Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Update : इराणची ‘वाचा’ हरपली! अमेरिका-इस्रायलला 6 महिने नडण्याची भाषा करणारे General Naeini ठार

US Israel Iran War : जगाच्या नजरेत इराणची 'अजिंक्य' प्रतिमा निर्माण करण्यास मदत करणारे आयआरजीसीचे प्रवक्ते अली मोहम्मद नाईनी यांचे निधन झाले आहे. त्यांनी यापूर्वी म्हटले होते की, इराण सलग सहा महिने युद्ध लढू शकतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 20, 2026 | 02:26 PM
irgc spokesman ali mohammad naeini killed irani srael war update 6 months claim

irgc spokesman ali mohammad naeini killed irani srael war update 6 months claim

Follow Us
Follow Us:
  • इराणला मोठा धक्का
  • सहा महिन्यांच्या युद्धाचा दावा
  • ‘सरप्राईज’ची तयारी

Ali Mohammad Naeini IRGC Death : मध्य-पूर्वेतील धगधगत्या युद्धात (US-Israel Iran War) इराणला आतापर्यंतचा सर्वात मोठा मानसिक धक्का बसला आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मुख्य प्रवक्ते आणि इराणच्या मानसिक युद्धाचे (Psychological Warfare) अधिपती मानले जाणारे ब्रिगेडियर जनरल अली मोहम्मद नाईनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणवरील ताज्या हल्ल्यांमध्ये ते ठार झाल्याचे वृत्त आहे. नाईनी हे केवळ प्रवक्ते नव्हते, तर इराणच्या प्रत्येक लष्करी हालचालीला जगासमोर ‘अजेय’ म्हणून मांडणारे ते मुख्य सूत्रधार होते.

मानसिक युद्धाचा बादशहा हरपला

इराणमधील प्रत्येक लष्करी प्रसिद्धीपत्रक, टीव्ही मुलाखत किंवा सोशल मीडियावरील प्रचार हा नाईनी यांच्या मंजुरीशिवाय प्रसिद्ध होत नसे. त्यांना IRGC च्या जनसंपर्क पथकाचे प्रमुख मानले जात असे. शत्रूच्या मनात भीती निर्माण करणे आणि इराणी जनतेचा आत्मविश्वास वाढवणे यात त्यांचा हातखंडा होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा इराणच्या नौदलावर टीका केली होती, तेव्हा नाईनी यांनीच त्यांना उघड आव्हान दिले होते की, “जर हिंमत असेल तर तुमची जहाजे पर्शियन आखातात पाठवून दाखवा.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz : होर्मुझवर इराणची ‘वसुली’! युद्धाच्या आडोशाने कमावणार 73 अब्ज डॉलर्स; भारतासह 20 देशांची धाकधूक वाढली

६ महिन्यांच्या युद्धाचा ‘तो’ धाडसी दावा

मृत्यूच्या काही दिवस आधी दिलेल्या मुलाखतीत नाईनी यांनी जागतिक माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी ठामपणे सांगितले होते की, इराणची लष्करी ताकद इतकी आहे की ते अमेरिका आणि इस्रायलसारख्या महासत्तांशी सलग सहा महिने तीव्र स्वरूपाचे युद्ध लढू शकतात. त्यांच्या मते, इराणकडे क्षेपणास्त्रांचा इतका मोठा साठा आहे की उत्पादन प्रक्रिया थांबली तरी युद्ध थांबणार नाही. विशेष म्हणजे, त्यांनी इराणच्या क्षेपणास्त्र उद्योगाला २०२५-२६ वर्षासाठी ‘२० पैकी २०’ गुण दिले होते.

