China extends loan repayment period of $2 billion to Pakistan by one year
इस्लामाबाद: सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात अडकलेला आहे. दरम्यान पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. चीनने पाकिस्तानवर दया दाखवत एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसारह, चीनने दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या कर्जाच्या परतफेडची मुदत पुन्हा वाढवली आहे. सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहाता चीनचे हे पाऊल त्यांच्यासाठी दिलासादायक मानले जात आहे.
खरं तर 2024 पर्यंत पाकिस्तानला कर्जाची परतफेड करायची होती. पंरतु चीनने अंतिम मुदत वाढवली आहे.
चीनचे हे पाऊल पाकिस्तानच्या सद्य परिस्थितीत आर्थिक मदत मानले जात आहे. सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. विशेष करुन पाकिस्तानवर परकीय चलन साठ्यावरील दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाकिस्तानवर सध्या 92% परदेशी कर्ज आहे. यामध्ये बुहपक्षीय आणि द्विपक्षीय कर्जदात्यांचा आणि आंतरराष्ट्रीय रोखे यांचा समावेश आहे. द्विपक्षीय कर्ज देणाऱ्यांमध्ये चीन अव्वन स्थानी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅलिफोर्नियात हिंदू मंदिराची तोडफोड; भारताकडून कठोर कारवाईची मागणी
पाकिस्तान पुन्हा कर्ज घेण्याच्या तयारीत
दरम्यान पाकिस्तान पुन्हा कर्ज घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान IMF कडून कर्ज घेणार आहे. पाकिस्तानला रोख रकमेची टंचाई भासत असल्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून नवीन कर्जाची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे एक पथक IMF सोबत चर्चेसाठी पोहोचले आहे.
याआधी इस्लामाबादने 7 अब्ज डॉलर्सची एक्सटेंडेट फंड फॅसिलिटी मिळवली होती. या कर्जाने पाकिस्तानच्या आर्थिक संकटात मोठी मदत झाली. सध्या पाकिस्तान सरकार पुन्हा कर्ज घेण्याच्या विचारात आहे.
चीनने दोन वेळा कर्ज परतफेडीची मुदत वाढवली
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने चीनकडून कर्ज परतफेडीसाठी कालावधी वाढवण्याची विनंती केली होती. पाकिस्तानची तीनला कर्ज परतफेडीच्या मुदतीत वाढ करण्याची विनंती ही दुसरी वेळ आहे. पाकिस्तानचे उपमुख्यमंत्री इशाक दार यांनी चीन दौऱ्यादरम्यान औपचारिक विनंती केली होती.
पाकिस्तानने चीनकडून शस्त्रे खरेदी केली
गेल्या वर्षीच्या अखेरीस 2024 डिसेंबर महिन्यात पाकिस्तानने चीनकडून 40 अत्याधुनिक J-35 स्टील्थ लढाऊ विमाने खरेदी केली होती. या लढाऊ विमानशिवाय पाकिस्तान चीनकडून पाणबुडी देखील खरेदी केले आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घकाळापासून संबंध चांगले आहेत.
पाकिस्तान-चीन लष्करी भागीदारी
पाकिस्तानच्या लष्करी आधुनिकीकरणात चीनची भूमिका महत्त्वाची मानली जाते. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून जवळची धोरणात्मक भागीदारी आहे. ही भागीदारी प्रामुख्याने प्रादेशिक सुरक्षा आणि भारताच्या वाढत्या सामर्थ्याच्या चिंतेतून विकसित झाली आहे. पाकिस्तानच्या नौदल आणि हवाई दलाच्या आधुनिकीकरणात चीनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.