पाकिस्तानात मिळणार बांगलादेशी विद्यार्थ्यांना शिक्षण, अधिकाऱ्यांनाही देणार ट्रेनिंग! दोन्ही देशांची नवी युती भारतासाठी धोकादायक? (फोटो सौजन्य: एक्स/@ForeignOfficePk)
Bangladesh Pakistan Relations : ढाका/ इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशमध्ये (Bangladesh) मोठा द्विपक्षीय करार करण्यात आला आहे. तसेच पाच सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामध्ये व्हिसा सवलीतीपासून ते व्यापारापर्यंत करार करण्यात आला आहे.
सध्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत पाकिस्तान आणि बांगलादेशात आर्थिक आणि राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. पण यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
सध्या बांगलादेश आणि पाकिस्तानचा व्यापार वार्षिक १ अब्ज डॉलरपेक्षा कमी आहे. मात्र नव्या करारानंतर दोन्ही बाजूंनी हा आकडा झपाट्याने वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पाकिस्तानकडून या चर्चेचे नेतृत्व इशाक डार यांनी केले तर बांगलादेशच्या वतीने परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन सहभागी झाले.
भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कट? ट्रम्पच्या मदतीने बांगलादेशला ‘पूर्व पाकिस्तान’ बनवण्याची तयारी
Following delegation level talks in Dhaka today, the DPM/FM @MIshaqDar50 and Foreign Adviser of Bangladesh oversaw signing of six instruments between Pakistan and Bangladesh. Their list includes Agreement between Pakistan and Bangladesh on Visa Abolition for Diplomatic and… pic.twitter.com/jFzKj00s6G
— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) August 24, 2025
सध्या भारताचे बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी संबंध तणावपूर्ण आहेत. अशा परिस्थिती या दोन्ही देशांची वाढती जवळीक भारतासाठी चिंतेची बाब आहे. यामुळे दक्षिण आशियात दोन्ही देशांचा प्रभाव वाढेल. यामुळे भारताच्या धोरणात्मक हितसंबंधाना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच वेळी चीनही दक्षिण आशियामध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
भारत आणि चीनचे संबंध गेल्या काही काळात सुधारत आहे, पण चीन गेल्या अनेक काळापासून भारताचा शत्रू राहिला आहे. यामुळे त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. यामुळे भारतासाठी नवी राजनैतिक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे असीम मुनीर (Asim Munir) बांगलादेशला पूर्व पाकिस्तानमध्ये बदलत असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे भारताची चिंता अधिकच वाढली आहे.
अमेरिकेवर ‘Tarrif Hike’ चा पहिला तडाखा; भारतासह युरोपीय देशांनी टपाल सेवा केली बंद