Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak Afghan War: ड्रॅगनची ‘शटल डिप्लोमसी’ने युद्धात एन्ट्री; पाक-अफगाण रक्तरंजित संघर्ष थांबवण्यासाठी चीनने घेतली हाती कमान

Pakistan Afghanistan Tension: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणाव आणि सीमापार हल्ले यांच्या पार्श्वभूमीवर चीनने मध्यस्थी वाढवली आहे. बीजिंग "शटल डिप्लोमसी" द्वारे दोन्ही देशांमध्ये

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 16, 2026 | 03:30 PM
china shuttle diplomacy pakistan afghanistan border tension peace mediation marathi news

china shuttle diplomacy pakistan afghanistan border tension peace mediation marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनची मध्यस्थी
  • विनाशकारी हल्ले
  • ड्रॅगनचा स्वार्थ

China Shuttle Diplomacy Pakistan Afghanistan : दक्षिण आशियातील दोन शेजारी देश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Pakistan Afghanistan Tension) सध्या एका विनाशकारी युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ड्युरंड रेषेच्या दोन्ही बाजूला केवळ बंदुकांच्या गोळ्याच नाही, तर आता क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांचा पाऊस पडत आहे. या परिस्थितीमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली असून, आता या संघर्षात ‘ड्रॅगन’ म्हणजेच चीनने उडी घेतली आहे. चीनने आपली “शटल डिप्लोमसी” (Shuttle Diplomacy) सक्रिय केली असून, दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संवादाचा पूल बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

काय आहे चीनची ‘शटल डिप्लोमसी’?

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, त्यांचे विशेष दूत सध्या काबूल आणि इस्लामाबाद दरम्यान सतत दौरे करत आहेत. यालाच राजनैतिक भाषेत “शटल डिप्लोमसी” म्हटले जाते. चीनचा उद्देश स्पष्ट आहे दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये थेट संवाद घडवून आणणे आणि ड्युरंड रेषेवर सुरू असलेला गोळीबार तात्काळ थांबवणे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी दोन्ही देशांना “अविभाज्य भाऊ” संबोधत शांततेचे आवाहन केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : USCIRF: ‘RAW’ वर बंदी आणि ‘RSS’ चा व्हिसा रद्द! अमेरिकेच्या ‘या’ वादग्रस्त मागणीमागे नेमकं कुणाचं डोकं? भारत शत्रूंच्या यादीत

रणांगणावरील भीषण वास्तव

फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या संघर्षाने आता भीषण रूप धारण केले आहे. ताज्या अहवालानुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कंदहार, पक्तिका आणि नांगरहार प्रांतातील तालिबानच्या लष्करी तळांवर आणि टीटीपीच्या (TTP) लपून बसलेल्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या कोहाट आणि बाजोर जिल्ह्यांमध्ये ड्रोन हल्ले केले आहेत. या संघर्षात आतापर्यंत ७५ हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत.

#China Launches ‘Shuttle Diplomacy’ To Defuse Pakistan-Afghanistan Crisis @manojkumargupta https://t.co/MAXBwWro8L — News18 (@CNNnews18) March 11, 2026

credit – social media and Twitter

चीनला मध्यस्थीची गरज का पडली?

चीनने या वादात उडी घेण्यामागे केवळ मानवतावाद नाही, तर त्यांचे मोठे आर्थिक हित दडलेले आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) आणि अफगाणिस्तानमधील चीनची अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक या युद्धामुळे धोक्यात आली आहे. जर हे युद्ध लांबले, तर चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मोठा खिळा बसू शकतो. तसेच, अफगाणिस्तानमधील अस्थिरतेचा फायदा घेऊन अतिरेकी गट चीनच्या शिनजियांग प्रांतात शिरकाव करू शकतात, अशी भीती बीजिंगला सतावत आहे.

दशकांचा सीमावाद आणि ‘ड्युरंड लाईन’

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील या वादाची मुळे १८९३ मध्ये ओढलेल्या ‘ड्युरंड लाईन’ (Durand Line) मध्ये दडलेली आहेत. अफगाणिस्तानने ही सीमा कधीच अधिकृत मानली नाही, तर पाकिस्तानसाठी ही एक आंतरराष्ट्रीय सीमा आहे. त्यातच पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार टीटीपी (Tehreek-e-Taliban Pakistan) सारख्या दहशतवादी गटांना आश्रय देत आहे, जे पाकिस्तानात हल्ले करतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WorldWar3: इराणच्या भविष्यात काळोख! इस्रायल करत आहे इराणच्या पुढच्या पिढ्याही नष्ट करणारे हल्ले; माती आणि पाणी बनवले विषारी

निष्कर्ष: ड्रॅगन यशस्वी होणार का?

चीनने यापूर्वी सौदी अरेबिया आणि इराणमधील वाद मिटवून आपली राजनैतिक ताकद जगाला दाखवून दिली आहे. आता दक्षिण आशियातील या दोन कट्टर शत्रूंना एकत्र आणून चीन पुन्हा एकदा जगाचा “चौधरी” बनण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जमिनीवरचे हल्ले आणि वाढलेला अविश्वास पाहता, चीनची ही वाट सोपी नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनची "शटल डिप्लोमसी" म्हणजे काय?

    Ans: जेव्हा एखादा मध्यस्थ देश दोन वादग्रस्त देशांच्या राजधानीत सतत प्रवास करून (ये-जा करून) त्यांच्यात तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला "शटल डिप्लोमसी" म्हणतात.

  • Que: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: ड्युरंड रेषेवरील सीमावाद आणि अफगाण भूमीवरून पाकिस्तानात होणारे दहशतवादी हल्ले हे या युद्धाचे मुख्य कारण आहे.

  • Que: या युद्धात भारताची भूमिका काय आहे?

    Ans: भारत या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, प्रादेशिक शांततेसाठी संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे.

Web Title: China shuttle diplomacy pakistan afghanistan border tension peace mediation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • China
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

War 3: अमेरिकेचे मोठे लष्करी पाऊल! इराणच्या भूमीवर उतरणार 2500 अमेरिकन सैनिक; युद्धाचे सावट अधिक गडद
1

War 3: अमेरिकेचे मोठे लष्करी पाऊल! इराणच्या भूमीवर उतरणार 2500 अमेरिकन सैनिक; युद्धाचे सावट अधिक गडद

War Update: इराणी दादागिरीला चोख प्रत्युत्तर! नेतान्याहूंनी शोधला होर्मुझला ‘हा’ पर्यायी मार्ग, बनणार जगाचं ‘पेट्रोल स्टेशन’
2

War Update: इराणी दादागिरीला चोख प्रत्युत्तर! नेतान्याहूंनी शोधला होर्मुझला ‘हा’ पर्यायी मार्ग, बनणार जगाचं ‘पेट्रोल स्टेशन’

Global Security: UAEचा दुबईत ‘सर्जिकल स्ट्राईक’! एकही गोळी न झाडता इराणला फोडला घाम; हिजबुल्लाहचं ‘साम्राज्य’ ‘असं’ केलं उद्ध्वस्त
3

Global Security: UAEचा दुबईत ‘सर्जिकल स्ट्राईक’! एकही गोळी न झाडता इराणला फोडला घाम; हिजबुल्लाहचं ‘साम्राज्य’ ‘असं’ केलं उद्ध्वस्त

War Update : इराणची ‘वाचा’ हरपली! अमेरिका-इस्रायलला 6 महिने नडण्याची भाषा करणारे General Naeini ठार
4

War Update : इराणची ‘वाचा’ हरपली! अमेरिका-इस्रायलला 6 महिने नडण्याची भाषा करणारे General Naeini ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.