इराणवर मोठा हल्ला होणार (फोटो -@HansrajMeena )
USA vs IRAN vs Israel: इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. दोन्हीही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहे. इस्त्रायलने इराणच्या अणूभट्टीवर देखील मोठा हल्ला केला होता. मात्र आता इराणच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेने देखील उडी घेतली आहे. इराणने बिनशर्त आत्मसमर्पण करावे असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
जर का अमेरिकेने आपला सर्वात शक्तिशाली असा बंकर बस्टर बॉम्बने इराणवर हल्ला केला तर इराणमध्ये प्रचंड मोठी हानी होऊ शकते. हा बॉम्ब जर इराणच्या न्यूक्लिअर यंत्रणा असलेल्या ठिकाणी टाकला गेल्यास इराणमध्ये प्रचंड जीवितहानी होऊ शकते. काही तज्ञांच्या मते असे झाल्यास भारतात झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेपेक्षा अधिक नुकसान इराणमध्ये होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जाचे राफेल ग्रोसी यांनी सांगितले की, अण्वस्त्र यंत्रणा असलेल्या ठिकाणी हल्ला झाल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. क्षेत्रीय आणि आंतराष्ट्रीय सुरक्षेवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. इस्त्रायलने फोर्डॉवर या आधी देखील एक मोठा हल्ला केला आहे. त्यामध्ये इराणची अण्वस्त्र यंत्रणा नष्ट करण्यात पूर्ण यश इस्त्रायलला आले नाही.
ईरान के पास साढ़े तीन साल तक युद्ध लड़ने की क्षमता दिखाती है कि वह आत्मरक्षा के लिए पूरी तरह तैयार है। अमेरिका और इज़रायल को इसे चेतावनी नहीं, शांति के लिए एक मजबूत संदेश समझना चाहिए। pic.twitter.com/kinO4Zf6uI
— Hansraj Meena (@HansrajMeena) June 18, 2025
इराणवर हल्ला करण्यामागे अण्वस्त्र यंत्रणा नष्ट करणे हाच इस्त्रायलचा मूळ हेतू आहे. त्यामध्ये इस्त्रायल सफल झाला मात्र पूर्णपणे त्यांना ही यंत्रणा नष्ट करता आलेली नाही. इराणची मुख्य यंत्रणा ही जमिनीच्या 90 फूट खाली असल्याचे म्हटले जाते. ही यंत्रणा नष्ट करण्यासाठी अमेरिका त्यांच्याकडील बंकर बस्टर हा शक्तिशाली बॉम्ब वापरण्याची शक्यता आहे.
अमेरिकेकडे असलेल्या बॉम्बची वैशिष्ट्ये
6 मीटर म्हणजे 200 फूट लांबी
वजन – 13, 600 किलो
5000 पाऊंड इतकी विध्वसंक क्षमता
मात्र इराणचे फोर्डॉ हे ठिकाण नष्ट करण्यासाठी एक बॉम्ब पुरेसा नसणार आहे. एकापेक्षा अधिक बॉम्ब या ठिकाणी टाकल्यास ही यंत्रणा नष्ट केली जाऊ शकते असे सणगीतले जात आहे. त्यामुळे येत्या काळात हा संघर्ष कोणत्या शिगेला जाऊन पोहोचतो, हे देखील पाहणे आवश्यक ठरणार आहे.