Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ocean Economy: ‘समुद्रात ड्रॅगनची भिंत!’ आता चीनने रोखले दक्षिण चीन समुद्राचे प्रवेशद्वार; जगाचा 33% व्यापार संकटात

South China Sea : बीजिंगने प्रथमच दक्षिण चीन समुद्राच्या प्रवेशद्वारावर अडथळे उभारले आहेत. हा मार्ग जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जागतिक व्यापारापैकी ३३ टक्के व्यापार याच मार्गावरून होतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 16, 2026 | 02:15 PM
china blocks south china sea entry scarborough shoal global trade impact 2026

china blocks south china sea entry scarborough shoal global trade impact 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनची मोठी नाकेबंदी
  • होर्मुझपेक्षाही मोठे संकट
  • सॅटेलाईट फोटोंचा खुलासा

China barrier South China Sea Scarborough Shoal : जगाची अर्थव्यवस्था ज्या सागरी मार्गावर अवलंबून आहे, त्या ‘दक्षिण चीन समुद्रात’ (South China Sea) चीनने आतापर्यंतचे सर्वात घातक पाऊल उचलले आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आणि उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांनुसार, चीनने या समुद्राच्या प्रवेशद्वारावरच अडथळे उभे करण्यास सुरुवात केली आहे. ही केवळ साधी नाकेबंदी नसून, जागतिक व्यापाराची गळा आवळण्याचा हा एक सुनियोजित कट असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फिलीपिन्स आणि जपानसोबत सुरू असलेल्या वादात आता चीनने आपला आक्रमक चेहरा जगाला दाखवला आहे.

स्कारबोरो शोलजवळ ‘लोखंडी भिंत’

रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या व्हेंटर उपग्रहाच्या छायाचित्रांनी सर्वांचे धाबे दणाणले आहेत. चीनने स्कारबोरो शोलजवळ एक विशाल अडथळा, एक मुख्य युद्धनौका आणि चार मोठ्या मासेमारी बोटींची तैनाती केली आहे. फिलीपिन्स तटरक्षक दलाचे प्रवक्ते जय टॅरिएला यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने ३५२ मीटर लांबीचा एक भौतिक अडथळा समुद्रात उभारला आहे. या नाकेबंदीमुळे चीनच्या परवानगीशिवाय कोणत्याही देशाला किंवा जहाजाला या मार्गावरून जाणे आता अशक्य होणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘एक सैनिक = 1 अब्ज डॉलर्स’, मोजतबा खामेनीचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई गर्जले; दिले थेट ट्रम्पना चॅलेंज

पाणबुड्यांचा पहारा आणि तांत्रिक वेढा

चीनने केवळ पृष्ठभागावरच नाही, तर समुद्राच्या तळाशीही आपली पकड मजबूत केली आहे. या भागात चीनने सहा आधुनिक पाणबुड्या तैनात केल्या असून, तेथील प्रत्येक हालचालीवर बीजिंगची नजर आहे. कृत्रिम बेटे बांधून झाल्यानंतर आता नैसर्गिक प्रवेशद्वारं रोखण्याचे चीनचे हे धोरण शेजारील देशांसाठी धोक्याची घंटा आहे. २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फिलीपिन्सच्या बाजूने निकाल दिला असला, तरी चीनने या कायद्याला केराची टोपली दाखवत आपली मुजोरी सुरूच ठेवली आहे.

Satellite images appear to show Chinese vessels and a floating barrier at the entrance to the disputed Scarborough Shoal in the South China Sea, according to Reuters. pic.twitter.com/4PqZazDvnG — TaiwanPlus News (@taiwanplusnews) April 15, 2026

credit – social media and Twitter

जगासाठी हा मार्ग का आहे जीवनवाहिनी?

