Venezuela Missile Blast: युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस! व्हेनेझुएला भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Venezuela missile attack Caracas 2026 : दक्षिण अमेरिकेतील तेलसमृद्ध देश व्हेनेझुएला (Venezuela) सध्या भीषण संकटाच्या छायेखाली आहे. राजधानी कराकस (Caracas) सह देशातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर एकामागून एक झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनी आणि स्फोटांनी संपूर्ण जग हादरले आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, हे स्फोट इतके भीषण होते की त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएला सरकारने तातडीने आणीबाणी जाहीर केली असून संपूर्ण देशाचे हवाई क्षेत्र (Airspace) बंद करण्यात आले आहे.
हे स्फोट केवळ राजधानी कराकसपुरते मर्यादित नव्हते. धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ला ग्वेरा (La Guaira) बंदर आणि मैक्वेटिया (Maiquetia) शहर स्फोटांच्या मालिकेमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. ला ग्वेरा हे व्हेनेझुएलाचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे, जिथे स्फोटांनंतर भीषण आग लागली असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अनेक साक्षीदारांनी आकाशात क्षेपणास्त्रांसारखे प्रकाशझोत पाहिल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे हा बाह्य हल्ला असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
THIS IS WHAT A GREAT POWER GREY ZONE CONTEST LOOKS LIKE.
Loud explosions reported across Caracas, capital of Venezuela. Flames & black smoke seen; blasts near Higuerote Airport (E) and a naval base. Reports of US Chinooks overhead. Colombia’s President Maduro says Caracas is… pic.twitter.com/ieReV6FKMM — Rahul Shivshankar (@RShivshankar) January 3, 2026
credit : social media and Twitter
या स्फोटांनंतर अमेरिकेने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी (FAA) ने एक तातडीची नोटीस जारी करून सर्व अमेरिकन नागरी विमानांना व्हेनेझुएलाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. “सुरक्षेचा धोका लक्षात घेता, कोणत्याही नागरी विमानाने या क्षेत्रावरून उड्डाण करू नये,” असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ही बंदी अमेरिकन लष्करी विमानांना लागू नसेल, यावरून या भागात लष्करी हालचाली वाढल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मार्ग बदलण्यात आले असून प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
WATCH: Dozens of explosions heard across Venezuela’s capital amid suspected U.S. airstrikes pic.twitter.com/5v0ZFfnNf6 — BNO News Live (@BNODesk) January 3, 2026
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
या घटनेनंतर शेजारील देश कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांनी या स्फोटांमागे प्रादेशिक अस्थिरता निर्माण करण्याचा मोठा कट असल्याचे म्हटले आहे. व्हेनेझुएलाच्या अंतर्गत राजकीय संघर्षातून किंवा बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपामुळे हा हल्ला झाला असावा, अशी चर्चा आता आंतरराष्ट्रीय राजकारणात सुरू झाली आहे. कोलंबिया आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध आधीच ताणलेले असल्याने या दाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory
व्हेनेझुएला आधीच आर्थिक मंदी आणि महागाईशी झुंज देत आहे. अशातच या स्फोटांमुळे वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित झाला आहे. कराकसमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्र (UN) आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हा हल्ला कोणी केला आणि यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचे गुपित अद्याप कायम आहे.
Ans: मुख्य स्फोट राजधानी कराकस (Caracas), ला ग्वेरा (La Guaira) बंदर आणि मैक्वेटिया शहरात झाले आहेत.
Ans: स्फोटांमुळे निर्माण झालेला सुरक्षेचा धोका आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची शक्यता लक्षात घेता FAA ने ही बंदी घातली आहे.
Ans: कोलंबियाच्या अध्यक्षांनी या हल्ल्यामागे प्रादेशिक अस्थिरता पसरवण्याचा मोठा कट असल्याचे म्हटले आहे.






