Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maduro Arrested : अमेरिकेची गुंडगिरी! चीनच्या नाकाखालून मादुरोला उचललं; ड्रॅगनने व्यक्त केला तीव्र संताप

China reaction to US capture of Nicolas Maduro: व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेबद्दल चीनने अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे आणि ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 04, 2026 | 11:24 AM
China On US China angered by US action in Venezuela calls Maduro's arrest wrong

China On US China angered by US action in Venezuela calls Maduro's arrest wrong

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेला चीनने ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन’ आणि ‘गुंडगिरी’ (Hegemony) म्हटले आहे.
  •  अमेरिकेची ही लष्करी कारवाई लॅटिन अमेरिकेतील शांतता धोक्यात आणणारी असून, अमेरिकेने आपली ‘वर्चस्ववादी मानसिकता’ सोडावी, असा इशारा बीजिंगने दिला आहे.
  •  विशेष म्हणजे, अमेरिकन हल्ल्याच्या अवघ्या काही तास आधीच चिनी विशेष दूताने मादुरो यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला होता, ज्यामुळे चीन आता अधिक आक्रमक झाला आहे.

China reaction to US capture of Nicolas Maduro 2026 : अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) आणि त्यांच्या पत्नीला ज्या प्रकारे अटक केली, त्यावरून आता जागतिक राजकारण तापले आहे. अमेरिकेचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चीनने या कारवाईवर आगपाखड केली आहे. “एका सार्वभौम देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अशा प्रकारे अटक करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचा खून आहे,” अशा कडक शब्दांत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचा निषेध केला आहे. या घटनेमुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव आता एका नव्या टोकाला पोहोचला आहे.

“ही अमेरिकेची दादागिरी!” – चीनची अधिकृत प्रतिक्रिया

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, “अमेरिका आंतरराष्ट्रीय नियमांना पायदळी तुडवत आहे. लष्करी बळाचा वापर करून दुसऱ्या देशाचे सरकार उलथवून टाकणे ही निव्वळ वर्चस्ववादी मानसिकता आहे.” चीनने ही कारवाई संयुक्त राष्ट्रांच्या (UN Charter) तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे म्हटले आहे. बीजिंगच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे केवळ दक्षिण अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण जगात अस्थिरता निर्माण होऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested : ‘कायर लोकांनो या…’ मादुरोचं चॅलेंज ट्रम्पने स्वीकारलं, सहपत्नीक घातल्या बेड्या; व्हेनेझुएलात आता अमेरिकन राजवट

हल्ल्याच्या ६ तास आधी चिनी दूताची ‘ती’ भेट!

या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे, अमेरिकन सैन्याने कराकसवर बॉम्बफेक सुरू करण्याच्या अवघ्या ६ ते ७ तास आधी चीनचे विशेष दूत क्यू शियाओकी (Qiu Xiaoqi) यांनी मादुरो यांची भेट घेतली होती. या भेटीत चीनने मादुरो सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. चिनी शिष्टमंडळ कराकसमध्ये असतानाच अमेरिकेने हा सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे चीनला हा स्वतःचा अपमान वाटत आहे. ट्रम्प यांच्या या धाडसी कारवाईने चीनचा लॅटिन अमेरिकेतील प्रभाव एका झटक्यात मोडीत काढला आहे.

JUST IN: 🇺🇸🇻🇪🇨🇳 China on US kidnapping of Maduro: “The hegemonic behavior of the United States is a serious violation of international law, an infringement on Venezuela’s sovereignty, and a threat to peace and security. We strongly oppose the US action and urge Washington to… pic.twitter.com/FIFyj2QLeo — Megatron (@Megatron_ron) January 3, 2026

credit : social media and Twitter

तेल आणि वर्चस्वाचा खेळ

चीनने व्हेनेझुएलामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. व्हेनेझुएला हा चीनचा प्रमुख तेल पुरवठादार देश आहे. आता मादुरो यांच्या अटकेनंतर आणि अमेरिकेने तिथल्या तेल क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्याच्या घोषणेनंतर, चीनला आपल्या गुंतवणुकीची भीती वाटू लागली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, व्हेनेझुएलाच्या तेलातूनच या मोहिमेचा खर्च वसूल केला जाईल. चीनने याला ‘उघड लूट’ असे संबोधले असून अमेरिकेला तातडीने ही कारवाई थांबवण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली

लॅटिन अमेरिकेत युद्धाचे ढग

चीनने इशारा दिला आहे की, अमेरिकेची ही ‘साम्राज्यवादी’ वृत्ती लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशाला युद्धाच्या खाईत लोटू शकते. ब्राझीलसारख्या देशांनीही या कारवाईवर चिंता व्यक्त केली असून, चीन आता या प्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) अमेरिकेला घेरण्याच्या तयारीत आहे. अमेरिका आता व्हेनेझुएलामध्ये स्वतःचे ‘बाहुले सरकार’ (Puppet Government) बसवेल, अशी भीती चीनने व्यक्त केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मादुरो यांच्या अटकेवर चीनची मुख्य आक्षेप काय आहे?

    Ans: चीनने या कारवाईला 'आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्र सनदेचे उल्लंघन' म्हटले असून, याला अमेरिकेची वर्चस्ववादी मानसिकता ठरवले आहे.

  • Que: अमेरिकन हल्ल्यापूर्वी मादुरो कोणाला भेटले होते?

    Ans: हल्ल्याच्या अवघ्या ६-७ तास आधी मादुरो यांनी चिनी विशेष दूत क्यू शियाओकी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली होती.

  • Que: चीनचा व्हेनेझुएलात कोणता स्वार्थ आहे?

    Ans: चीनने व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून, मादुरो हे लॅटिन अमेरिकेतील चीनचे सर्वात जवळचे राजकीय मित्र होते.

Web Title: China on us china angered by us action in venezuela calls maduros arrest wrong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news
  • Nicholas Maduro
  • Venezuela

संबंधित बातम्या

US Pilot Rescue Mission : अमेरिकेने पायलटच्या बचाव मोहिमेत आपल्याच विमानांना का उडवले? इराणमध्ये नक्की काय घडलं?
1

US Pilot Rescue Mission : अमेरिकेने पायलटच्या बचाव मोहिमेत आपल्याच विमानांना का उडवले? इराणमध्ये नक्की काय घडलं?

जागतिक तणावातही भारतीय अर्थव्यवस्था दणकट! महागाई रोखण्यासाठी सरकारचा ‘मास्टरप्लॅन’
2

जागतिक तणावातही भारतीय अर्थव्यवस्था दणकट! महागाई रोखण्यासाठी सरकारचा ‘मास्टरप्लॅन’

Donald Trump यांची Iran ला धमकी, Share Market मध्ये कन्फ्यूजन, सध्या परिस्थिती  काय ?
3

Donald Trump यांची Iran ला धमकी, Share Market मध्ये कन्फ्यूजन, सध्या परिस्थिती काय ?

Trump Ultimatum: ‘याच्या’ बदल्यात ‘Hormuz’ नाहीच; इराणला अमेरिकेची अट अमान्य; पाकिस्तानच्या प्रस्तावावर विचार सुरू
4

Trump Ultimatum: ‘याच्या’ बदल्यात ‘Hormuz’ नाहीच; इराणला अमेरिकेची अट अमान्य; पाकिस्तानच्या प्रस्तावावर विचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.