi : वॉशिंग्टन : चार्ली कर्क (Charlie Kirk) यांच्या मृत्यूने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासह संपूर्ण अमेरिकेला हादरुन टाकले आहे. त्यांच्या खूनात सामील असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. 10 सप्टेंबर रोजी युटा व्हॅली विद्यापीठात सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान भर दिवसा त्यांची हत्या झाली होती.
रविवारी (२१ सप्टेंबर) अरिझोनाच्या स्टेट फार्म येथे चार्ली कर्क यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कर्क यांच्या जवळचे सहकारी आणि कार्यकर्ते जमले होते. ट्रम्प यांनी देखील उपस्थित लावी होती. यावेळी श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना चार्ली कर्क यांच्या पत्नी अत्यंत भावुक झाल्या. त्यांनी चार्ली यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले. धक्कादायक म्हणजे, पत्नी एरिका यांनी चार्ली कर्कच्या गुन्हेगाराला माफ केले.
Charlie Kirk Murder : टायलर रॉबिन्सने का केली कर्कची हत्या? मित्रासोबतच्या चॅटमधून झाला खुलासा
चार्ली कर्क यांच्या पत्नी एरिका अत्यंत भावूक झाल्या होत्या त्या म्हणाला की, तुम्ही ३ वर्षाच्या मुलीला काय सांगाल? तर मी तिला सांगितले की, बाळा तुझे बाबा तुमच्यावर खूप प्रेम करतात. काळजी करु नको. ते येशूकडे गेले आहेत. तसेच त्यांनी आरोपीला माफ करत म्हटले की, माझे पती तरुणांचे रक्षण करु इच्छित होते, यामुळे मी त्याला माफ करते. त्यांच्या या विधानाने अनेकांना आश्चर्य वाटले होते. टायरल रॉबिन्सन नावाच्या २२ वर्षीय तरुणाने द्वेषातून कर्क यांची हत्या केली होती.
दरम्यान चार्ली कर्क यांच्या स्मारक समारंभाला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि अनेक वरिष्ठ अमेरिकन अधिकारी उपस्थित होते. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी कर्क यांना स्वातंत्र्यासाठी शहीद सैनिक म्हणून संबोधले. तसेच त्यांचे विचार आणि वारसा टिकून राहिल असेही म्हटले. चार्ली कर्क हे उजव्या विचारसणीचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते होते.
Erika Kirk recalls the heartbreaking moment her young daughter asked her: “Where’s Daddy?”
“What do you tell a 3-year-old? She’s three. I said, ‘Baby, Daddy loves you so much. Don’t you worry, he’s on a work trip with Jesus so he can afford your blueberry budget.” pic.twitter.com/MMhJvF3Ajv
— Fox News (@FoxNews) September 13, 2025
चार्ली कर्क यांची हत्या कधी करण्यात आली?
बुधवारी (१० सप्टेंबर) युटा व्हॅली विद्यापीठात सुरु असलेल्या कार्यक्रमात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
चार्ली कर्क यांची हत्या कोण केली?
चार्ली कर्क यांच्या हत्येवर तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार्ली कर्क यांची हत्या २२ वर्षाच्या टायलर रॉबिन्सन याने केली आहे.
चार्ली कर्क यांची हत्या करणाऱ्या आरोपीवर पत्नी एरिका काय म्हणाल्या?
चार्ली कर्क यांच्या पत्नी एरिका यांनी आरोपी टायलर रॉबिन्सनला माफ केले असून त्या म्हणाल्या की, माझे पती तरुणांचे रक्षण करु इच्छित होते, यामुळे मी त्याला माफ करते.
कॉमेडियन जिमी किमेलचा शो झाला बंद…डोनाल्ड ट्रम्पला झाला अत्यानंद, चार्ली कर्कच्या हत्येशी आहे संबंध