Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ebola Outbreak : इबोलाच्या नव्या ‘Bundibugyo’ व्हेरियंटने माजवला हाहा:कार; अवघ्या 2 महिन्यांत 1,000 हून अधिक निष्पापांचा बळी

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील इबोला विषाणूचा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत आहे. हा इतिहासातील सर्वात वेगाने पसरणारा प्रादुर्भाव असून, सुरू असलेला अंतर्गत संघर्ष, सामुदायिक निदर्शने, तसेच निधी आणि लसींची कमतरता यांमुळे विषाणूच्या प्रसाराला चालना मिळत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 23, 2026 | 05:06 PM
congo ebola outbreak bundibugyo virus deaths cross 1000 health crisis

congo ebola outbreak bundibugyo virus deaths cross 1000 health crisis

Follow Us
Follow Us:
  • भीषण जीवघेणा उद्रेक
  • लस व औषधांचा अभाव
  • आरोग्य आणीबाणी व खरा धोका

आफ्रिकन खंडातून एक अत्यंत वेदनादायी आणि मानवतेला हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये (DRC) इबोला विषाणूच्या नव्या उद्रेकाने अत्यंत भीषण रूप धारण केले असून, मानवी इतिहासातील हा सर्वात वेगाने पसरणारा इबोला (Ebola) संसर्ग ठरत आहे. मे २०२६ च्या मध्यावर समोर आलेल्या या नव्या संसर्गाने अवघ्या दोन महिन्यांत १,००० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. काँगोतील सततचा अंतर्गत संघर्ष, बंडखोर गटांचा हिंसाचार, वैद्यकीय निधीची भीषण चणचण आणि जीवनरक्षक लशींचा अभाव यांमुळे ही आरोग्य आणीबाणी नियंत्रणाबाहेर जात चालली आहे.

घाना येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषदेत बोलताना ‘आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’चे महासंचालक डॉ. जीन कासेया यांनी अत्यंत गंभीर शब्दांत परिस्थितीचा पाढा वाचला. ते म्हणाले, “काँगोमध्ये आतापर्यंत १,०३१ हून अधिक मृत्यूची अधिकृत नोंद झाली असून लोक अत्यंत वेगाने प्राणाला मुकत आहेत. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे आमच्याकडे या नव्या प्रकारावर ठोस लस नाही, औषधे नाहीत आणि मदतकार्यासाठी आवश्यक निधीही शिल्लक नाही.” १५ मे रोजी जाहीर झालेला हा उद्रेक इतिहासातील कोणत्याही इबोला संसर्गापेक्षा अधिक वेगाने मानवी बळी घेत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IRGC Attack THAAD: जॉर्डन आणि कुवेतमध्ये स्फोटांची मालिका; इराणच्या मिसाइलनी अमेरिकेच्या अभेद्य कवचालाच भेदले

‘बुंदीबुग्यो’ व्हेरियंटचा धोका का वाढलाय?

काँगोच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हजारो रुग्ण विलगीकरण आणि रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. हा नवा उद्रेक पूर्वीच्या इबोला संसर्गांपेक्षा खूप वेगळा आणि भयानक मानला जात आहे. यासाठी जबाबदार असलेला ‘बुंदीबुग्यो’ (Bundibugyo) हा विषाणू प्रकार आहे. यापूर्वीच्या झायरे (Zaire) इबोला प्रकारावर वैद्यकीय विश्वाने लस शोधली होती, परंतु या नव्या बुंदीबुग्यो व्हेरियंटवर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. २०१३ ते २०१६ दरम्यान झालेल्या भीषण इबोला साथीने ११,००० हून अधिक लोकांचा बळी घेतला होता, परंतु त्या वेळी १,००० मृत्यूचा टप्पा गाठण्यासाठी तब्बल ८ महिने लागले होते. या तुलनेत सध्याचा संसर्ग केवळ दोन महिन्यांत १,००० चा आकडा पार करून पुढे निघून गेला आहे, यावरूनच याच्या प्रसाराचा वेग लक्षात येतो.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तर आणखी एक धक्कादायक इशारा दिला आहे. काँगोतील इतुरी प्रांतात आणि आसपासच्या भागात सशस्त्र बंडखोर गटांची मारामारी सुरू असल्याने अनेक दुर्गम भागांत आरोग्य पथके पोहोचूच शकलेली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष मृत्यूची आणि बाधितांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा २ ते ४ पट जास्त असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Crisis: अमेरिकेनंतर आता कॅनडाकडे पाकिस्तानची मदत याचना; 47 दशलक्ष डॉलर्सच्या मदतीसोबतच रचला भारतविरोधी कट

सुरक्षित दफनविधींवरून संघर्ष आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे इस्रायली संप

इबोला हा अत्यंत संसर्गजन्य रोग असून तो बाधीत व्यक्तीच्या शारीरिक द्रव्यांच्या (उलट्या, रक्त, किंवा घाम) थेट संपर्कात आल्याने पसरतो. मृतदेहांमधूनही हा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे सुरक्षित दफनविधी करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, काँगोतील काही स्थानिक समुदाय त्यांच्या शतकानुशतके चालत आलेल्या पारंपरिक अंत्यसंस्कार पद्धती सोडण्यास तयार नाहीत. यामुळे दफन पथकांवर आणि आरोग्य केंद्रांवर हिंसक हल्ले केले जात आहेत.

या भीषण परिस्थितीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही तुटपुंज्या सुविधांमध्ये काम करावे लागत आहे. प्राणाची बाजी लावून काम करणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही, ज्यामुळे त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. नवीन रुग्णांपैकी ८०% रुग्ण हे अशा भागांत आढळत आहेत, जेथे पूर्वीच्या बाधितांचा मागोवा घेणे आरोग्य यंत्रणेला अशक्य झाले आहे. जर जागतिक समुदायाने त्वरित काँगोला औषधे आणि आर्थिक मदत पुरवली नाही, तर हे संकट आफ्रिकेच्या सीमा ओलांडून संपूर्ण जगासाठी नवीन आव्हान ठरू शकते.

Web Title: Congo ebola outbreak bundibugyo virus deaths cross 1000 health crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Ebola
  • virus
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
1

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
2

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
3

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO
4

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.