Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडात ‘या’ दहशतवादी गटाच्या परिषदेवरून गोंधळ; संघटनेला भारतासह ‘या’ देशांमध्ये हवी राजवट

हिज्ब उत-तहरीरच्या कॅनडामधील प्रस्तावित परिषदेवर वादंग निर्माण झाला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये बंदी असलेला ही इस्लामिक कट्टरपंथी संघटना 11 जानेवारी रोजी ओंटारियो येथे परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 09, 2025 | 04:13 PM
कॅनडात 'या' दहशतवादी गटाच्या परिषदेवरून गोंधळ; संघटनेला भारतासह 'या' देशांमध्ये हवी राजवट

कॅनडात 'या' दहशतवादी गटाच्या परिषदेवरून गोंधळ; संघटनेला भारतासह 'या' देशांमध्ये हवी राजवट

Follow Us
Follow Us:

ओटावा: हिज्ब उत-तहरीरच्या कॅनडामधील प्रस्तावित परिषदेवर वादंग निर्माण झाला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये बंदी असलेला ही इस्लामिक कट्टरपंथी संघटना 11 जानेवारी रोजी ओंटारियो येथे परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही परिषद वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामागचे, कारण तिचा उद्देश जगभरात इस्लामी खिलाफतचे राज्य प्रस्थापित करण्याचा असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

शांततेच्या नावाखाली इस्लामिक राज्याच्या स्थापनेचा उद्देश

हिज्ब उत-तहरीरचा इतिहास इस्लामिक कट्टरपंथाशी जोडलेला आहे. ही संघटना शांततेच्या नावाखाली इस्लामिक राज्याच्या स्थापनेसाठी कार्य करते असे मानले जाते. या परिषदेच्या जाहिरातींमध्ये स्पेन, ग्रीस, भारत, बाल्कन आणि आफ्रिकेच्या काही भागांचा समावेश असलेल्या इस्लामी खिलाफतचा नकाशा दाखवण्यात आला आहे. परिषदेच्या माध्यमातून या देशांमध्ये इस्लामी राज्य कसे स्थापन करता येईल, यावर चर्चा होणार आहे. तसेच, फिलिस्तीनचा मित्र आणि अमेरिका व इस्रायलला शत्रू म्हणून संबोधण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘कॅनडा अमेरिकेत विलिन होणे शक्यच नाही’; ट्रुडोंनी नाकारली डोनाल्ड ट्रम्प यांची ऑफर

कॅनडात परिषदेवर बंदीची मागणी

कॅनडामध्ये हिज्ब उत-तहरीरच्या परिषदेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. टोरंटो-सेंट पॉलचे खासदार डॉन स्टीवर्ट यांनी या परिषदेवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कॅनडाला वैश्विक खिलाफतीचा भाग बनवण्याचा हा प्रयत्न आहे. कॅनडाच्या CIJA संस्थेने देखील ही परिषद थांबवण्याचे आवाहन केले आहे.

या देशांमध्ये बंदी

हिज्ब उत-तहरीरवर जगभरातील अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये यूके, जर्मनी यांचा समावेश आहे. भारताने देखील 2024 मध्ये या संघटनेवर बंदी घातली आहे. हिज्ब उत-तहरीर इस्रायलच्या नाशाची मागणी करत असून दक्षिण युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील देशांना इस्लामी राज्यामध्ये बदलण्याचे ध्येय ठेवतो. हा गट स्वतःला अहिंसक असल्याचा दावा करतो, परंतु त्याच्या विचारधारेमुळे समाजामध्ये ध्रुवीकरण होते.

या संघटनेचा अजेंडा जागतिक इस्लामी सत्ता प्रस्थापित करणे आहे, यामुळे अनेक देशांमध्ये या गटाला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. कॅनडा सारख्या बहुसांस्कृतिक देशात अशा परिषदा आयोजित होणे चिंताजनक आहे, कारण यामुळे स्थानिक समाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कॅनडामधील नागरिक व अधिकारी यावर कठोर भूमिका घेत आहेत. हिज्ब उत-तहरीरची परिषद ही जागतिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पुन्हा हिंदू मृत्यू सर्वाधिक? 1971 नंतर सध्याच्या बांगलादेशमधील हिंसाचारावर ‘या’ नेत्याने व्यक्त केली चिंता

Web Title: Controversy over the conference of hizb ut tahrir terrorist group in canada nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • Canada
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.