दक्षिण चीन समुद्र हा जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्ग आहे. संपूर्ण जगाच्या एकूण व्यापारापैकी ३३ टक्के व्यापार याच मार्गातून होतो. सिंगापूर, जपान, तैवान आणि फिलीपिन्स यांसारख्या विकसित देशांची अर्थव्यवस्था याच समुद्रावर अवलंबून आहे. जर चीनने हे प्रवेशद्वार कायमचे बंद केले किंवा त्यावर स्वतःचे नियंत्रण मिळवले, तर जागतिक बाजारपेठेत वस्तूंच्या किमती गगनाला भिडतील. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे अनेक देशांमध्ये महागाईचा आगडोंब उसळू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Oil Sanctions : जागतिक तेल बाजारात भूकंप? इराणच्या तेल खरेदीवरून अमेरिका आणि चीनमध्ये जुंपली, वाचा सविस्तर अपडेट

होर्मुझपेक्षाही भयंकर परिस्थिती

अनेकांना वाटते की होर्मुझची सामुद्रधुनी ही तेल व्यापारासाठी महत्त्वाची आहे, पण दक्षिण चीन समुद्राचे महत्त्व त्यापेक्षाही कैक पटीने जास्त आहे. येथे केवळ ऊर्जाच नाही, तर अन्नधान्य, तंत्रज्ञान आणि औद्योगिक कच्च्या मालाची वाहतूक होते. चीनने आता या मार्गाचा ‘पोलीस’ होण्याचे ठरवले आहे. अमेरिकेने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी या भागात अमेरिकन नौदलाची उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात हा भाग तिसऱ्या महायुद्धाचे केंद्र ठरतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनने दक्षिण चीन समुद्रात नक्की काय केले आहे?

    Ans: चीनने दक्षिण चीन समुद्राच्या प्रवेशद्वारावर (स्कारबोरो शोल) ३५२ मीटरचा अडथळा उभारला असून, तिथे युद्धनौका आणि सहा पाणबुड्या तैनात केल्या आहेत.

  • Que: दक्षिण चीन समुद्राचे जागतिक महत्त्व काय आहे?

    Ans: जगाच्या एकूण व्यापारापैकी ३३% व्यापार याच मार्गावरून होतो. जपान, सिंगापूर आणि तैवानसारख्या देशांसाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे.

  • Que: आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यावर काय म्हटले होते?

    Ans: २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फिलीपिन्सचा दावा मान्य करत हा भाग चीनचा नसल्याचा निकाल दिला होता, मात्र चीनने तो मान्य करण्यास नकार दिला आहे.

Web Title: China blocks south china sea entry scarborough shoal global trade impact 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • America
  • China
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Iran Oil Sanctions : जागतिक तेल बाजारात भूकंप? इराणच्या तेल खरेदीवरून अमेरिका आणि चीनमध्ये जुंपली, वाचा सविस्तर अपडेट
1

Iran Oil Sanctions : जागतिक तेल बाजारात भूकंप? इराणच्या तेल खरेदीवरून अमेरिका आणि चीनमध्ये जुंपली, वाचा सविस्तर अपडेट

World War 3: ‘एक सैनिक = 1 अब्ज डॉलर्स’, मोजतबा खामेनीचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई गर्जले; दिले थेट ट्रम्पना चॅलेंज
2

World War 3: ‘एक सैनिक = 1 अब्ज डॉलर्स’, मोजतबा खामेनीचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई गर्जले; दिले थेट ट्रम्पना चॅलेंज

Hormuz Passage : ‘ओमानमार्गे रस्ता देतो, पण…’ इराणचा अमेरिकेला मोठा प्रस्ताव; अडकलेल्या 20,000 खलाशांची होणार सुटका?
3

Hormuz Passage : ‘ओमानमार्गे रस्ता देतो, पण…’ इराणचा अमेरिकेला मोठा प्रस्ताव; अडकलेल्या 20,000 खलाशांची होणार सुटका?

Iran Ports: अरबी समुद्रात USचे 5,000 सैनिक रणांगणात; इराणच्या बंदरांना लष्करी वेढा; ट्रम्प यांचा ‘नो कॉम्प्रोमाईज’ फॉर्म्युला
4

Iran Ports: अरबी समुद्रात USचे 5,000 सैनिक रणांगणात; इराणच्या बंदरांना लष्करी वेढा; ट्रम्प यांचा ‘नो कॉम्प्रोमाईज’ फॉर्म्युला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.