Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

France Protest: अश्रुधुराने वाचवली मॅक्रॉन यांची खुर्ची; काय घडले आंदोलक एलिसी पॅलेसपासून अवघ्या 300 मीटरवर पोहोचल्यावर?

France Protest : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे आपले पद गमावण्यापासून थोडक्यात बचावले. रविवारी (१८ ऑक्टोबर), शिक्षणविषयक मुद्द्यांवर निदर्शने करणारे हजारो आंदोलक राष्ट्रपती भवन, एलिसी पॅलेसच्या जवळ पोहोचले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 19, 2026 | 03:39 PM
Emmanuel Macron protests France Elysée Palace Paris protest news

Emmanuel Macron protests France Elysée Palace Paris protest news

Follow Us
Follow Us:
  • एलिसी पॅलेसजवळ तणाव
  • अश्रुधुराचा वापर आणि सुरक्षा दल
  • शिक्षण व्यवस्थेविरुद्ध संताप आणि हिंसाचार

जगभरात लोकशाही देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्समध्ये (France Protest) सध्या अशांततेचे वातावरण पाहायला मिळत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांना एका मोठ्या राजकीय संकटाचा सामना करावा लागला आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) शिक्षणविषयक सुधारणांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले हजारो संतप्त आंदोलक थेट राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘एलिसी पॅलेस’ (Élysée Palace) जवळ येऊन धडकले. आंदोलक राष्ट्रपती भवनापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर पोहोचल्याने फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांची दाणादाण उडाली होती.

परिस्थिती एवढी गंभीर बनली होती की, आंदोलकांचा तोल आणि त्यांची संख्या पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. खुद्द फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी हे मान्य केले की, या प्रचंड जनसमुदायासमोर पोलीस हतबल झाले होते आणि कायदा व सुव्यवस्थेवरील त्यांचे नियंत्रण पूर्णपणे सुटले होते. या संपूर्ण घटनेमुळे फ्रान्सच्या राजकारणात खळबळ उडाली असून इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे सरकार आणि त्यांची सत्ता धोक्यात आल्याची चर्चा रंगली होती.

पोलीस हतबल झाल्यानंतर अश्रुधुराचा वापर

‘ले माँद’ (Le Monde) वृत्तपत्राने दिलेल्या सविस्तर वृत्तानुसार, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी आणि नागरिकांच्या या मोर्चाने सुरक्षेसाठी उभारलेले सर्व अडथळे (Barricades) तोडून टाकले. ते एलिसी पॅलेसमध्ये घुसण्याच्या तयारीत होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून अखेर सुरक्षा दलांना अश्रुधुराचा (Tear Gas) वापर करावा लागला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-India Trade Deal: ‘आम्ही कराराच्या अगदी जवळ…’ अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचे भारताबद्दल मोठे सूचक विधान

अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्यानंतर जमाव पांगण्यास सुरुवात झाली आणि याच संधीचा फायदा घेऊन त्वरित उजव्या विचारसरणीच्या विशेष दंगल नियंत्रण पथकाला (RIOT Police) घटनास्थळी तैनात करण्यात आले. राष्ट्रपतींच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा कवच अनेक पटींनी कडक करण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ थोडक्यात टळला. या संपूर्ण गोंधळानंतर गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी तो राजीनामा फेटाळून लावला आणि देशात कठोर पोलीस सुधारणांची गरज असल्याचे स्पष्ट केले.

🇫🇷 FRANCE ERUPTS IN RIOTS AS NATIONWIDE PROTESTS TURN VIOLENT! France was rocked by widespread protests and violent clashes on Saturday, October 17, 2026, as thousands of demonstrators took to the streets to protest the rising cost of living, expensive fuel, economic inequality, and declining public services. The demonstrations spread across major cities, including Paris, Marseille, Lyon, Toulouse, and other parts of the country. 🔥 Fires, Looting, and Violent Clashes In Paris, masked protesters clashed with riot police as tear gas filled the streets. Cars and other objects were set on fire, shop windows were smashed, and some businesses were reportedly looted. Police used tear gas and water cannons to disperse groups involved in violent confrontations. The unrest also spread to Lyon, where a tourist office was set on fire, while protesters in Marseille damaged public buildings and targeted municipal facilities. Authorities reported at least 272 arrests nationwide as officials struggled to contain the disorder. 🚨 Why Are People Protesting? The demonstrations involve students, labor unions, former Yellow Vest protesters, and other citizens frustrated by rising prices, fuel costs, inadequate school conditions, and concerns over government spending and public services. Many demonstrators say ordinary families are struggling financially and want the government to take action. Although many people participated in peaceful marches, violent incidents involving smaller groups overshadowed parts of the demonstrations. The unrest has renewed memories of France’s Yellow Vest movement, which began in 2018 over fuel taxes and the cost of living. ⚠️ What Happens Next? The protests are putting additional pressure on President Emmanuel Macron’s government as France approaches its 2027 presidential election. Officials have condemned the violence, while demonstrators continue demanding economic relief and improvements to public services. France now faces growing questions about whether the government can calm public anger before the unrest spreads further. #FranceRiots #FranceProtests #BreakingNews #WorldNews #MightyNews — Mighty News (@Mighty__News) October 17, 2026

