
china military coup rumors xi jinping assassination attempt zhang youxia arrest beijing 2026
China coup rumors January 2026 update : जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक मानले जाणारे चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) सध्या स्वतःच्याच सैन्याकडून मिळालेल्या आव्हानामुळे संकटात सापडल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनची राजधानी बीजिंगमध्ये जे काही घडत आहे, ते ‘नॉर्मल’ नक्कीच नाही. भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि जागतिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये एका मोठ्या लष्करी सत्तापालटाचा (Coup Attempt) प्रयत्न झाला असून, त्यामध्ये शी जिनपिंग यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी २०२६ च्या रात्री पश्चिम बीजिंगमधील प्रसिद्ध ‘जिंग्शी हॉटेल’मध्ये (Jingshi Hotel) मोठा गोळीबार झाला. असा दावा केला जात आहे की, लष्करातील काही बंडखोर तुकड्यांनी शी जिनपिंग यांना ताब्यात घेण्याचा कट आखला होता. मात्र, जिनपिंग यांच्या निष्ठावान ‘सेंट्रल गार्ड ब्युरो’ने (CGB) हा प्रयत्न हाणून पाडला. या चकमकीत ९ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर शी जिनपिंग अनेक दिवस सार्वजनिक कार्यक्रमांतून गायब होते, ज्याने अफवांना अधिक बळ दिले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक
या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत चीनचे अत्यंत प्रभावशाली जनरल झांग यूश्या (Zhang Youxia). झांग हे जिनपिंग यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. मात्र, २४ जानेवारी रोजी चीनच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे जाहीर केले की, झांग यूश्या आणि लष्कराचे रणनीती प्रमुख ल्यू झेनली यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर ‘भ्रष्टाचार आणि शिस्तभंगा’चा आरोप ठेवण्यात आला असला तरी, विश्लेषकांच्या मते हा लष्करातील शी जिनपिंग यांच्या विरोधकांना संपवण्याचा एक भाग आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WeChat आणि Weibo वर (जरी चीनने ते सेन्सॉर केले असले तरी) अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तियानजिनच्या वुकिंग जिल्ह्यातून बीजिंगच्या दिशेने जाणारे रणगाडे आणि लष्करी वाहनांचे मोठे ताफे दिसत आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) निवडक तुकड्यांना ‘लेव्हल-१’ लढाऊ तयारीवर ठेवण्यात आले आहे. मेट्रो सेवांचे काही भाग बंद करणे आणि बीजिंगमधील संवेदनशील रस्ते सील करणे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dhaka To Karachi : विमान सेवा सुरू, कट रचणे संपले! कराचीमध्ये बांगलादेशी विमानाचे शाही स्वागत; पाहा VIRAL VIDEO
चीनमधील अंतर्गत अस्थिरता केवळ त्या देशापुरती मर्यादित राहत नाही. इतिहास सांगतो की, जेव्हा जेव्हा चिनी नेतृत्वावर अंतर्गत दबाव येतो, तेव्हा ते जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी तैवानवर हल्ला किंवा भारतासोबतच्या सीमेवर (LAC) तणाव निर्माण करू शकतात. भारतीय गुप्तचर संस्था चीनच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शी जिनपिंग यांची लष्करावरील पकड सैल होणे म्हणजे जागतिक राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात असू शकते.
Ans: १८ जानेवारी रोजी बीजिंगमधील एका हॉटेलमध्ये झालेला गोळीबार आणि लष्करातील सर्वोच्च जनरल झांग यूश्या यांची अचानक झालेली अटक यामुळे या अफवांना जोर मिळाला आहे.
Ans: झांग यूश्या हे चिनी लष्कराचे सर्वात शक्तिशाली अधिकारी आणि सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष होते. ते शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
Ans: अधिकृत चिनी माध्यमांनुसार जिनपिंग सत्तेवर आहेत, मात्र गेल्या काही दिवसांत त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीत घट झाली असून बीजिंगमध्ये कडक लष्करी सुरक्षा तैनात आहे.