'1971मध्ये सर्वाधिक हिंदूंचा मृत्यू...; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात भारतीय वंशाच्या खासदारांची तीव्र प्रतिक्रीया (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारत-बांगलादेश संबंध सध्या अधिकच चिघळले आहे. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. याचदरम्यान भारतीय-अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी बांगलादेशातील हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांकावर होणाऱ्या हिंसारावर कडाडून टीका केली आहे. अमेरिकी प्रतिनिधी सभेत संबोधित करताना कृष्णमूर्ती यांनी धार्मिक अत्याचारांविषयी चिंता व्यक्त केली आणि शेख हसीना यांच्या पदत्यागानंतर हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल आपले विचार मांडले.
1971ची आठवण
राजा कृष्णमूर्ती यांनी 1971 च्या बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातील हत्याकांडाची आठवण करून दिली. त्यांनी म्हटले की, “त्या वेळी सुमारे 3,00,000 ते 30 लाख लोकांचा बळी गेला होता आणि बहुतांश हिंदूंचा यामध्ये समावेश होता.” आजही पुन्हा एकदा हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या घरांवर आणि व्यसायंवर हल्ले होत आहेत, मंदिरांमध्ये तोडफड करण्यात येत आहे. बांगलादेश अधिक हिंसक बनत चालला आहे.
शेख हसीना यांच्यानंतर हिंसाचारात वाढ
कृष्णूर्ती यांनी शएख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर हिंसाचारात वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मोहम्मद युनूस सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “शेख हसीना यांनी पद सोडल्यानंतर धार्मिक अल्पसंख्यांवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. फक्त ऑगस्ट 2024 च्या महिन्यात 2,000 हून अधिक घटनांची नोंद झाली असून हे धक्कादायक आहे.” त्यांनी अमेरिकी परराष्ट्र विभागाशी यावर चर्चा केल्याचे सांगितले आणि पुढील कारवाईसाठी आव्हान केले.
तसेच कृष्णमूर्ती यांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांनी 1971 चा काळ पुन्हा येऊ नये असे म्हटले. तसेच धार्मिक अल्पसंख्यकांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आपण त्वरित पावले उचलली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
अंतरिम सरकारच्या काळात कट्टरवादाचा उदय
ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांनी पद सोडल्यावर नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली. मात्र, या सरकारच्या कार्यकाळात कट्टरतावादी शक्तींना अधिक बळ मिळाले असून, अल्पसंख्यांक समुदाय आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात आहे.
बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होत असून त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत आहे. अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. राजा कृष्णमूर्ती यांच्या या विधानाने जागतिक समुदायाचे लक्ष बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या स्थितीकडे वेधले आहे आणि त्वरित उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे.