जॉन क्लार्क, मिशेल डेव्होरेट आणि जॉन मार्टिनिस यांनी भौतिक शास्त्रातील २०२५ चा नोबेल जाहीर( फोटो सौजन्य सोशल मीडिया)
Nobel Prize in Physics 2025 : २०२५ च्या नोबेल पुरस्काराची घोषणा सोमवारपासून सुरू झाली. यंदाचा २०२५ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर करण्यात आला आहे. जॉन क्लार्क, मायकेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनस या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांनी क्वांटन टनलिंग आणि सुपरकंडक्टिंग सर्किट्समधील ऊर्जा क्वांटीकरण या विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. यामुळे भौतिकशास्त्रात एक नवा अध्याय सुरु झाला आहे.
या शोधामुळे क्वांटम प्रभाव केवळ सूक्ष्म आणि इलेक्ट्रॉनच्या पातळीवर मर्यादित नसल्याचे, तर मोठ्या विद्युत परिपथांमध्ये याचे परिणा दिसू शकतात हे स्पष्ट झाले आहे. यामुळे सुपरकंडक्टिंग सर्किट्समधील उर्जा पातळी आणि त्यातील टनलिंग घटनेचे प्रत्यक्ष निरीक्षणही शक्य झाले आहे. यामुळे आजचे संगणक, सेन्सर्स आणि क्वांटम कम्युनिकेशन प्रणाली उभारली जात आहे.
१९०१ ते २०२५ दरम्यान भौतिकशास्ज्ञातील पुरस्कार आतापर्यंत २२६ शास्त्रज्ञांना देण्यात आला आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार कृत्रिम बुद्धमत्तेचे प्रणेते जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हेंटिन यांना मशीन लर्गिंगच्या कामगिरीबद्दल देण्यात आला होता. शास्त्रज्ञाना नोबेल पारितोषिकासोबत १.१ कोटी स्वीडीश क्रोनर म्हणजे १२ लाख अमेरिकन डॉलर्स रक्कम दिली जाणार आहे.
BREAKING NEWS
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2025 #NobelPrize in Physics to John Clarke, Michel H. Devoret and John M. Martinis “for the discovery of macroscopic quantum mechanical tunnelling and energy quantisation in an electric circuit.” pic.twitter.com/XkDUKWbHpz — The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2025
FAQs(संबंधित प्रश्न)
पुढील पुरस्कार कधी जाहीर होणार
या पुरस्कारानंतर ८ ऑक्टोबर रोजी साहित्य क्षेत्रातील, ९ ऑक्टोबर रोजी शांतता नोबेल पुरस्कार, आणि अर्थशास्त्रातील पुरस्कारा १० ऑक्टोबर रोजी घोषणा केली जाईल. तर १३ ऑक्टोबर रोजी रसायनशास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे.
१० डिसेंबरला प्रदान करण्यात येणार पुरस्कार
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांना १० डिसेंबर २०२५ मध्ये स्टॉकहोम मध्ये अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ आयोजित एका कार्यक्रमात स्वीडिनच्या राज्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
भारतात कोणाला मिळाला आहे भौतिकशास्त्रातील पुरस्कार ?
भौतिकशास्त्रात भारतीयांना देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतामध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे डॉ. सी. व्ही. रमण आणि एस. चंद्रशेखर यांना मिळाला आहे.
Nobel Prize 2025 : नोबेल पारितोषिकांमधून गणित का गायब ? १२० वर्ष जुने गूढ अजूनही उलगडलेले नाही