पूर्व कॉंगोमध्ये ISIS समर्थित बंडखोरांचा चर्चवर हल्ला; २१ जणांची निर्घृण हत्या, अनेक घरेही जाळली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
थायलंड कंबोडिया संघर्षानंतर आता कॉंगोमधून दहशतवादी हल्ल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी (२७ जुलै) पहाटे पूर्व कॉंगोच्या कोमांड प्रदेशात इस्लामिक स्टेटशी संबंधित विद्रोह्यांनी कॅथलिक चर्च कंपाऊंडवर हल्ला केला. या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे १ च्या सुमारास ही घटना घडली. या हलल्याने संपूर्ण कॉंगो प्रदेश हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी चर्चमधील लोकांना लक्ष्य केले. तसेच जवळपासच्या अनेक घरांना पेटवून दिले. कोमांडाचे नागरी समाज समन्वयक डियुडोने दुरांथाबो यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात २१ हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला २१ हून अधिक लोकांची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती मिळाली. तसेच तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत, तसेच अनेक घरेही जाळून टाकण्यात आली आहेत. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. याच वेळी इटुरी प्रांतात देखील कॉंगो आर्मीच्या प्रवक्त्याने १० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
कॉंगोच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, कोमांडापासून काही अंतरावर असलेल्या एका चर्चवर हल्ला झाला. हल्लेखोरांनी लोकांवर चाकूने, बंदुकीने हल्ला केला. तसेच अनेक घरांना आणि दुकानांना आग लावली. सध्या या घटनेला इस्लामिक दहशवाद्यांच्या गटाशी जोडले जात आहे. गेल्या अनेक दशकांपासून युगांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोच्या सीमेवर इस्लामिक दहशतवादी विद्रोही सक्रिया आहे. या दहशतवाद्यांकडून अनेक वेळा कॉंगोच्या नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.
BREAKING: At least 21 people have been killed in an attack on a church in eastern Congo by an Islamic State-backed rebel group, a civil leader says. https://t.co/Re4PbB8e7A
— The Associated Press (@AP) July 27, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, युगाडांम्ये १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात वेगवेगळ्या एडीएफ गटांची स्थापना झाल होती. त्यानंतर २००२ मध्ये युगांडाच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर एडीएफने कॉंगोमध्ये कारवाया सुरु केल्या. तेव्हापासून हा संघर्ष सुरु झाला. आतापर्यंत हजारो नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. २०१९ मध्ये इस्लामिक स्टेटशी या एडीएफ संगटनांनी हातमिळवणी केली. पूर्व आफ्रिकी पूर्व आफ्रिकेत सुरु असलेल्या या संघर्षामुळे हजारो सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या घटनेने कॉंगोमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.