China President Xi Jinping got angry with Bangladesh, know the details
बिजिंग: चीनने बांगलादेशमधील दोन पुस्तकांमध्ये आणि सर्वेक्षण वेबसाइटवर अरुमाचल प्रदेश आणि अक्साई चिनला भारताचा भाग म्हणून दाखवले आहे. यामुळे चीनने यावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या मते हे प्रदेश ऐतिहासिकदृष्ट्या त्यांचे आहेत. याशिवाय, बांगलादेशातील दोन पुस्तकांमध्ये आणि वेबसाइटवर हाँगकाँग व तैवान यांना स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले आहे, यामुळे चीनने बांगलादेशवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
चीनने बांगलादेशला पाठवले पत्र
मीडिया रिपोर्टनुसार, चीनने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बांगलादेशला एक अधिकृत पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी अंतरिम सरकारला विनंती केली होती की, पाठ्यपुस्तकांमधील आणि सर्वेक्षण विभागाच्या वेबसाइटवरील नकाशे व माहितीमध्ये बदल करावा. चीनच्या या विनंतीनंतर दोन्ही देशांमध्ये चर्चासत्रही झाले. मात्र, बांगलादेशच्या विनंतीनुसार चीनने सध्या या मुद्द्यावर दबाव न टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प प्रशासनाचा आणखी एका संस्थेला दणका; काम थांबण्याचे आदेश
बांगलादेशचे उत्तर आणि चीनची भूमिका
चीनच्या आक्षेपानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय अभ्याक्रम आणि पाठ्यपुस्तक मंडळ (NCTB) यांच्याशी चर्चा केली. NCTBने स्पष्ट केले की, नवीन पुस्तकांची छपाई आधीच पूर्ण झाली आहे, यामुळे आता त्यामध्ये कोणतेही बदल करणे शक्य नाही.
तर दुसरीकडे बांगलादेशने चीनला या प्रकरणावर दबाव न टाकण्याची विनंती केली असून भविष्यात हा निर्णय सोडवला जाऊल. यावर चीनने बांगलादेशसोबतचे ऐतिहासिक संबंध लक्षात घेऊन परस्पर सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
बांगलादेशची पाकिस्तानशी हात मिळवणी
एकीकडे भारतासोबत संबंध बिघडत असताना बांगलादेशने पाकिस्तानशी हात मिळवमी केली आहे. बांगलादेशचे नौदल प्रमुख ॲडमिरल मोहम्मद नजमुल हसन यांनी पाकिस्तानी लष्कराचे कमांडर सय्यद असीम मुनीर अहमद शाह यांची भेट घेतली. या बैठकीत नौदल सहकार्य आणि बहुराष्ट्रीय नौदल सराव यावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानने बांगलादेशी लष्करासाठी प्रशिक्षण सत्राची योजना आखली होती.
बांगलादेश लष्कराचा एक भाग पाकिस्तानला सहकार्यासाठी जोर देत आहे. यामुळे परिसरात स्थैर्य येईल, असा या वर्गाचा विश्वास आहे. हे सहकार्य दहशतवाद आणि इतर सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत करू शकते. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर ढाका इस्लामाबादकडून राजनैतिक पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.