पाकिस्तानच्या लष्करी छावणीवर आत्मघातकी हल्ला; चकामकीत चार दहशतवादी ठार केल्याचा सैन्याचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये (Pakistan) अस्थिरतेचे वातावरण आहे. एककीडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान अंतर्गत दहशतवादाला तोंड देत आहे. पाकिस्तानच्या लष्करावर पुन्हा एकदा आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) रोजी हा हल्ला झाला.
Air Strike : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला ‘एअर स्ट्राईक’; 3 क्रिकेटपट्टूंसह दहा जणांचा मृत्यू
मीडिया रिपोर्टनुसार, शुक्रवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील लष्कराच्या छावणीवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. परंतु पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी हा हल्ला उधळुन लावला असल्याचे म्हटले आहे. यावेळी चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असल्याचा दावाही पाक सैन्याने केला आहे. तसेच हल्ला करणाराही स्फोटात ठार झाला आहे.
पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पख्तूनख्वाच्या उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यातील मीर अली भागात हा हल्ला झाला होता. यावेळी दहशतवाद्यांनी छावणीला स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने उडवण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी वाहन छावणीच्या भिंतीवर सोडले, ज्यामुळे एक मोठा स्फोट झाला. हल्ला करणारे दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु सुरक्षा दलांनी त्यांना जागीच ठार केले. या हल्लात कोणताही सैनिकाला नुकसान झालेले नाही.
यापूर्वी देखील पाकिस्तानमध्ये असे अनेक हल्ले झाले आहे. अनेक वेळा पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर, छावण्यांवर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने हल्ला करण्यात आला आहे. बाजौर आणि बन्नू जिल्ह्यातही पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. परंतु पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी हल्ले उद्ध्वस्त केल्याचा म्हटले आहे. पाक सुरक्षा दलांना हल्ल्यापूर्वी योग्य माहिती मिळाल्याने सर्व हल्ले टाळण्यात यश आले असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे पोलिस अधिकारी अब्बास सलीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वा प्रांतात अनेक आत्मघातकी हल्ले होणार असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे त्यांच्या सैनिकांनी गुप्त कारवाऊ करत हल्ले उधळवून लावले. तसेच गेल्या दोन दिवसांत ५० हून अधिक दहशतवादी ठार करण्यात आले असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
यामध्ये अफगाण तालिबानला पाठिंबा देणाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच तहरीक-ए-तालिबानच्या (TTP) ३४ दहशतवाद्यांनाही ठार केल्याचे पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
प्रश्न १. पाकिस्तानच्या लष्करावर कुठे झाला हल्ला?
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा च्या उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यातील मीर अली भागात लष्करावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला.
प्रश्न २. लष्करावरील हल्ल्यात किती जीवीतहानी झाली?
पाकिस्तानच्या लष्करावर झालेल्या हल्ल्यात एकाही सैनिकाला नुकसान झालेले नसून हल्ला करणाऱ्यासह चार दहशतवादी ठार झाले आहेत.
प्रश्न ३. पाकिस्तानने किती दहशतवादी ठार केल्याचा दावा केला?
पाकिस्तानने गेल्या दोन दिवसांत ५० हून अधिक अफगाण तालिबानला पाठिंबा देणारे दहशतवादी ठार केल्याचे म्हटले आहे.
Pakistan-Taliban Clashes: पाकिस्तानचा माज उतरवणारा अफगाणिस्तानचा नूर वली मेहसूद कोण ?