आता त्यांना आमच्या मदतीची गरज भासेल'; पाकिस्तानचा मोठा पोकळ दावा, नेमकं प्रकरण काय?(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: एककीडे इस्त्रायल आणि सौदी अरेबियामधे पॅलेस्टिनींच्या वसाहतीबाबत ताणाव वाढत असताना दुसरीकडे पाकिस्तानने मोठा दावा केला आहे. पाकिस्तानचे तज्ज्ञ कमर चीमा यांनी म्हटले आहे की, अरब देशाला आता पाकिस्तानची गरज भासेल, कारण आता मुस्लिम धार्मिक स्थलांना धोका निर्माण झाला आहे. आणि त्यांच्या मदतीसाठी इतर कोणताही मुस्लिम देश पुढे येणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडवली आहे.
चीमा यांनी दावा केला आहे की, बऱ्याच इस्लामिक देशांनी इस्रायल किंवा अमेरिकेसोबत समजुतीने वाटचाल केली आहे, मात्र पाकिस्तान हा धर्माच्या नावावर स्थापन झालेला देश असल्याने तो सौदी अरेबियाच्या मदतीसाठी पुढे येईल.
इस्रायल-सौदी तणाव
नुकतेच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सौदी अरेबियाला उद्देशन एक टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे ती, “तुमच्याकडे भरपूर जमीन आहे, मग तिथेच पॅलेस्टिनींनीसाठी एक वेगळे राज्य स्थापन करा.” यावर सौदी अरेबियाने तीव्र संताप व्यक्त करत प्रत्युत्तर दिले आहे. सौदी अरेबियाने प्रत्युत्तरात म्हटले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलींना अलास्का किंवा ग्रीनलँडमध्ये हलवावे.”
पाकिस्तानची प्रतिक्रिया
या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देताना पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी “जर सौदी अरेबियामदील धार्मिक स्थळांना कोणताही धोका निर्माण झाला, तर पाकिस्तानच त्यांच्या संरक्षणासाठी पुढे येईल” असे म्हटले आहे. त्यांनी हेही स्पष्ट सांगितले की, सौदी अरेबिया पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करतो, याचे कारण म्हणजे इस्लामिक फॅक्टर आहे.
अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा आणि पाकिस्तानसाठी धडा
कमर चीमा यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या आक्रमक भूमिकेचे प्रमुख कारण अमेरिकेचा मिळणारा पाठिंबा आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे इस्रायलने संपूर्ण मध्य पूर्वेत आपली ताकद वाढवत असून सौदी अरेबियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी असेही सांगितले की, “युनायटेड अरब एमिराट्सकडे सौदी अरेबियासारखे मोठे राज्य नाही, यामुळे सौदी अरेबिया पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत देतो.” चीमा यांनी पाकिस्तानला, भारतही अमेरिकेच्या मदतीने इस्त्रायल आणि रशियाप्रमाणे आपली भूमिका प्रबळ करु शकतो असा इशारा दिला आहे.
कमर चीमा यांच्या वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान मुस्लिम जगतात स्वतःला एक शक्तिशाली देश म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहता आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्याला सौदी अरेबियाच्या पूर्ण समर्थनाची गरज आहे. येत्या काळात इस्रायल, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कसे राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.