Taiwan detects chinese warplanes and naval ships near its territory
China Taiwan Conflict : बीजिंग/तैपेई : सध्या सर्वत्र रशिया युक्रेन युद्धबंदीचा प्रयत्न सुरु असताना तिसऱ्या महायुद्धाची शंका व्यक्त केली जात आहे. दक्षिण चीन समुद्रात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. चीन (China) आणि तैवानमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. चीनने आपल्या लढाऊ विमाने आणि जहाजांसह तैवानत्या सीमाक्षेत्रात प्रवेश केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सीमारेषाच्या भागात चिनी लढाऊ विमाने आणि नौदल जहाजे दिसली आहे. मंत्रलायाने दिलेल्या माहितीनुसार, २७ लढाऊ विमाने असे यातील १९ लढाऊ विमानांनी तैवानच्या मध्यरेषा ओलांडली आहे. ही विमाने तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्य (ADIZ) हवाई क्षेत्राला वेढा घालताना दिसली.
यामुळे चीन तैवानवर हल्ला करणार असल्याचे म्हटले जात आहे. तैवानच्या मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, शनिवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी तैवानभोवती २७ PLA विमाने आणि ८ PLA जहाजांची हालचाल आढळली. सध्या तैवान परिस्थितीचे निरीक्षण करत असून योग्य प्रतिसाद देण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) देखील चिनी जहाजांच्या हालचाली तैवानभोवती आढळून आल्या होत्या. यामध्ये देखील २१ PLA आणि ९ PLAN जहाजांचा समावेश होता. तैवानच्या उत्तर, मध्य, आणि नैऋत्य सीमाक्षेत्रात या हालचाली आढळून आल्या.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने परिस्थितीची पहाणी करुन योेग्य ती कारवाई केली असल्याचे म्हटले आहे. तसेच चीनलाही इशारा देण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. पण चीनच्या तैवानभोवती सततच्या हालचालींमुळे चिंता निर्माण झाली आहे. यामुळे अमेरिकेचीही चिंता वाढली आहे. यामध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केला तर संघर्षात वाढ होऊ शकतो असे म्हटले जात आहे. सध्या ही परिस्थिती रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यांची आठवण करुन देत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सध्या चिनची लष्करी ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच चीनने ३ सप्टेंबर रोजी लष्करी परेडदरम्यान अत्याधुनिक शस्त्रांचे मोठे प्रदर्शन केले होते. यामध्ये हवेतून मारा करणारे बॅलेस्टिक मिसाइल J-L1, तर पाणबुडी आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र J-L3, J-L1 चा समावेश होता.
तसेच जमिनीवरुन मारा करणारे D-F61 क्षेपणास्त्र देखील प्रदर्शित करण्यात आले होते. तज्ज्ञांच्या मते, चीनची वाढतील लष्करी ताकद, हे धोकादायक प्रजदर्शन तैवान आणि पाश्चत्य राष्ट्रांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. यामुळे अणु युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.
प्रश्न १. दक्षिण चीन समुद्रात काय सुरु आहे?
दक्षिण चीन समुद्रात सध्या चीन आणि तैवानमध्ये तणावाचे वातावरण आहे. तैवानला त्यांच्या सीमारेषेत चीनच्या लष्करी हालचाली आढळून आले आहेत.
प्रश्न २. तैवानला सीमारेषेत काय आढळून आले?
तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सीमारेषाच्या भागात चिनी लढाऊ विमाने आणि नौदल जहाजे आढळली आहेत.
पाकिस्तानच्या लष्करी छावणीवर आत्मघातकी हल्ला; चकमकीत चार दहशतवादी ठार केल्याचा सैन्याचा दावा