China mountaineer dies from falling muntain video viral
China Mountaineer Death : बीजिंग : चीनमध्ये (China) एक खळबळजनक घटना घडली आहे. एका गिर्यारोहकाचा दु:खद मृत्यू झाला आहे. चीनच्या सिचुआन प्रातांतील माउंट नामा पर्यवतावरवर गिर्यारोहक बर्फाळ दरीत कोसळला आहे. २७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गिर्यारोहक शिखरावर फोटो काढण्यासाठी उभा राहिला होता. यावेळी त्याने त्याच्या हातातील सेफ्टी दोरी सोडली आणि हा दुर्दैवी अपघात घडला.
चॅनेल न्यूज एशियाच्या वृत्तानुसार, ३१ वर्षीय हाँग असे या व्यक्तीचे नाव होते. हाँग १८,३३२ फूट उंचीवर आपल्या गटासोबत असताना ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगने त्याचा सेफ्टी दोर काढून टाकला आणि फोटो काढण्यासाठी पुढे सरकला. पण अचानक बर्फावरुन त्याचा पाय घसरला आणि तो उतारावरुन घसतर खाली गेला.
चीनच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी सध्या या घटनेचा तपास करत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँग आणि त्याचा गट कोणत्याही परवानगी घेतल्याशिवाय पर्यवतावर चढण्यासाठी गेले. ही त्यांची पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी देखील त्यांनी अनेक वेळा माउंट नामावर चढाई केली होती. अपघाताची माहिती मिळताच बचाव अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लोक पर्यवतावर चढाई करत आहे. याच वेळी हाँग देखील आहे. तो आपल्यासोबतच्या लोकांनासोबत उभा आहे. याच वेळी त्याचा तोल जातो. तो स्वताला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला तोल संभाळता येत नाही, पण तो खाली कोसळत जातो.
🚨 BREAKING: Tragedy strikes on Nama Peak, Sichuan!
On Sept 27, 2025, a 31-year-old hiker plummeted 200 meters to his death after unclipping his safety rope for a fatal selfie near a crevasse.
The heart-stopping fall on the icy 5,588-meter sub-peak of Mount Gongga was caught in… pic.twitter.com/CY49zTRQ44 — Dreams N Science (@dreamsNscience) September 28, 2025
प्रश्न १. चीनच्या माउंट नामा पर्वतावर काय घडलं?
चीनच्या माउंट नामा पर्वतावरुन कोसळून एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला आहे.
प्रश्न २. चीनच्या माउंट नामावर मृत्यू झालेल्या गिर्यारोहकाचे नाव काय?
चॅनेल न्यूज एशियाच्या वृत्तानुसार, ३१ वर्षीय हाँग असे या व्यक्तीचे नाव होते.
प्रश्न ३. हाँग माउंट नामावरुन किती फूट उंचीवरुन खाली पडला?
हाँग १८,३३२ फूट उंचीवरुन माउंट नामावरुन खाली पडला.
Saudi Arabia News : सौदीमध्ये जाणं झालं सोप्पं; उमराह वीजाबाबत मोठी अपडेट आली समोर