Delta Airlines plane With 80 Onboard Flips Upside Down At Canada Toronto Airport, 18 Injured
ओटावा: अलीकडे विमान अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अमेरिकेतील विमान अपघातानंतर आता. कॅनडात एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 17 लोक जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. या विमानाने मिनियापोलिसहून टोरंटोला प्रवास केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात एकूण 76 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते.
पील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान दोन रनवे बंद राहणार आहेत.
#BREAKING: Delta Airlines CRJ-900 jet operated by Endeavor Air has crashed-landed and overturned with several passengers on board at the Toronto Pearson International Airport in Canada. Initial reports indicate 8 passengers are injured in the accident.
“Toronto Pearson is aware… pic.twitter.com/XQUQWnewHi
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 17, 2025
आपत्कालीन पथक घटनास्थळी
टोरोंटो पियर्सन विमानतळाने एक्सवर या घटनेची माहिती देत सांगितले की, या अपघाताबाबत त्यांना माहिती असून आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांनी सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. डेल्टा एअरलाइन्सने दिलेल्या निवेदनानुसार हा अपघात दुपारी 2.15 वाजता झाला.
विमानतळावर जोरदार बर्फवृष्टी
या घटनेच्या वेळी टोरोंटो पियर्सन विमानतळावर जोरदार बर्फवृष्टी होत होती. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याचा वेग 51 ते 65 किमी प्रति तास होता आणि तापमान उणे 8.6 अंश सेल्सिअस होते. या खराब हवामानामुळे विमानाच्या क्रॅशमध्ये त्याचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी फिलोडेल्फिया विमानतळावर अपघात
यापूर्वी अमेरिकेच्या पेंसिल्वेनियामधील फिलोडेल्फियात 1 फेब्रुवारीला एक लहान मेडिकल विमानाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. Learjet 55 नावाचे विमान नॉर्थ-ईस्ट फिलाडेल्फिया विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात 6.4 किमी अंतरावर कोसळले होते. या अपघाताचे कारण देखील अद्याप समोर आलेले नाही.
वॉशिंग्टन डीसीतील विमान अपघात
तसेच, 29 जानेवारीला वॉशिंग्टन डीसी येथे एक प्रवासी विमान आणि सैन्याच्या हेलिकॉप्टरची धडक होऊन मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत 67 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत पडले होते. या घटनेत यूएस एअरलाइन्सच्या बॉम्बार्डियर जेटचे तीन भाग झाले होते. विमान आणि हेलिकॉप्टरच्या ब्लॅक बॉक्सचा तपास सुरू आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानची चिंता वाढली; ‘या’ रोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