Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Violence : निवडणुकीपूर्वी बांगलादेशात भीषण संघर्ष! खालिदा जिया यांच्या BNP पक्षात झालेल्या लढाईत अनेक जखमी

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये भीषण संघर्ष सुरु आह. माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या बीएनपी पक्षाच्या दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये ही लढाई झाली आहे. यामध्ये १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 30, 2025 | 08:39 AM
clashes in Bangladesh before elections within Khaleda Zia's BNP party

clashes in Bangladesh before elections within Khaleda Zia's BNP party

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात पुन्हा संघर्ष
  • BNP पक्षाच्या दोन गटांत लढाई
  • १०० हून अधिक जखमी
Bangaldesh Violence News in Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) गेल्या काही काळात तणावपूर्ण वातावरण आहे. देशात अनेक पक्षांमध्ये आणि कट्टर गटांमध्ये हिंसक संघर्ष सुरु आहे. नुकतेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया (Khaleda Zia) यांच्या बीएनपी पक्षात वाद पेटला आहे. यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरीदपूर येथे बीएनपी पक्षाच्या दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये तीव्र चकमक उडाली आहे. दोन्ही गटांतील संघर्षात १०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. सध्या परिस्थिती बिकट होत चालली असून याला नियंत्रित करण्यात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

बीएनपीच्या दोन गटांमधील वादाचे हिंसाचारात रुपांतर

ढाकाच्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदपूर येथे सलथामधील बीएनपीच्या गट्टी युनियन नेते जाहिद मातुब्बोर आणि नुरू मातुब्बोर यांच्या समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही गटांतील वादाने काल हिंसक रुप धारणे केले होते. यामुळे मोठा संघर्ष झाला. या संघर्षात अनेक लोक जखमी झाले आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर भाले, ढाल आणि बांबूच्या काठ्यांनी हल्ला केला. या संघर्षात अनेक घरांचे नुकसान झाले आहे.  शिवाय लूटमारही करण्यात आली आहे.

या संघर्षात आसपासच्या गावातील हजारो लोक सामील झाले होते. यामुळे परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. परंतु परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. हिंसाचार रोखण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले होते. यावेळी महिला आणि या संघर्षामुळे महिला आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी महिला आणि मुलांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. तसेच अनेक नागरिकही घराबाहेर पडण्यास घाबरत आहे.

काय आहे संघर्षाचे कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २०२६ फ्रेब्रुवारीमध्ये बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तिकीट आणि उमेदवारीवरुन तणावाचे वातावरण आहे. दरम्यान शनिवारी (३० नोव्हेंबर) ला बीएनपी पक्षाच्या दोन गटांतील तणावाचे हिंसाचारात रुपांतर झाले. ज्यामुळे तीव्र संघर्ष झाला आहे. या संघर्षात बीएनपीचा एक सदस्याचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. शिवाय या संघर्षात १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या लोकांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे ढाकाने वृत्त दिली आहे.

बीएनपी पक्षाच्या अध्यक्षा खालिदा जिया यांची प्रकृती गंभीर

याच वेळी बीएनपी पक्षाच्या अध्यक्षा खालिदा जिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  खालिदा जिया गेल्या अनेक वर्षांपासून किडनी, डायबेटिज, संधिताव, आणि डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या हृदयावर आणि फुफ्फुंसावर या आजारांचा परिणाम झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Tawheed Group : बांगलादेश पेटला! अल्पसंख्याकांवर पुन्हा हल्ले; दुर्गा पूजा ते बाउल रॅली, तौहिदी गटाचा हिंसाचार थांबता थांबेना

Web Title: Clashes in bangladesh before elections within khaleda zias bnp party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर
1

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
2

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा
3

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
4

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.