China supports Pakistan : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेला तणाव अधिक गडद होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने पाकिस्तानला दिलेला उघड पाठिंबा भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) तसेच विविध धोरणात्मक आघाड्यांवर चीनने पाकिस्तानसोबत एकात्मता दर्शवली असून, त्यामुळे पाकिस्तानचे युद्धखोर वृत्त अधिक बळावले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव शिगेला
२६ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या हल्ल्याचे मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे पुरावे समोर आले असून, तेथेच दहशतवाद्यांचे नियोजन आणि प्रशिक्षण झाले होते. पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवरच पाकिस्तानी नेत्यांकडून अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र या धमक्यांना आता कोणतेही गांभीर्य राहिलेले नाही, कारण त्यामागचे चीनचे समर्थन आता उघड झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: भारताकडून हवाई क्षेत्र बंद तर पाकिस्तानकडून जॅमर आणि चिनी ‘ड्रॅगन’ क्षेपणास्त्रांची तैनाती
चिनी अधिकाऱ्यांची कबुली, “आम्ही पाकिस्तानसोबत आहोत”
लाहोरमधील चिनी कॉन्सुल जनरल शाओ शिरेन यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, चीन सर्व परिस्थितीत पाकिस्तानसोबत उभा राहील. पीपल्स पार्टी (PPP) च्या मध्य पंजाबच्या नेतृत्वासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी पाकिस्तानप्रती अटळ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
शाओ शिरेन म्हणाले की, “चीन धोरणात्मक सहकार्य, सुरक्षा आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत पाकिस्तानसोबत होता, आहे आणि राहील.” त्यांनी CPEC प्रकल्प, राष्ट्रीय सुरक्षाव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या विकासावरही चर्चा केली. तथापि, त्यांनी एकवचनी विधानही दिले – “युद्ध हा उपाय नाही”. दोन्ही देशांनी शांततामय आणि रचनात्मक मार्ग शोधावा, असे आवाहन त्यांनी केले. मात्र अशा निवेदनांमुळे चीनच्या दोन्ही बाजूंना खुश ठेवण्याच्या धोरणाचा फोलपणा उघड होतो.
1/2
Its a mistake to assume India- Pakistan in isolation‼️🔴Calling out #CHINA for using #Pakistan and terrorist attack to push India into a conflict
@rajnathsingh @HMOIndiaPosted on Oct 23,2024👇
1⃣ India will be dragged into a conflict by Pakistan, as China wants to… pic.twitter.com/HLFWvEz0nu
— Levina🇮🇳 (@LevinaNeythiri) May 1, 2025
credit : social media
भारताची कारवाई, पाकिस्तानला स्पष्ट इशारा
भारताने याप्रकरणी तात्काळ कृती करत पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द केले असून, ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, अटारी सीमेवरून अनेक पाकिस्तानी नागरिक मायदेशी परत जात आहेत. परतणाऱ्या पाक नागरिकांनी आपल्या वेदनाही व्यक्त केल्या, आणि दोन्ही देशांच्या सरकारांनी सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र भारताच्या निर्णयामागे दहशतवाद्यांना थारा न देणारी कठोर भूमिका आहे, हे स्पष्ट आहे. याशिवाय, भारत सरकारने सिंधू पाणी करार देखील थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या निर्णयामुळे त्यांच्यात अस्वस्थता आणि असंतोष वाढला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोरडा पडलाय पाकिस्तान; भारताच्या जलनीतीचा कसा पडला प्रभाव? पाहा Satellite Image
पाकिस्तानच्या युद्धखोर भूमिकेचा आधार म्हणजे चीन
ज्या आधारावर पाकिस्तान सतत युद्धाची भाषा बोलत आहे, त्याचा चेहरा आता उघड झाला आहे तो म्हणजे चीन. चीनच्या सामरिक आणि आर्थिक पाठिंब्यामुळे पाकिस्तानला भारताविरुद्ध धाडस करता येते, हे आता सिद्ध झाले आहे. मात्र भारताने उचललेली पावले ही केवळ प्रतिक्रिया नसून दहशतवाद आणि युद्धखोरीला रोख देणारी ठोस कृती आहे. भारत आता केवळ चेतावणी देत नाही, तर प्रत्यक्ष कारवाई करत आहे. या साऱ्या घडामोडी दक्षिण आशियातील सामरिक समिकरणांवर मोठा परिणाम घडवून आणतील, यात शंका नाही. चीनचा उघड हस्तक्षेप, पाकिस्तानचा बिनधास्तपणा आणि भारताची ठाम भूमिका – हे त्रिकोण पुढील काही दिवसांत अधिक तापू शकते.