🇮🇷🇮🇱🇺🇸 Iranian state media reports that Brigadier General Ali Mohammad Naeini, spokesperson for the Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) and a senior general, has been killed. pic.twitter.com/e3LQIhreiq — The Daily News (@DailyNewsJustIn) March 20, 2026

credit – social media and Twitter

जुन्या पिढीतील क्षेपणास्त्रे आणि शत्रूसाठी ‘सरप्राईज’

नाईनी यांचा सर्वात खळबळजनक दावा हा होता की, इराणने आतापर्यंतच्या संघर्षात केवळ आपली जुन्या पिढीतील (Old Generation) क्षेपणास्त्रे वापरली आहेत. त्यांची सर्वात प्रगत आणि घातक क्षेपणास्त्रे अजूनही सुरक्षित तळांवर असून ती योग्य वेळी तैनात केली जातील. शत्रूला थक्क करणारे ‘आश्चर्य’ (Surprise) इराण तयार करत असून, जसजसे युद्ध पुढे जाईल तसतसे ते अधिक अनपेक्षित होत जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या मृत्यूमुळे हे ‘सरप्राईज’ आता कोणाच्या नेतृत्वाखाली येईल, हा मोठा प्रश्न आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Attack US : इराणच्या आकाशात अमेरिकेच्या F-35 Lightning II ची शिकार; US आर्मीच 100 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान

इराणच्या संरक्षण प्रणालीवर प्रश्नचिन्ह?

नाईनी यांच्यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मृत्यू होणे, हे इराणच्या अंतर्गत सुरक्षेतील मोठी त्रुटी दर्शवते. ज्या माणसाने इराणला ‘अजेय’ ठरवले, तोच माणूस शत्रूच्या हल्ल्यात मारला गेल्याने इराणच्या प्रचाराला (Propaganda) मोठा तडा गेला आहे. यामुळे आता इराणमधील जनतेमध्ये आणि सैन्यामध्ये संतापाची लाट असून, इराण यावर काय प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अली मोहम्मद नाईनी कोण होते?

    Ans: ते इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मुख्य प्रवक्ते आणि मानसिक युद्ध विभागाचे प्रमुख होते.

  • Que: नाईनी यांनी अमेरिकेला काय आव्हान दिले होते?

    Ans: त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपली जहाजे पर्शियन आखातात पाठवून धैर्य दाखवण्याचे आव्हान दिले होते.

  • Que: इराण किती काळ युद्ध लढू शकतो असा दावा त्यांनी केला होता?

    Ans: नाईनी यांच्या दाव्यानुसार इराण सलग ६ महिने उच्च-तीव्रतेचे (High-Intensity) युद्ध लढण्यास सक्षम आहे.

Web Title: Irgc spokesman ali mohammad naeini killed iran israel war update 6 months claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Iran Attack
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

तुफान बॉम्बिंग , अमेरिकेची इराणच्या चाबहार बंदरावर ऍक्शन . भारताला आले टेंशन
1

तुफान बॉम्बिंग , अमेरिकेची इराणच्या चाबहार बंदरावर ऍक्शन . भारताला आले टेंशन

US Strikes Iran: इराणवर अमेरिकेचा 7 तास थरारक बॉम्बहल्ला! होर्मुझ सामुद्रधुनीजवळ युद्ध पेटले; युद्धनौका आणि लढाऊ विमाने मैदानात
2

US Strikes Iran: इराणवर अमेरिकेचा 7 तास थरारक बॉम्बहल्ला! होर्मुझ सामुद्रधुनीजवळ युद्ध पेटले; युद्धनौका आणि लढाऊ विमाने मैदानात

US Iran Conflict : ‘आम्ही संरक्षण करु, पण…,’ होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराणला रोखण्याचा दावा
3

US Iran Conflict : ‘आम्ही संरक्षण करु, पण…,’ होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराणला रोखण्याचा दावा

US-Iran War: इराणचा आखाती देशांमध्ये कहर! कुवेत, बहरीन आणि जॉर्डनवर ड्रोनचा पाऊस; लष्कराकडून हाय अलर्ट जारी
4

US-Iran War: इराणचा आखाती देशांमध्ये कहर! कुवेत, बहरीन आणि जॉर्डनवर ड्रोनचा पाऊस; लष्कराकडून हाय अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.