कोण आहे सिराज वहाज? ज्यासोबत फोटो शेअर करताच जोहर ममदानींवर संतापले ट्रम्प ; एलॉन मस्कने म्हटले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) न्यूयॉर्कमध्ये मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन नेते आणि न्यूयॉर्कच्या महापौरपदाचे उमेदवार जोहर ममदानी यांच्यावरुन हा वाद सुरु झाला आहे. ममदानी यांनी ब्रुकलिन येथील मस्जिद अत-तक्वा ला भेट दिली होती. यावरुन हा वाद उफाळला आहे. पण या वादामागचे खरे काही वेगळेच आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ! येमेनमध्ये हुथी बंडखोरांनी UN च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात
अमेरिकेत निर्माण झालेल्या या राजकीय वादळाचे कारण म्हणजे, जोहरान ममदानी यांनी ब्रुकलिन मधील मस्जिद अत-तक्वामध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी इमाम सिराज वहाज यांची भेट घेतली. तसेच त्यांनी त्यांच्यासोबतच एक हसतानाचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला. ज्यावरुन अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सिराज वहाज हे ७५ वर्षा मुस्लिम धर्मगुरू आहे. ते ब्रुकलिन येथील मस्जिद अत-तक्वाचे प्रमुख इमाम आहेत. १९९३ मध्ये वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांचे नाव षड्यंत्रकारी म्हणून चर्चेत आले होते. या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. FBI ने दावा केला होता की, वर्ल्ड ट्रेडवरील हल्ल्यात सहभागी काही लोकांना मस्जिदमध्ये आसरा घेतला होता. मात्र सिराज वहाज यांना या आरोपांना फेटाळले होते. त्यांनी त्या काळातील तपास संस्थ FBI आणि CI ला दहशतवादी संबोधले होते.
वहाज यांचा संबंध इजिप्शियन धर्मगुरु ब्लाइंड शेख उमर अब्देल रहमान यांच्याशीही असल्याचे सांगितले जाते. रहमान यांना १९९३ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या कटाचे मुख्य सुत्रधार ठरण्यात आले होते. परंतु वहाज यांनी सहमान यांच्या समर्थनार्थ न्यायालयात गवाही दिली आणि त्यांना इस्लामचा प्रचारक म्हटले.
जोहर ममदानी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर वहाज सिराज यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मला आज देशातील प्रसिद्ध आणि महान मुस्लिम नेते आणि बेड-स्टुय समुदायाचे आधारस्तंभ इमाम सिराज वहाज यांची भेट घेण्याचा सन्मान मिळाले. या फोटोमुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
Today at Masjid At-Taqwa, I had the pleasure of meeting with Imam Siraj Wahhaj, one of the nation’s foremost Muslim leaders and a pillar of the Bed-Stuy community for nearly half a century. I was also joined by CM @dr_yusefsalaam of Harlem. A beautiful Jummah. pic.twitter.com/4kcN4CGlUk — Zohran Kwame Mamdani (@ZohranKMamdani) October 18, 2025
दरम्यान जोहर ममदानी यांनी फोटो शेअर केल्यानंतर यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी फोटोला लाजिरवाणे म्हटले आहे. तसेच त्यांनी ममदानी यांच्यावर टीका करत ते दहशतवाद्यांशी मैत्री करत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय रिपब्लिकन नेत्या एलिस स्टेफानिक यांनी देखील ममदानींना जिहादी संबोधले आहे. तर टेस्लाचे एलॉन मस्क यांनी देखील टीकात्मक स्वरुपात वाह लिहून आपली प्रतिक्री दिली आहे. सध्या या फोटोमुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ सुरु आहे. अनेकांनी यावर टीका करत ममदानी यांच्या कृतीला राडकीय असंवेदनशीलता संबोधले आहे. तर काही लोकांनी त्यांना समर्थन केले आहे.
IMF चा बांगलादेशला झटका! नवे सरकार स्थापन होईपर्यंत कर्जाचा सहावा हफ्ता देण्यास नकार