Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Security: UAEचा दुबईत ‘सर्जिकल स्ट्राईक’! एकही गोळी न झाडता इराणला फोडला घाम; हिजबुल्लाहचं ‘साम्राज्य’ ‘असं’ केलं उद्ध्वस्त

UAE Iran Conflict : संयुक्त अरब अमिरातीने इराण आणि हिजबुल्लाहच्या पाच सदस्यांना अटक करून त्यांचे निधीपुरवठा जाळे उद्ध्वस्त केले, संघटनेला कमकुवत केले आणि इराणला एक अप्रत्यक्ष संदेश दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 20, 2026 | 02:49 PM
uae iran silent action hezbollah funding network dismantled middle east crisis

uae iran silent action hezbollah funding network dismantled middle east crisis

Follow Us
Follow Us:
  • शस्त्रविहीन युद्ध
  • आर्थिक नाकेबंदी
  • अबू धाबीचा कडक संदेश

UAE Iran Conflict March 2026 : मध्य-पूर्वेतील रणसंग्राम आता केवळपणास्त्रे आणि ड्रोनपुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक युद्धाचा नवा चेहरा आता ‘आर्थिक नाकेबंदी’ (Economic Warfare) म्हणून समोर येत आहे. शुक्रवारी, २० मार्च रोजी संयुक्त अरब अमिरातीने (UAE) घेतलेल्या एका धाडसी निर्णयाने इराणच्या (Iran) गोटात मोठी खळबळ उडाली आहे. यूएईने कोणतीही लष्करी घोषणा न करता इराणची सहयोगी संघटना ‘हिजबुल्लाह’च्या पाच प्रमुख सदस्यांना अटक करून त्यांचे जागतिक स्तरावर पसरलेले आर्थिक जाळे कापून टाकले आहे.

दुबई आणि अबू धाबी: इराणच्या छुप्या व्यवहारांचे केंद्र?

यूएईच्या सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले हे पाच जण साधे लोक नव्हते. ते दुबई आणि अबू धाबीच्या चकचकीत जगात राहून इराण आणि हिजबुल्लाहसाठी निधी गोळा करण्याचे काम करत होते. ‘मनी लाँड्रिंग’च्या माध्यमातून हे लोक दहशतवादी कारवायांसाठी पैसा उभा करत होते. युद्धाच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण करणे आणि यूएईच्या स्वतःच्या आर्थिक हितांना बाधा पोहोचवणे, हा या टोळीचा मुख्य हेतू होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Attack US : इराणच्या आकाशात अमेरिकेच्या F-35 Lightning II ची शिकार; US आर्मीच 100 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान

हिजबुल्लाह आणि इराणला बसलेला मोठा धक्का

सध्या हिजबुल्लाह ही संघटना इराणच्या पाठिंब्यावर इस्रायलविरुद्ध आघाडी उघडून बसली आहे. कोणत्याही युद्धासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ‘पैसा’. यूएईमध्ये २०१६ पासूनच हिजबुल्लाहला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे, तरीही या संघटनेने आपले जाळे तिथे कायम ठेवले होते. तेलाची अवैध विक्री आणि हवाला व्यवहारांतून हा पैसा इराणपर्यंत पोहोचवला जात असे. आता या जाळ्याचा पर्दाफाश झाल्यामुळे हिजबुल्लाहची लढण्याची क्षमता आणि इराणची आर्थिक रसद दोन्ही धोक्यात आले आहेत.

The State Security Apparatus has dismantled a Hezbollah and Iran-funded terrorist network and arrested its members. The group had been operating in the UAE under commercial cover, attempting to infiltrate the economy and undermine the country’s financial stability. pic.twitter.com/Udk6Tjbl4h — Emirates News (@Emirates_News) March 20, 2026

credit – social media and Twitter

यूएईच्या धोरणात झालेला ‘यू-टर्न’

काही काळापूर्वीपर्यंत संयुक्त अरब अमिरात आणि इराण यांच्यात पडद्यामागे काही व्यापारिक संबंध होते. परंतु, अलीकडच्या काळात इराणने यूएईवर टाकलेला दबाव आणि दिलेली आव्हाने यामुळे अबू धाबीचे राज्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यांनी ठरवले आहे की, इराणशी थेट युद्ध खेळण्यापेक्षा त्यांच्या ‘आर्थिक साम्राज्या’वर वार करणे अधिक प्रभावी ठरेल. ही कारवाई म्हणजे तेहरानला दिलेला एक स्पष्ट इशारा आहे की, यूएई आता शांत बसणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz : होर्मुझवर इराणची ‘वसुली’! युद्धाच्या आडोशाने कमावणार 73 अब्ज डॉलर्स; भारतासह 20 देशांची धाकधूक वाढली

काय होणार याचे परिणाम?

तज्ज्ञांच्या मते, ही मूक कारवाई इराणसाठी एखाद्या मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्यापेक्षाही जास्त घातक आहे. यामुळे हिजबुल्लाहच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची रसद थांबणार आहे. तसेच, मध्य-पूर्वेतील इतर देशांनाही यूएईने एक आदर्श घालून दिला आहे की, लष्करी शक्तीचा वापर न करता शत्रूला कसं जेरबंद केलं जाऊ शकतं. या कारवाईमुळे आगामी काळात मध्य-पूर्वेतील राजकारणात आणि अर्थकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यूएईने नक्की कोणाला अटक केली आहे?

    Ans: यूएईच्या सुरक्षा यंत्रणेने इराण आणि हिजबुल्लाहसाठी निधी पुरवठा (Money Laundering) करणाऱ्या पाच प्रमुख सदस्यांना अटक केली आहे.

  • Que: या कारवाईचा हिजबुल्लाहवर काय परिणाम होईल?

    Ans: यामुळे हिजबुल्लाहचे आर्थिक जाळे उद्ध्वस्त झाले असून, त्यांच्या दहशतवादी कारवायांसाठी लागणाऱ्या रसद पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.

  • Que: यूएईने थेट युद्ध का टाळले?

    Ans: यूएईची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे, त्यामुळे थेट लष्करी संघर्षापेक्षा आर्थिक आणि गुप्तचर मार्गाने शत्रूला कमकुवत करणे हे त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

Web Title: Uae iran silent action hezbollah funding network dismantled middle east crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Hezbollah
  • UAE
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?
1

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?

US-Iran: जागतिक महासत्तांमध्ये सत्तानाट्य! इराण-अमेरिकेत सत्ता केंद्रस्थानी नवे चेहरे; मोहसेन रझाई अन् विल शार्फ महत्वाच्या पदांवर
2

US-Iran: जागतिक महासत्तांमध्ये सत्तानाट्य! इराण-अमेरिकेत सत्ता केंद्रस्थानी नवे चेहरे; मोहसेन रझाई अन् विल शार्फ महत्वाच्या पदांवर

World War 3: युक्रेन युद्धातून तोडगा न निघाल्यास पुतीन सुरु करणार तिसरे महायुद्ध; ‘हे’ NATO देश रडारवर, अमेरिकेचा दावा
3

World War 3: युक्रेन युद्धातून तोडगा न निघाल्यास पुतीन सुरु करणार तिसरे महायुद्ध; ‘हे’ NATO देश रडारवर, अमेरिकेचा दावा

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ
4

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.