Saudi Arabia News : सौदीमध्ये जाणं झालं सोप्प; उमराह वीजाबाबत मोठी अपडेट आली समोर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Saudi Arabi Umrah Visa : रियाध : दरवर्षी जगभरातून लाखो मुस्लिम उमराहसाठी सौदी अरेबियाला (Saudi Arabia) जात असतात. त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सौदी अरेबियाने उमराह व्हिसामध्ये काही बदल केला असून आता हा व्हिसा मिळणे खूप सोपे झाले आहे.
उमराहला जाण्यासाठी पूर्वी विशेष उमराह व्हिसाची आवश्यकता असायची, पण आता या नियमात बदल करुन कोणत्या वैध व्हिसावर मुस्लिम नागरिकतांना उमराहसाठी जाता येणार आहे. नव्या नियमानुसार आता ई-टुरिस्ट व्हिसा, ट्रान्झिट व्हिसा, वर्क व्हिसा, फॅमिली व्हिसा किंवा इतर कोणत्या वैध व्हिसा धारकाला आता उमराहसाठी सौदीला प्रवास करता येणार आहे.
America Shutdown : अमेरिकेचा कारभार सहाव्या दिवशीही ठप्प; डोनाल्ड ट्रम्प पडले बुचकळ्यात, म्हणाले…
सौदीर अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार, उमराह व्हिसात बदलाचा उद्देश २०३० अंतर्गत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणे आहे. उमराहसाठी आता यात्रेकरुंना नुसुक या डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन किंवा इतर परवानाधारक ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल. नुसुक प्लॅटफॉर्म सौदी अरेबियाच्या डिजिटल तीर्थयात्रा प्रणालीचा महत्त्वाचा भाग आहे.
यामुळे तीर्थयात्रा सोपी व सुलभ होते. या नव्या सुधारणेमुळे जगभरातील उमराहच्या मुस्लिम यात्रेकरुंसाठी मोठी सोय झाली आहे. कोणत्या वैध व्हिसावर आता सहज उमराहसाठी यात्रेकरुंना प्रवास करता येणार आहे.
सौदी अरेबियाच्या मंत्रालयाने सांगतिले की, नुसुक उमराह प्लॅटफॉर्मची लॉन्चिग सुरु झाली आहे. या अंतर्गत यात्रेकरु उमराह पॅकेज निवडू शकतात. इलेक्ट्रॉनिक परमिट मिळवू शकतात आणि त्यांच्या सोयीनुसार उमराहची योजना करु शकता असे सौदीच्या मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे यात्रेकरुंसाठी सेवा बुकिंग अगदी सोपी झाली आहे. मंत्रालयाने हेही स्पष्ट केले आहे की, मुस्लिम यात्रेकरुंना सुरक्षित आणि अध्यात्मिक अनुभवासोबत उच्च दर्जाची सेवाही प्रदान केली जाईल.
२०२५ मध्ये उमराह यात्रेकरुंची संख्या
जनरल ऑथिरिटी फॉर स्टॅटिस्टिक्स (GASTAT) नुसार, २०२५च्या पहिल्या तीन महिन्यात १,५२,२२,४९७ लोकांनी उमराह केला. यामध्ये ६५,२३,६३० विदेशी यात्री, तर ८६,९८,६३० सौदी नागरिक होते. यावरुन सौदी अरेबियातील उमराह लोकांसाठी किती मोठे आकर्षण आहे हे दर्शवते.यामुळे सौदीने नवीन नियम सुलक्ष केले आहेत.
प्रश्न १. सौदी अरेबियाने काय घोषणा केली आहे?
सौदी अरेबियाने उमराह व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला आहे, ज्यामुळे जगभरातील तीर्थ यात्रेकरुंसाठी प्रवास सुलभ होणार आहे.
प्रश्न २. सौदी अरेबियाने उमराह व्हिसामध्ये काय बदल केला?
आता जगभरातील उमराह यात्रेकरुंना उमराहसाठी विशेष व्हिसाची आवश्यकता नसणार आहे. आता यात्रेकरुंना ई-टुरिस्ट व्हिसा, ट्रान्झिट व्हिसा, वर्क व्हिसा, फॅमिली व्हिसा किंवा इतर कोणत्या वैध व्हिसावर उमराहला जाता येणार आहे.
प्रश्न ३. काय आहे सौदीच्या या निर्णयाचा उद्देश?
उमराह व्हिसात बदलाचा उद्देश २०३० अंतर्गत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणे असल्याचे सौदीने म्हटले आहे.
प्रश्न ४. २०२५ मध्ये उमराहसाठी पहिल्या तीन महिन्यात किती यात्रेकरुंनी प्रवास केला?
जनरल ऑथिरिटी फॉर स्टॅटिस्टिक्स (GASTAT) नुसार, २०२५च्या पहिल्या तीन महिन्यात १,५२,२२,४९७ लोकांनी उमराह केला.
Jaffar Express : पाकिस्तानात जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला ; बॉम्बस्फोटामुळे रेल्वे रुळावरुन घसरली