
Pakistan news
ईमान मजारी आणि तिचे पती हादी अली चठ्ठा यांनी पाकिस्तानी लष्कराबाबत अपमानास्पद भाष्य केल्याचा आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून इस्लामाबाद न्यायालयात याविरोदात खटला सुरु आहे. या प्रकरणाअंतर्गत ईमान मजारीने थेट पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आणि लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी (DG ISPR) यांना न्यायालयात साक्षीदार म्हणून बोलावण्याची मागणी केली आहे.
ईमान मजारीच्या या मागणीमुळे पाकिस्तानमध्ये मोठा वादा सुरु झाला आहे. ईमान मजारी आणि तिच्या पती हादी अली चठ्ठावर प्रिव्हेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम्स ॲक्ट (PECA)अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. ईमान मजारीने लेफ्टनंट जनरल अहमद यांनी त्यांना देशद्रोह्यांचे वकील आणि विदेशी एजंट बोलल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या टीकेमुळे मजारी यांच्याविरोधात सुरु असलेल्या एका न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याचे ईमान मजारी आणि हादी अली चठ्ठा यांनी म्हटले आहे.
परंतु पाकिस्तानच्या न्यायालयाने ईमान यांची ही मागणी अस्वीकार करत कोणत्याही अभियोक्ता पक्षाला साक्ष देण्यास भाग पाडता येत नाही. यासाठी औपचारिक दखल घेऊन अभियोजकाला अर्ज पाठवावा लागतो. शिवाय न्यायाधीशांनी ती परिषद स्वत: बघितला नाही. सध्या या प्रकरणाची पुढील सुनावणी ही आज पार पडणार आहे.
दरम्यान लष्कराने दाखल केलेल्या आरोपत्रांनुसार, इमान मजारी यांनी खैबर-पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये बेपत्ता नागरिकांच्या प्रकरणांसाठी लष्कराला जबाबदार धरले आहे. तर सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्यावर सोशल मीडिया पोस्ट या दहशतवाद्यांच्या विचारांशी संलग्न असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्यावर देशद्रोहासंबंधित गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. तर हादी चट्ठा यांनी इमान यांच्या पोस्ट शेअर करुन समाजात अस्थिरता पसरवल्याचा आरोप करण्यात आले आहे.
ईमान मजारी या पाकिस्तानचे माजी मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांच्या कन्या आहेत. शिरी मजारी हे इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारमध्ये कार्यरत होते. इमान मजारी यांनी एडिनबर्ग लॉ स्कूमधून मानवाधिकार विषयातील तज्ज्ञ म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी अल्पसंख्याकावरील आणि लष्कराच्या छळाला तीव्र विरोध केला आहे. त्यांच्यामुळे आज पाकिस्तानी लष्कराचे जगणं कठीण झाले आहे.
भारताकडून मार खाऊनही पाकिस्तान नफ्यात? JF-17 जेटवर आसिफ ख्वाजा यांनी केला ‘हा’ मोठा दावा