कुलभूषण जाधवच्या अपहरणात सहभागी मुफ्ती मीरची हत्या; मशिदीबाहेर नेमकं काय घडलं? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शुक्रवारी (08 मार्च) रात्री बलुचिस्तामध्ये तुर्बत शहराक मुस्लमि स्कॉलर मुफ्ती शाह मीर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुफ्ती शाह मीर भारतीय व्यापारी आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरण प्रकरणात सामील होता. त्याने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला कुलभूषण यांच्या अपहरणात मदत केल्याचा आरोप आहे. दरम्यान, रमजानचा महिना सुरु असल्याने मुफ्ती शाह मीर रात्र नमाज अदा करुन मशिदीतून बाहेर पडत असताना मोटरसायकलस्वारांनी त्याच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या मीरला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कोण होता मुफ्ती शाह मीर?
मुफ्ती शाह मीर पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI सोबत संबंधित होता. त्याच्यावर अनेक बेकायदेशीर कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप होता. तो पाकिस्तानच्या कट्टरपंथी राजकीय संघटना जमीयत उलेमा-ए-इस्लाम (JUI-F) चा सदस्य होता. त्याच्यावर ISI साठी ड्रग्स आणि शस्त्रास्त्र तस्करी करण्याचे आरोपही होते.
तसेच इराणमधूमन भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या अपहराणक को मुख्य भूमिकेत असल्याचा देखील आरोप त्याच्यावर होता. तसेच त्याचा प्रभाव पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियाईमध्ये मोठ्या प्रमाणात होता. पाकिस्तान सैन्यासाठी गुप्त माहिती गोळा करणे आणि पाकव्याप्त प्रदेशातील विद्रोही गटांवर पाळत ठेवण्याचे कार्य तो करत होता.
कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात भूमिका
भारतीय व्यापारी आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण यादव यांनी 2016 मध्ये इराण-पाकिस्तान सीमेजवळून अपहरण करण्यात आले होते. या अपहरणाचा कट जैश अल-अदल या दहशतवादी गटाने रचला होता. यामध्ये शाह मीरने ISI साठी जाधवला पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात देण्यास मदत केली.
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरी आणि विध्वंसक कारवायांते आरोप केले. त्यानंतर त्यांना 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. भारत सरकारने हा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला आणि जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळाली आणि भारताला राजनैतिक प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले.
शाही मीरच्या हत्येमागचे कारण
मुफ्ती शाही मीरवर याआधीही दोन वेळा हल्ला झाला होता. गेल्या आठवड्यात JUI-F पक्षाच्या दोन सदस्यांची हत्या करण्यात आली होती. सध्या शाही मीरच्या हत्येचा तपास सुरु आहे. तज्ज्ञांच्या मते, बलुचिस्तानमधील बंडखोर गटांनी हे हत्याकांड घडवून आणले असेल, कारण मीर ISI साठी बलुच बंडखोरांविरोधात काम करत होता.
मुफ्ती शाह मीर हा ISI साठी गुप्त कारवाया करणारा एजंट होता. त्याने भारताविरुद्ध कट रचण्यात मदत केली होती आणि त्याचा कुलभूषण जाधवच्या अपहरणात मोठा सहभाग होता. मात्र, त्याच्याविरोधातील राग आणि शत्रुत्वामुळे अखेरीस त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.