China backs India against Trump's tariff policy urges opposition to trade wars
चीनच्या भारतातील राजदूत झू फेईहोंग यांनी भारताला ट्रम्पच्या टॅरिफ आणि व्यापार युद्धास विरोध करण्याचे आवाहन केले.
अमेरिकेने भारतावर लादलेले 50% शुल्क ‘अन्याय्य आणि विसंगत’ असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत-चीन द्विपक्षीय व्यापार मजबूत झाला असून या वर्षी $88 अब्जाच्या पातळीवर पोहोचला आहे.
China backs India : चीनच्या भारतातील राजदूत झू फेईहोंग यांनी भारताला स्पष्ट संदेश दिला आहे की ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणांवर आणि व्यापार युद्धावर कठोरपणे विरोध करावा. आशियातील दोन सर्वात मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत आणि चीनने समान आणि सुव्यवस्थित बहुपक्षीय आर्थिक व्यवस्था टिकविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. माध्यमांशी बोलताना झू फेईहोंग म्हणाले, “इतिहास बदलता येत नाही, परंतु आपण भविष्य निश्चितपणे बदलू शकतो. भारत आणि चीनने जागतिक आर्थिक व्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी एकत्र काम करावे आणि विकसनशील देशांच्या हितांचे संरक्षण करावे.”
झू फेईहोंग यांनी अमेरिकेने भारतावर लादलेले 50% शुल्क ‘अन्याय्य आणि विसंगत’ असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, “अमेरिकेला मुक्त व्यापाराचा बराच काळ फायदा झाला आहे, परंतु आता ते शुल्काचा शस्त्र म्हणून वापरून जास्त किंमत आकारण्याचा प्रयत्न करत आहेत.” त्यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या शुल्क आणि व्यापार युद्धाला विरोध करणे केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेच्या हिताचे आहे. विकसनशील देशांनी एकत्र येऊन बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेला पाठिंबा द्यावा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Data Leak : 500 रुपयांना लोकेशन, 2000 रुपयांना मोबाईल रेकॉर्ड! पाकिस्तानात भीषण डेटा लीक; मंत्र्यांपर्यंत माहिती विक्रीला
झू फेईहोंग यांनी जागतिक परिस्थितीवर बोलताना नमूद केले की जग शांतता आणि युद्ध, संवाद आणि संघर्ष, सहकार्य आणि स्पर्धा यांमध्ये निवड करीत आहे. त्यांनी दोन्ही देशांना जागतिक दृष्टी ठेवण्यास आणि जागतिक शांतता, सामायिक विकास तसेच जागतिक प्रशासन सुधारणांमध्ये योगदान देण्यास प्रोत्साहित केले.
❗️”भारत और चीन को किसी भी प्रकार के टैरिफ और व्यापार युद्ध का कड़ा विरोध करना चाहिए” – शू फेइहोंग
भारत में चीन के राजदूत शू फेइहोंग ने द्वितीय विश्व युद्ध में जीत की 80वीं वर्षगांठ पर आयोजित सेमिनार में कहा, ”🇮🇳-🇨🇳 को एक समान और व्यवस्थित बहुध्रुवीय दुनिया और सबके लिए फायदेमंद… pic.twitter.com/FHxPBJInXt
— RT Hindi (@RT_hindi_) September 8, 2025
credit : social media
राजदूत झू फेईहोंग यांनी म्हटले की, भारत-चीन द्विपक्षीय व्यापार मजबूतपणे वाढला आहे. या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत द्विपक्षीय व्यापार $88 अब्ज च्या पातळीवर पोहोचला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 10.5% अधिक आहे. ते म्हणाले, “चीन भारतासोबत विकास धोरणांमध्ये समन्वय वाढवण्यास तयार आहे आणि आधुनिकीकरणाचा अनुभव सामायिक करण्यास इच्छुक आहे.” यामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक आणि औद्योगिक संबंधांना चालना मिळणार आहे.
झू फेईहोंग यांनी सांस्कृतिक आणि लोकसंवादाच्या महत्वावर भर दिला. चीनच्या राजदूत मिशनने या वर्षी भारतीय नागरिकांना 2,40,000 पेक्षा अधिक व्हिसा जारी केले आहेत. तसेच, तिबेटमधील कांग्रिनबोक आणि मापाम युको येथे भारतीय तीर्थयात्रा पुन्हा सुरू झाली आहेत. भारतानेही चिनी नागरिकांना पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. राजदूत म्हणाले, “सांस्कृतिक देवाणघेवाण केवळ लोकांमध्ये आपसी समज निर्माण करत नाही, तर आर्थिक आणि सामाजिक संबंधही दृढ करतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Gen ZProtest : 18 जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक जखमी; नेपाळमध्ये PM ओलींनी बोलावली आपत्कालीन बैठक
झू फेईहोंग यांचा संदेश स्पष्ट आहे भारताने ट्रम्पच्या टॅरिफ धोरणांवर आणि व्यापार युद्धावर ठाम विरोध करावा, बहुपक्षीय व्यापार व्यवस्था टिकवावी आणि जागतिक शांतता व विकासात सक्रिय योगदान द्यावे. भारत-चीन संबंध आता केवळ आर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावरही मजबूत होत आहेत.