कॉमेडियन जिमी किमेलचा शो झाला बंद...डोनाल्ड ट्रम्पला झाला अत्यानंद, चार्ली कर्कच्या हत्येशी आहे संबंध (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America News in marathi : वॉशिंग्टन : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि टेलेव्हिजन होस्ट जिमी किमेल यांचा लेट नाईट टॉ शो ऑफ एअर करण्यात आला आहे. मात्र यामुळे अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा आनंद झाला आहे. जिमी किमेलने ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क (Charlie Kirk) यांच्या हत्येवर आक्षेपहार्य टीप्पणी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
Charlie Kirk : चार्ली कर्क हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; खूनापूर्वी मिळाला होता सतर्कतेचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जिमी किमेल यांच्या शोवरील बंदी नंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यांना या कारवाईला ‘शानदार’ म्हटले. चार्ली कर्क हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. चार्ली कर्क उजव्या विचासरणीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या हत्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
पण जिमी किमेलने कर्क यांच्या त्याच्या लेट नाईट शोमध्ये आक्षेपहार्य टीप्पणी केली होती. किमेल यांनी म्हटले होते की, कर्क यांच्या हत्येमागे मेक द अमेरिका ग्रेट अगेन गटाचा हात असण्याची शक्यता आहे. किंवा त्यांची हत्या राजकीय फायदा मिळवण्यासाठी घडवून आणली असेल.
जिमी किमेल यांच्या या विधानाने कंझर्व्हेटिव पक्षाच्या गटाध्ये संताप उसळला होचा. यामुळे फेडरल कम्युनिकेशन कमिशन (FCC) चे चेअरमॅन ब्रॅंडन यांनी किमेल यांच्या विधानाला तीव्र विरोध केला. त्यांनी म्हटले की, जिमी किमेल यांचे विधान हे न्यूज डिस्टॉर्शनचा भाग आहे, यामुळे ब्रॉडकास्टिंग नियमांचे उल्लंघन झाले आहे. म्हणून त्यांनी ABC चॅनेलला जिमी किमेलविरोधात कारवाई करण्याची धमकी दिली, असे न केल्यास चॅनलाचे लायसन्स रद्द केले जाऊ शकते असे सांगितले.
यामुळे ABC ने तातडीने जिमी किमेलचा शो ऑफ एअर केला. यामुळे सध्या अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी ही कारवाई झाल्यानंतर लगेच सोशल मीडिया ट्रुथवर आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, अमेरिकेसाठी आनंदाची बातमी आहे, जिमी किमेलसारखा टॅलेंटलेस, कमी रेटिंग मिळवणारा शो अखेर बंद झाला आहे. ABC ने योग्य निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी स्टिफन कोलबर्टचा उल्लेख करत, किमेलचा शोची रटिंग कोलबर्टपेक्षाही वाईट असल्याचे म्हटले.
जिमी किमेल यांचा शो ऑफ-एअर का करण्यात आला?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे सहकारी चार्की कर्क यांच्या हत्येवर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे जिमी किमेल यांचा शो बंद करण्यात आला.
डोनाल्ड ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया होती?
डोनाल्ड ट्रम्प यांनी जिमी किमेलचा शो ऑफ-एअर होताच आनंद व्यक्त केला आणि ABC ने चांगला निर्णय घेतला असल्याचे म्हटले.
Charlie Kirk Murder : टायलर रॉबिन्सने का केली कर्कची हत्या? मित्रासोबतच्या चॅटमधून झाला खुलासा