Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Military Crisis : अमेरिकी सैन्यात बंड! हताश ट्रम्प यांनी लष्करप्रमुखांसह २ अधिकाऱ्यांना हटवले

US Iran Military Crisis : इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध आता ट्रम्प यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे. जागतिक स्तरावर टीकेचा धनी व्हावे लागल्यानंतर आता त्यांना देशांतर्गत आणि लष्करी पातळीवरही असंतोष निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 04, 2026 | 09:35 AM
Trump Fires Army Chief Randy George and 2 Generals Amid Iran War

Trump Fires Army Chief Randy George and 2 Generals Amid Iran War

Follow Us
Follow Us:
  • इराणयुद्धामुळे अमेरिकेत अंतर्गत वाद पेटला
  • हताश होऊन ट्रम्प यांनी लष्करप्रमुखांसह २ अधिकाऱ्यांना केले बडतर्फ
  • देशभरात खळबळ
इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासाठी अडचणीचे ठरू लागले आहे. जागतिक स्तरावर टीकेचा धनी व्हावे लागल्यानंतर आता त्यांना देशांतर्गत आणि लष्करी पातळीवरही असंतोषाचा सामना करावा लागत आहे. इराणवर जमिनीवरून आक्रमण करण्याच्या मुद्दधावरून लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या ‘बंडाच्या सुरांमुळे संतापलेल्या ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेचे आर्मी चीफ रॅन्डी जॉर्ज यांना तडकाफडकी पदावरून हटवले आहे. यामुळे सैन्यात खळबळ उड़ाली आहे.

Brigitte Macron: ‘ट्रम्प आपल्या मर्यादा विसरले!’ पत्नीबद्दलच्या ‘त्या’ घाणेरड्या कमेंटमुळे मॅक्रॉन भडकले; अमेरिका आता एकटी पडणार?

अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी रन्डी जॉर्ज यांच्यासह अन्य दोन जनरल्सना बडतर्फ केले आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा अमेरिका इराणविरुद्ध युद्धात (US Iran War) गुंतलेली आहे. रॅन्डी जॉर्ज हे ऑगस्ट २०२३ पासून या पदावर होते. बायडेन प्रशासनाच्या काळात ४ वर्षांसाठी त्यांची नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे, हेगसेथ यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत दोन डझनहून अधिक टॉप जनरल्स आणि ॲडमिरल्सना हटवण्यात आले आहे.

ट्रम्पच्या निशाण्यावर होते जॉर्ज

हटवण्यात आलेले रॅन्डी जॉर्ज यांनी पहिल्या खाडी युद्धासह इराक आणि अफगाणिस्तानात सेवा बजावली आहे. त्यांनी २०२१-२०२२ मध्ये बायडेन प्रशासनाच्या काळात संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन याचे प्रमुख लष्करी सहाय्यक म्हणूनही काम पाहिले. फेब्रुवारी २०२५ मध्ये ट्रम्प प्रशासनाच्या सुरुवातीलाच रॅन्डी जॉर्ज यांना हटवण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु त्यावेळी ते बचावले होते.

संरक्षणमंत्री हेगसेथ यांनी यापूर्वी नेशीच्या टॉप अधिकारी ॲडमिरल लिसा फ्रांबेटी आणि एअर फोर्सच्या जनरल जिम स्लाईफ यांच्यासह अनेक कमांडर्सना हटवले आहे. ट्रम्प यांनी जॉइंट चीपस ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल चार्ल्स सीक्यू’ ब्राउन ज्युनियर यांनाही पदावरून काढले होते, तेव्हापासून डझनभर वरिष्ठ अधिकारी एकतर मुदतपूर्व निवृत्त झाले किंवा त्यांना काढण्यात आले आहे.

२ अधिकारी बडतर्फ

रॅन्डी जॉर्ज यांच्यासोबतच आर्मी जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन या अधिकाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जनरल डेव्हिड होडने हे ‘आर्मी ट्रान्सफॉर्मेशन अँड ट्रेनिंग कमांड’ चे प्रमुख होते. डिसेंबरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या या युनिटचा लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेत मोठा सहभाग होता. मेजर जनरल विल्यम ग्रीन हे लष्कराचे ‘चीफ ऑफ चॅपलेन्स’ (धर्माधिकारी प्रमुख) होते.

ख्रिस्तोफर ला नीव यांच्याकडे जबाबदारी

रॅन्डी जॉर्ज यांच्या हकालपट्टीनंतर जनरल ख्रिस्तोफर ला नीव याची प्रभारी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ला नीव हे गेल्या ऑक्टोबरमध्ये ट्रम्प याच्याद्वारे आमी वाईस चीफ ऑफ स्टाफ पदासाठी नामांकित झाले, त्यावेळी ते हेगसेथ यांचे टॉप सैन्य सल्लागार होते. अवध्या दोन वर्षांपूर्वी ते ‘टू-स्टार जनरल’ होते, त्यामुळे त्यांची ही पदोन्नती अत्यंत वेगवान मानली जात आहे.

पाडलेल्या ‘एफ-१५ ई’ मधील एकाची सुटका

इराणच्या लष्कराने अमेरिकेच्या ज्या एफ-१५ ई लढाऊ विमानाला पाडून नष्ट केले, त्या विमानाचा वैमानिक सध्या कुठे आहे? हा प्रश्न सध्या वॉशिंग्टनपासून ते तेहरानपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. तथापि, ताज्या माहितीनुसार अमेरिकेने विमानातील एका कर्मचाऱ्याची (क्रू मेंबरची) इराणमधून यशस्वीपणे सुटका केली आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणी सैन्य घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच अमेरिकेच्या लष्कराने शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली होती. त्यात दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाची यशस्वीपणे सुटका केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

US Politics: ट्रम्प प्रशासनात सत्तेचा रणसंग्राम! अमेरिकेत एका रात्रीत 3 बड्या नेत्यांची हकालपट्टी; काश पटेल, तुलसी गबार्ड रडारवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेन लष्करात नाराजी का आहे?

    Ans: इराणवर जमिनीवरुन हल्ला करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णायवरुन अमेरिकन लष्करात नाराजी निर्माण झाली आहे.

  • Que: ट्रम्प यांनी आर्मी चीफ रॅन्डी जॉर्ज यांना का हटवले?

    Ans: इराणवर जमिनीवरुन हल्ला करण्याच्या मुद्द्यावरुन लष्करात नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे ट्रम्प यांनी आर्मी चीफ रॅन्डी जॉर्ज यांना पदावरुन काढून टाकले.

  • Que: जॉर्ज रॅन्डी यांच्यासह कोणत्या दोन अधिकाऱ्यांना पदावरुन हटवण्यात आले?

    Ans: जॉर्ज रॅन्डी यांच्यासह दोन वरिष्ठ अधिकारी जनरल जेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांना पदावरुन हटवण्यता आले आहे.

Web Title: Donald trump fires army chief randy george and 2 generals amid iran war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ
3

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
4

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.