credit – social media and Twitter

१,५०० हून अधिक दुकानांवर हल्ले आणि लुटालूट

हे आंदोलन केवळ शांततापूर्ण मोर्च्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. ‘फ्रान्स २४’ (France 24) च्या अहवालानुसार, आंदोलकांनी देशातील वेगवेगळ्या भागांत १,५०० हून अधिक दुकानांवर हल्ले केले आणि मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये आंदोलक मोठ्या मॉल्स आणि दुकानांच्या काचा फोडून सामान लुटताना दिसत आहेत.

या हिंसक प्रकारानंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एक कडक संदेश देणारा व्हिडिओ जारी केला. यामध्ये त्यांनी आंदोलकांचा निषेध करत त्यांना ‘लुटारू’ (Plunderers) म्हटले. मॅक्रॉन यांनी स्पष्ट शब्दांत चेतावनी दिली की, फ्रान्सच्या प्रजासत्ताकाला लुटण्याचा आणि देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही माफ केले जाणार नाही. फ्रेंच पोलिसांच्या आकडेवारीनुसार, या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जवळपास २,५०० हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली असून सरकार या संपूर्ण नुकसानीचे मूल्यांकन करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…

मॅक्रॉन सरकारविरोधात विद्यार्थ्यांचा संताप का भडकला?

या सर्व प्रचंड रोषामागे फ्रान्समधील शिक्षण प्रणालीची खालावत चाललेली स्थिती हे मुख्य कारण आहे. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी उघडपणे सांगितले की, फ्रान्सच्या शाळांमध्ये सध्या शिक्षकांची तीव्र कमतरता जाणवत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अनंत अडचणी येत आहेत.

जरी फ्रेंच सरकारच्या आकडेवारीनुसार देशात प्रत्येक २४ मुलांमागे एक शिक्षक असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. जीर्ण झालेल्या शाळांच्या इमारती, विद्यार्थ्यांने खचाखच भरलेले वर्ग आणि शिक्षणाच्या वाढत्या समस्यांमुळे विद्यार्थी वर्गात तीव्र संताप उसळला आहे. याच असंतोषाचा स्फोट या आंदोलनाच्या रूपाने पाहायला मिळाला, ज्याने थेट राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीला हादरे दिले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्रान्समध्ये हे आंदोलन भडकण्याचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: शाळांमधील शिक्षकांची तीव्र कमतरता, जीर्ण इमारती आणि खालावत चाललेल्या शिक्षण प्रणालीविरुद्ध विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

  • Que: आंदोलक फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या किती जवळ पोहोचले होते?

    Ans: संतप्त आंदोलक राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या 'एलिसी पॅलेस' या निवासस्थानापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर पोहोचले होते.

  • Que: परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काय पाऊल उचलले?

    Ans: पोलिसांचे नियंत्रण सुटल्यानंतर अश्रुधुराचा मारा करण्यात आला आणि त्वरित दंगल नियंत्रण पथकाला (RIOT) तैनात करून सुमारे २५०० जणांना अटक करण्यात आली.

Web Title: France protests emmanuel macron elysee palace tear gas riots hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Emanuel Macron
  • France
  • Protest
  • World news

संबंधित बातम्या

COP17 Summit: 2030 चे ध्येय निसटले हातातून! अर्मेनियात 200 देशांचे प्रतिनिधी चिंताक्रांत; वाचा येरेवान परिषदेचे थेट वृत्त
1

COP17 Summit: 2030 चे ध्येय निसटले हातातून! अर्मेनियात 200 देशांचे प्रतिनिधी चिंताक्रांत; वाचा येरेवान परिषदेचे थेट वृत्त

China : चीनची राजधानी बीजिंग 2035 पर्यंत बनणार ‘अतिवृद्ध’ समाज, काय आहेत यामागील आर्थिक आणि सामाजिक धोके?
2

China : चीनची राजधानी बीजिंग 2035 पर्यंत बनणार ‘अतिवृद्ध’ समाज, काय आहेत यामागील आर्थिक आणि सामाजिक धोके?

US-India Trade Deal: ‘आम्ही कराराच्या अगदी जवळ…’ अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचे भारताबद्दल मोठे सूचक  विधान
3

US-India Trade Deal: ‘आम्ही कराराच्या अगदी जवळ…’ अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचे भारताबद्दल मोठे सूचक विधान

VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…
4

VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.