पाकिस्तानची चिंता वाढली; 'या' रोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ (फोटो सौजन्य: iStock)
इस्लामाबाद: एकीकडे पाकिस्तान आर्थिक परिस्थितीशी झुंजत असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या कराचीमध्ये श्वसन विकारांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सिंध आरोग्य विभागाने ही माहिती दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 च्या आकडेवारीनुसार, 13 फेब्रुवारीपर्यंत 248 श्वसन विकारांचे प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या भितीचे वातावरण पसरलेले आहे.
श्वसन आजाराची विविध प्रकरणे
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये H1 N1 इन्फ्लूएंजाचे 119 रुग्ण आढळले आहेत.तसेच, इन्फ्लूएंजा A आणि B चे 95 प्रकरणेही नोंदवली गेली आहेत. कराचीमधील विविध खासगी रुग्णालांमध्ये 99 प्रकरणे नोंदवण्यात आली आहे. डॉव युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये 20 प्रकरणे आढळून आली आहेत. याशिवाय कोरोना विषाणूच्या 8, राइनोवायरसच्या 15 आणि रेस्पिरेटरी सिंकाइटियल व्हायरस (RSV) चे 2 प्रकरणे समोर आली आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ला
या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य तज्ज्ञांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. इनफ्लुएंझासारखए विषाणू संक्रमित व्यक्तींपासून सहज पसरतात. यामुळे मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. संक्रमित लोकांनी किमान 24 तास घरातच राहून इतरांशी संपर्क टाळावा, तसेच प्रवास टाळावा असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
लसीकरणाचा सल्ला
पाकिस्तानच्या सिंध आरोग्य विभागाने इन्फ्लूएंझाविरुद्ध लसीकरणाचा सल्ला नागरिकांना दिला आहे. स्वतःला आणि कुटुंबाला श्वसन विकारांपासून सुरक्षित ठेवण्याचा लसीकरण हा प्रभावी मार्ग असल्याचे विभागाने म्हटले आहे. कराचीमध्ये श्वसन विकारांमध्ये झालेल्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
नागरिकांना काळडी घेण्याचा सल्ला
नागरिकांनी आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विकारांपासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, सॅनिटायझरचा वापर आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय अत्यावश्यक आहेत. लसीकरणाच्या माध्यमातून या विषाणूंच्या संक्रमणापासून प्रभावी बचाव करता येऊ शकतो. कराचीतील वाढत्या श्वसन विकारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहून सतर्कतेचे सर्व उपाय अवलंबावेत. योग्य काळजी आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळेच या धोकादायक आजारांपासून आपले संरक्षण करता येईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चिनी सैन्य युद्धासाठी सक्षम नाही? ड्रॅगनचा खळबळजनक अहवाल आला जगासमोर