
Donald Trump Cracks a joke on FIIFA Trophy, Video Viral
केनेडी सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स येथे २०२६ चा वर्ल्ड कप होणार आहे. यावेळी याची घोषणा करण्यात आली. याची ट्रॉफी जेव्हा फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅंटिनो यांनी ट्रम्प यांना दाखवली याचवेळीचा हा प्रसंग आहे. ट्रम्प यांनी जेव्हा ट्रॉफी हातात घेतली तेव्हा त्यांनी म्हटले की, आता मी ही परत देणार नाही, यावर संपूर्ण ऑफिसमध्ये हशा पिकला. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान ५ डिसेंबरला फिपाच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
अमेरिकेवर ‘Tarrif Hike’ चा पहिला तडाखा; भारतासह युरोपीय देशांनी टपाल सेवा केली बंद
यावेळी ट्रम्प यांनी म्हटले की, हा जागतिक सोहळा आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंना अमेरिकेच्या सांस्कृतिक केंद्रात होत आहे, हा आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. यावेळी फिफाचे अध्यक्ष इन्फॅंटिनो यांनी देखील , यामुळे संपूर्ण जग एकत्र येते, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि आम्हाला याचा अभिमान आहे.त्यांचा या विधानानंतर हा मजेशीर किस्सा घडला. इन्फॅंटिनो यांनी ट्रम्प यांच्या हातात वर्ल्ड कपची ट्रॉफी दिली. यावेळी ती हातात घेतल्यानंतर ट्रम्प यांनी मी ही ठेवू का? खूप सुंदर आहे! असे म्हटले. यावर तिथे असलेल्यांमध्ये सर्वजण खळखळून हसले.
FIFA just let President Trump hold the Winners Trophy. “This trophy can only be touched by winners, and you’re a winner Mr. President.” pic.twitter.com/ske2JqkzQS — Based Bandita (@MissVega8888) August 22, 2025
यावर ट्रम्प यांनी केनेडी सेंटरचे नाव बदलून ट्रम्प सेंटर करुयात असेही म्हटले. यावेळी इन्फॅंटिनो यांनी हरकत नाही. ही ट्रॉफी विजेत्यांसाठी असते, तुम्हीही एख विजेते आहात तुम्ही ही ट्रॉफी घेऊ शकता असे त्यांनी म्हटले. सध्या अमेरिकेने फिफा वर्ल्ड कपवर २५७ दशलक्ष डॉलर खर्च केला आहे. यंदा २०२६ चा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणा आहे. यामध्ये ४८ संघ सहभागी होणार आहेत. यासाठी मोठ्या सोहळ्याचे आयोजन अमेरिकेने केले आहे.