China Vs Taiwan: एकीकडे रशिया-यूक्रेन, इस्त्रायल हमास, इस्त्रायल इराण यांच्यात भीषण संघर्ष सुरू आहे. मध्य युरोपात युद्धाचे संकट गडद झाले आहे. इस्त्रायल इराणची अणुशक्ती नष्ट करण्यासाठी हल्ले करत आहेत. तर दुसरीकडे आता चीन आणि तैवान यांच्यात संघर्ष सुरू होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण चीन आणि तैवानमधील संघर्ष शिगेला पोचला आहे. चीनने उचलेल्या पावलामुळे तैवानची चिंता वाढली आहे.
चीनने आपली 74 लढाऊ विमाने आणि 6 सैन्य जहाजे तैवानच्या दिशेने रवाना केली आहेत. त्यापैकी 50 पेक्षा जास्त लढाऊ विमानांनी तैवानच्या सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडली आहे. सामुद्रधुनी ही चीन आणि तैवान यांच्यातील मध्यरेषा समजली जाते. सांमुद्रधुनी ही अनौपचारिक रेषा असून चीन आणि तैवान या देशांना मोकळे करते.
चीन सुरुवातीपासूनच तैवानला आपला भाग समजत आहे. अनेकदा चीनने तैवानला घाबरवण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. लष्करी कारवाया करून तैवानला घाबरवण्याचे काम चीन कायमच करत आलेला आहे. त्यामुळे तैवानचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी 74 लढाऊ विमाने आणि 6 सैन्य जहाजे पाठवली आहेत. त्यातील काही विमानांनी सांमुद्रधुनी देखील ओलांडली आहे.
इराणमध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेपेक्षा जास्त हानी होणार
इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. दोन्हीही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहे. इस्त्रायलने इराणच्या अणूभट्टीवर देखील मोठा हल्ला केला होता. मात्र आता इराणच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेने देखील उडी घेतली आहे. इराणने बिनशर्त आत्मसमर्पण करावे असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
जर का अमेरिकेने आपला सर्वात शक्तिशाली असा बंकर बस्टर बॉम्बने इराणवर हल्ला केला तर इराणमध्ये प्रचंड मोठी हानी होऊ शकते. हा बॉम्ब जर इराणच्या न्यूक्लिअर यंत्रणा असलेल्या ठिकाणी टाकला गेल्यास इराणमध्ये प्रचंड जीवितहानी होऊ शकते. काही तज्ञांच्या मते असे झाल्यास भारतात झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेपेक्षा अधिक नुकसान इराणमध्ये होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जाचे राफेल ग्रोसी यांनी सांगितले की, अण्वस्त्र यंत्रणा असलेल्या ठिकाणी हल्ला झाल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. क्षेत्रीय आणि आंतराष्ट्रीय सुरक्षेवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. इस्त्रायलने फोर्डॉवर या आधी देखील एक मोठा हल्ला केला आहे. त्यामध्ये इराणची अण्वस्त्र यंत्रणा नष्ट करण्यात पूर्ण यश इस्त्रायलला आले नाही.