Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Flood: चीनमध्ये पुरामुळे प्रचंड विध्वंस; 25 जणांचा गेला बळी, तर भारतात तीव्र उष्णतेचा कहर; पाहा VIDEO

China Flood Crisis: भारत तीव्र उष्णतेचा सामना करत असतानाच, चीनमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पुरामुळे २५ जणांचा बळी गेला असून, अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 21, 2026 | 02:45 PM
china flood crisis guangdong 25 dead india extreme heatwave comparison 2026

china flood crisis guangdong 25 dead india extreme heatwave comparison 2026

Follow Us
Follow Us:
  • चीनमध्ये जलप्रलय
  • ग्वांगडोंग आणि हुबेईमध्ये हाहाकार
  • भारतात जीवघेणी उष्णता

China Flood Crisis May 2026 : जागतिक हवामान बदलाचा (Climate Change) अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक परिणाम सध्या आशिया खंडातील दोन मोठ्या शेजारी देशांमध्ये पाहायला मिळत आहे. एका बाजूला भारत देश सध्या कडक ऊन, जीवघेणी उष्णता आणि असह्य उष्णतेच्या लाटांशी (Heatwaves) लढा देत आहे, तर दुसरीकडे शेजारील देश चीनमध्ये निसर्गाचे संपूर्णपणे वेगळे रूप पाहायला मिळत आहे. चीनमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे अनेक प्रांतांत भीषण महापूर आला आहे. या महापुराच्या तडाख्यात सापडून आतापर्यंत किमान २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. रस्त्यांवरून नद्या वाहू लागल्या असून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली आहे.

चीनमधील शहरांना महासागराचे स्वरूप; गाड्या खेळण्यासारख्या वाहून गेल्या!

मध्य आणि नैऋत्य चीनमधील परिस्थिती सध्या अत्यंत भयावह बनली आहे. ग्वांगडोंग, गुइझोउ आणि हुबेई या प्रांतांमध्ये पावसाने गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. पूर परिस्थिती इतकी गंभीर आहे की शहरातील मुख्य रस्त्यांवर उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या पाशवी पाण्याच्या प्रवाहाने लाकडाच्या ओंडक्यासारख्या वाहून गेल्या आहेत. दक्षिण ग्वांगडोंग प्रांतातील दाचोंग शहरात तर रस्ते पूर्णपणे गायब झाले असून, तिथे फक्त पुराचे पाणी दिसत आहे. रस्त्यांवर उभ्या असलेल्या दुचाकी आणि स्कूटर्स पूर्णपणे पाण्याखाली गेल्या असून, बाहेरून फक्त त्यांचे हँडलबार दिसत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crude Oil : होर्मुझचं वर्चस्व पूर्ण कमी करणार; आता डोक्यावरची टांगती तलवार काढून टाकण्यासाठी UAEची ‘ADNOC’ सज्ज

झाडावर चढून वाचवला जीव; लष्कराकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन!

सोशल मीडियावर चीनमधील या महापुराचे अंगावर काटा आणणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये, एका व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका उंच झाडाचा आश्रय घेतला होता, त्याला आपत्कालीन व्यवस्थापन आणि बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. मध्य चीनमधील हुबेई प्रांतात छातीइतक्या खोल पाण्यात अडकलेल्या वृद्ध लोकांना आणि लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी चीनी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीला वाचवण्यासाठी बचाव पथकाला तासनतास संघर्ष करावा लागत आहे. हुनान, सिचुआन आणि शांक्सी प्रांतांमध्ये प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.

#WATCH | Heavy #rainfall caused severe flooding across parts of southern and central #China, with streets submerged in Guangdong province. More than 20 deaths were recorded in several regions hit by the natural disaster. pic.twitter.com/tScioHWRCW — The Federal (@TheFederal_News) May 20, 2026

credit – social media and Twitter

पावसाचे मुख्य कारण काय? चीनी हवामानशास्त्रज्ञांचा खुलासा

चीनी हवामान खात्याच्या (CMA) तज्ज्ञांनुसार, या अभूतपूर्व पावसामागे जागतिक वातावरणातील बदल कारणीभूत आहेत. बंगालचा उपसागर, दक्षिण चीन समुद्र आणि पॅसिफिक महासागरामधून मोठ्या प्रमाणावर आलेली आर्द्रता (Moisture) एकाच ठिकाणी जमा झाली आहे. ही आर्द्रता वाहून नेणारी हवामान प्रणाली अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असल्यामुळे, एकाच भौगोलिक क्षेत्रावर सलग अनेक दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्यांनी आपली पातळी ओलांडली असून ठिकठिकाणी डोंगराळ भागात भीषण भूस्खलन (Landslides) होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Tension : ‘आम्ही फक्त काही दिवस थांबू…’ एअर फोर्स वनमधून उतरताच ट्रम्प बरसले; अवघ्या एका तासावर टळले महायुद्ध

दुसरीकडे भारत उष्णतेच्या भट्टीत! निसर्गाचा भयानक समतोल

चीनमधील या जलप्रलयाच्या अगदी उलट परिस्थिती भारतात पाहायला मिळत आहे. भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. कडक ऊन आणि रात्रीच्या वेळीही वाहणारे उष्ण वारे (लू) यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाच वेळी दोन शेजारील देशांमध्ये घडणाऱ्या या परस्परविरोधी हवामान घटना ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा असून, निसर्गाचा समतोल वेगाने बिघडत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.

Web Title: China flood crisis guangdong 25 dead india extreme heatwave comparison 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • China
  • flood
  • World news

संबंधित बातम्या

China Rain :चीनच्या युनेस्को वारसा स्थळी पर्यटकांची सुखरूप सुटका
1

China Rain :चीनच्या युनेस्को वारसा स्थळी पर्यटकांची सुखरूप सुटका

DGMA : Black Sea मध्ये भारतीय खलाशांवर रशियन हल्ले; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना विशेष पत्र अन् गंभीर इशारा
2

DGMA : Black Sea मध्ये भारतीय खलाशांवर रशियन हल्ले; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना विशेष पत्र अन् गंभीर इशारा

Kargil: कारगिल युद्धाच्या 27 वर्षांनंतर मोठा खुलासा; इस्रायलच्या ‘त्या’ गुप्त मदतीमुळे मिराज-2000 ने घडवला होता टायगर हिलवर इतिहास
3

Kargil: कारगिल युद्धाच्या 27 वर्षांनंतर मोठा खुलासा; इस्रायलच्या ‘त्या’ गुप्त मदतीमुळे मिराज-2000 ने घडवला होता टायगर हिलवर इतिहास

Russia Economy: पुतीन सरकारच्या तिजोरीत खडखडाट! 25 वर्षांत पहिल्यांदाच रशियाने विकले 44 टन सोने, आता हिऱ्यांचा लिलाव
4

Russia Economy: पुतीन सरकारच्या तिजोरीत खडखडाट! 25 वर्षांत पहिल्यांदाच रशियाने विकले 44 टन सोने, आता हिऱ्यांचा लिलाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.