उजवीकडील फोटोत युरोपीय संघटनेच्या अध्यक्षा वर्सुला वॅन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डावीकडील फोटोमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. भारताने अमेरिकेला (America) टपाल सेवा बंद केली आहे. तसेच भारतासह युरोपीय देशांनी देखील हाच निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या (Tarrif) निर्णयामुळेच हे घडत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० जुलै रोजी एक नवीन कस्टम निर्णय (New US Duty Law) जारी केला होता. याअंतर्गत अमेरिकेने २९ ऑगस्टपासून ८०० डॉलर्सपर्यंतच्या (७० हजार रुपये) वस्तूंवर (Duty Free Good) टॅरिफ सूट रद्द केले. याचा अर्थ आता अमेरिकेत भारतातून जाणाऱ्या वस्तूंवर शुल्क आकाराले जाणार आहे. केवळ १०० डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंवर सूट देण्यात आली आहे.
अमेरिकेच्या या निर्णयानंतर, भारतानेही २५ ऑगस्टपासून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंचे टपाल बुकिंग थांबवले आहे. भारताच्या पोस्ट विभागाने ही सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. सध्य सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय वस्तूंचे बुकिंगही थांबवण्यात आले आहे. बुकिंग झालेल्या वस्तू ही परत पाठवल्या जात आहे.
भारतापाठोपाठ युरोपीय देशांनीही अमेरिकेला टपाल सेवा बंद केली आहे. इटली, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, नेदरलॅंड्स, ऑस्ट्रिया आणि इतर अनेक देशांचा समावेश आहे. युरोपीय टपाल संघटना पोस्ट युरोप आणि देशाच्या टपाल विभागाने अद्याप याची स्पष्ट माहिती दिली नाही. केवळ सेवा बंद केल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
अहो आश्चर्यम! निर्दयी किम जोंग उन यांना पहिल्यांदाच फुटला अश्रूंचा बांध? नेमकं कारण काय? VIDEO
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लागू केले आहे. रशियाकडून तेल खेरदीमुळे अतरिक्त २५% दंडही लादला आहे. याला भारताने विरोध केली असून ट्रम्प यांचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. भारत राष्ट्रीय हितासाठी आणि जागतिक स्थैर्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करतो, असे भारताने स्पष्ट केले आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल केलेला नाही. यामुळे सध्या भारत आणि अमेरिकेच्या व्यापार संबंधामध्ये तणावाचे वातावरण आहे.
याच वेळी भारताच्या पोस्ट विभागाने नागरिकांसाठी काही सुचनाही जारी केल्या आहेत. पोस्ट विभागाने सांगितले आहे की, सध्या अमेरिकेशी चर्चा सुरु आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल असे पोस्ट विभागाने म्हटले आहे.
परंतु याचा फटका अमेरिकेत व्यापार करणाऱ्या भारतीय व्यापारदारांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. तसेच ग्राहकांवरही परिणाम होत आहे.शिवाय यामुळे अमेरिकेतील नातेवाईकांना, व्यापारदारांना किंवा ग्राहकांना वस्तू पाठवण्यात अडचणी येत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफचा मोठा फटका व्यापारदारांना बसला आाहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच जागतिक बाजारपेठांमध्येही याचा परिणा दिसून येत आहे.
Israel Hamas War : इस्रायलच्या हमासविरोधी कारवायांना वेग; गाझातील हवाई हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू